आपण काबाडकष्ट करतो मेहनत करतो, मेहनत करुन पैसे कमावतो, कशा करतात?? तर दोन वेळचे पोटभर जेवण मिळावे व शांतचित्ताने व आनंदी मनाने जेवण केल्यामुळे ते आपल्या अंगी लागते! जेवनाच्या पद्धतीचे आपल्या आरोग्याला लाभ होतात. वास्तुशास्त्रानुसार दिशांचे अधिक महत्त्व मानले जाते. वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिशांच्या प्रत्येक कोपऱ्याचे वेगवेगळे महत्त्व विशद केले आहे.
प्रत्येक काम करण्याकरता वास्तूशास्त्रानुसार एक दिशा सुनिश्चित केलेली आहे. स्वयंपाक करताना किंवा जेवण करताना योग्य दिशेला आपले तोंड असणे महत्त्वाचे असते. जर अशा वेळी आपण चुकीच्या दिशेने तोंड करून जेवत असाल तर त्याचा आपल्या जीवनावर व आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो.
कोणत्या दिशेला बसून जेवण करावे.? याबाबत वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शक नियम सांगितलेले आहेत. ज्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर त्याचा शुभ प्रभाव पडत असतो. आज आम्ही आपल्याला वास्तूशास्त्रानुसार जेवन करतानाच्या योग्य दिशांबद्दल मार्गदर्शन करणार आहोत. चला तर जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला तोंड करून जेवावे.?
वास्तुशास्त्रानुसार जेवण करताना पूर्वेकडे आपले तोंड असावे किंवा किंवा ईशान्य दिशेकडे आपले तोंड असावे. यामुळे जेवणार्या व्यक्तीला त्या जेवणातून योग्य ऊर्जा प्राप्त होते. पूर्वेकडे तोंड करून जेवण केल्यामुळे आजारांपासून रक्षण होते, कोणतेही आजार येत नाहीत. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की, पूर्व दिशा ही देवांची दिशा मानली जाते. चुकीच्या दिशेला बसून जेवण केल्यामुळे काही समस्यांना सामोरे जावे लागते. त्या समस्या पुढीलप्रमाणे.
वास्तूशास्त्रानुसार दक्षिण दिशेकडे तोंड करून अन्न खाणे अशुभ मानले जाते. त्यामुळे जेवणार्या व्यक्तीला पचनसंस्थेसंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वास्तूशास्त्रानुसार दक्षिण दिशेकडे तोंड करून जेवल्यामुळे व्यक्तीला अपमानाचा सामना करावा लागतो. वास्तुशास्त्रानुसार अन्न बनवताना देखील आपले तोंड हे पूर्वेकडे किंवा ईशान्येकडे असणे आवश्यक असते.
वास्तुशास्त्रामध्ये असेही म्हटले जाते की हात-पाय आणि तोंड धुवून भोजन करण्यास बसल्यास व्यक्तीचे आयुष्य वाढते. वास्तूशास्त्रानुसार कधीही तुटलेल्या व खरकट्या भांड्यांमध्ये जेवण करू नये, त्यामुळे दुर्भाग्य वाढते. तसेच जीवनामध्ये समस्यांचा सामना करावा लागतो.
वास्तूशास्त्रानुसार खुर्चीवर बसुन जेवताना सतत पाय हालवु नये. तसेच जेवणाचे ताट हातात धरून खाणे अशुभ मानले जाते. वास्तूशास्त्रानुसार डायनिंग टेबल कधीही मोकळा ठेवू नये. डायनिंग टेबलवर नेहमी काहीतरी खाण्याच्या वस्तू ठेवाव्यात.
तर हे होते काही वास्तुशास्त्रीय जेवतानासंबंधी दिशांबद्दलचे मार्गदर्शक महत्वाचे नियम. आपणही जर चुकीच्या दिशांना तोंड करुन जेवण करत असाल तर यापुढे वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेकडे तोंड करून जेवण करावे, ज्यामुळे आपल्याला त्या जेवनाचे संपूर्ण लाभ मिळतात. तसेच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही वास्तुशास्त्राच्या दोषांचा सामना करावा लागणार नाही.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.