सुक्या मेव्यामधील मुख्य पदार्थ म्हणजे काजू. कोकणातील प्रत्येक शेतकरी काजूचे पीक घेत असतो. काजू कच्चा असो अथवा पिकलेले फळ असो किंवा पूर्णपणे बनवून तयार झालेला काजू असो काजूचे सर्व प्रकार शरीराकरता लाभदायका आहेत. चांगल्या आरोग्यासाठी काजु नियमित सेवन करणे चांगले असते. काजूपासून बनलेले अनेक पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये घेतो. काजूच्या वेगवेगळ्या रेसिपी देखील आपण हॉटेलमध्ये व घरीदेखील करून पाहतो.
काजुकतली हे फेमस स्वीट तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. काजू करी, काजू मसाला, काजू तुकडा असे अनेक पदार्थ हॉटेलमध्ये आपण मोठ्या हौसेने घेऊन खात असतो. वेगवेगळ्या मिठाईच्या गोड पदार्थांमध्ये काजूचा वापर केला जातो. कोकणात काजूचे सगळ्यात जास्त उत्पादन घेतले जाते. काजूचे सेवन अनेक आजारांमध्ये उपयोगी असते.
मात्र काजुचा उपयोग आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा केला जातो याबद्दल बर्याचशा लोकांना माहिती नसते. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे काजूचा डोळ्यांच्या आरोग्यासाठी कसा वापर केला जातो याबद्दल माहिती सांगणार आहोत.
अनेक लोकांना खूप कमी वयामध्ये नजर कमजोर होते व दृष्टी दोष सुरू होतो. आज-काल अगदी लहान-लहान मुलांमध्ये देखील चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. जास्त वेळ कम्प्युटरवर काम करणारे व डोळ्यांचा वापर जिथे जास्त होतो अशा बारीक-सारीक कामांमध्ये काम करणारे लोक, शिवणकाम करणारे टेलर, भरत काम विणकाम कापड उद्योगातील विणकर कामगार यांमध्ये डोळ्याचा वापर जास्त प्रमाणात करावा लागतो.
नट-बोल्ट्स व मशिनरी फिटिंग करणाऱ्या लोकांच्या देखील डोळ्यांवर जास्त ताण येत असतो. डोळ्यांचे आरोग्य चांगले असेल तर आपण निसर्ग व हे सुंदर जग चांगल्या प्रकारे पाहू शकतो. मात्र आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे डोळ्यांचे आरोग्य खालावत चालली आहे. कमी वयात चष्मा लागल्यामुळे अनेक लोकांना दृष्टी गमवावी लागली आहे. याकरता आपल्याला काजूचा उपयोग करायचा आहे.
आपल्याला रोज झोपण्याच्या अगोदर दोन काजूचे तुकडे चावून-चावून खायचे आहेत व त्यावर अर्धा ग्लास थंड पाणी प्यायचे आहे. फक्त हा उपाय आपल्याला सलग पंधरा दिवस करावा लागेल. जर आपण हा उपाय केला तर आपल्या डोळ्यांवरचा ताण कमी होतो व डोळ्यांचे स्नायू शिथिल होतात. त्यामुळे आपली नजर चांगली होते व दृष्टिदोषदेखील निघून जातात.
काजूचा नियमित आहारामध्ये वापर केल्यामुळे चष्मा लवकर जातो. जर आपण देखील दृष्टिदोषामुळे हैराण झाला असाल व अनेक उपाय करून देखील डोळ्याची नजर कमजोर होत असेल तर आपण नक्कीच काजूचा आम्ही सांगितलेला उपाय करून आपली नजर परत आणू शकता व चष्मा देखील कायमचा घालवू शकता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.