डोळा लावताच झोप लागली पाहिजे.? शांत झोप हवी असेल तर दुधात हा एक पदार्थ घ्यायला पाहिजे.! शांत, गाढ झोप लागेल.!

आरोग्य

मित्रांनो मानव हा मेहनती प्राणी आहे. उदर निर्वाह करण्यासाठी तो अतोनत कार्य व श्रम करतो. परंतू मेहनती नंतर माणसाला गरज असते ती झोपेची. माणसाला गरज असते ती दररोज आठ ते नऊ तासाच्या झोपेची. माणसाला झोप मिळाले नाही तर आपले आरोग्य बिघडते. झोप न लागण्याची अनेक कारणे असू शकतात. कामाचा ताण अथवा त्रास असल्यास झोप लागत नाही.

तसेच गंभीर आजार झाला असल्यास झोप उडते. अन्यथा मनात भीती असेल तर ही झोप लागत नाही आणि लागल्यास लगेच डोळा उघडतो. झोप न येण्याची असंख्य कारणे असू शकतात. वेळेवर आणि पूर्ण झोप न मिळाल्याने आपल्या शरीराला अनेक तोटे होतात. होय सर्व प्रथम तीव्र डोकेदुखीला सुरवात होते. आपले वजन झपाट्याने घटू लागते व तब्येत देखील बारीक व कमजोर होवू लागते.

रोग प्रतिकारक शक्ती कमी होवू लागते व आपण अनेक व सारखे छोट्या मोठ्या आजारांना बळी पडू लागतो. चेहरा निस्तेज होतो व डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे दिसू लागतात. खाल्लेले अन्न योग्य वेळी पचन होत नाही व यामूळे गॅस व अपचन सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. भुक लागणे कमी होते व सारख्या उलट्या कराव्याश्या वाटतात. फक्त वेळच्या वेळी झोप न घेतल्याने शरीर संपूर्ण आजारी पडते.

हे वाचा:   तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्याने, होणारा फायदा ऐकून तुम्ही चकित व्हाल, आरोग्य दहापट सुधारेल.!

बाजारात मिळ्णाऱ्या कृत्रिम गोळ्या व औषधे खाल्यास झोप लागते परंतू यांच्या नियमित सेवनाने तुमच्या आंतर इंद्रियांवर दुष्परिणाम होवू लागतो. तुम्ही देखील या अनीद्रेच्या समस्येचे शिकार असाल अथवा तुमच्या घरात-आजुबाजूला कोणी ही या समस्येने त्रस्त असेल व यावर कायमचा उपाय शोधत असेल तर अभिनंदन हा लेख तुमच्यासाठीच आहे मित्रांनो.

या लेखा द्वारे आम्ही तुमच्यासाठी एक छोटासा साधा-सोपा परंतू अस्स्सल रामबाण उपाय घेवून आलो आहोत. चल वेळ न घालवता पाहूया हा उपाय. सर्व प्रथम हा उपाय करण्यासाठी बडीशेप हा आवश्यक घटक आपल्याला घ्यायचा आहे. बडीशेप जेवणानंतर आपल्या तोंडाची चव वाढवते मात्र. तुम्हाला कदचित माहित नसेल परंतू पोटाच्या म्हणजेच पाचन संस्थेच्या विकारांसाठी बडीशेप एक उत्तम औषध आहे.

वजन कमी करण्यासाठी देखील बडीशेप उपयुक्त आहे. याच बडीशेपला एका पात्रात पाण्यात टाकून गॅसवर गरम करण्यास ठेवा. दहा ते पंधरा मिनिटांनी गॅस बंद करा.आता पाणी चांगले गरम झाल्यास बडीशेप गाळणीच्या मदतीने पाण्यापासून वेगळी करा. आता यातील फक्त पाणी घ्या बाकी उरलेला पदार्थ असाच खावून टाका. दुसरा घटक आपणास हवा असेल तो म्हणजे दूध.

दूध हे एक पूर्ण ब्रम्ह आहे. दूधात अनेक जीवनसत्व तसेच खनिजे आढळतात. दूधाच्या नियमित सेवनाने शरीर बळकट व पिळदार होते. हाडांचा त्रास अथवा अशक्तपणा थकवा असल्यास तो देखील दूर करण्यासाठी दूध फयदेशीर आहे. आता या उपायासाठी एक पेला दूध घ्या. या दूधामध्ये बडीशेपचे पाणी टाका. यात तुम्ही चवीसाठी एक चमचा साखर देखील घालू शकता. मात्र ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी साखर घेणे टाळावे.

हे वाचा:   लठ्ठपणाची समस्या कायमची मिटेल, फक्त सकाळी उठल्याबरोबर हे तीन कामे करा महिन्याभरात पाच ते सहा किलो वजन कमी होईल

आता रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण घ्यायचे आहे म्हणजेच जेवणानंतर तासाभराने. याच्या सेवनाने तुम्हाला गाढ झोप लागेल. बडीशेप मध्ये असणारे घटक मेंदूला शांत करतात व झोपेवर लक्ष्य केंद्रीत करतात. यामूळेच तुम्हाला लगेच व गाढ झोप लागेल. हा एक घरगुती उपाय आहे त्यामुळे अगदी सर्वांच्याच खिशाला हा परवडू शकतो. हा नैसर्गिक आहे त्यामुळे याचा आपल्या शरीरावर कोणता अपाय होत नाही.

हा आमचा आयुर्वेदीक उपाय नक्की करुन पहा कारण शांत झोपे सारखे सुख या जगी कुठे नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.