नव्वद वर्ष वयापर्यंत नाही होणार हाडे दुखी.! दगडासारखे मजबूत बनवा तुमचे हाडे.! येणारा कटकट आवाज कायमचा होईल बंद.!

आरोग्य

आजकालच्या भावपळीच्या जगात अनेक नवीन आजारांची ओळख आपल्याला होत आहे. या सगळ्यांचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपला आहार सात्विक नसणे. शरीरात पोष्टक तत्वांची कमतरता असल्याने आपली हाडे दुखू लागतात. कमजोर होऊ लागतात. सांध्यांमध्ये त्रास होऊ लागतो. काहीवेळा सांध्यांमधील द्रवामध्ये हवेचे छोटे फुगे फुटतात. यामुळे आपल्याला हाडांमध्ये कटकट असा आवाज येतो.

आणि काही वेळेस कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे सुद्धा हा आवाज येतो. गुडघ्यांमधूनही कधी-कधी असा आवाज येतो. आपल्या शरीराचा पूर्ण भार गुडघ्यावरच असतो. त्यामुळे प्रत्येक हालचालीचा भार गुडघ्यावर पडत असतो. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेला पूर्ण करण्यासाठी कॅल्शियमचे प्रमाण जास्त प्रमाणात असलेल्या पदार्थांचे सेवन करणं गरजेचं आहे. कॅल्शिअम आपल्या शरीरात योग्य प्रमाणात असलेच पाहिजे.

तर आज आपण बघणार आहोत यासाठी योग्य उपाय. तीळ हे कॅल्शिअम चे भांडार आपण म्हणून शकतो.
तिळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक हाडांसाठी पोषक ठरतात. थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय ठेवल्यास हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवत नाही. म्हणून नेहमीच्या सेवनात थोड्या तिळाचा वापर नक्की करा. तीळ कच्चे खाऊ नका. शक्यतो ते थोडे भाजूनच खावेत.

हे वाचा:   मूळव्याध चा त्रास किती दिवस सहन करणार.? या वनस्पतीच्या पानाने डॉक्टरांना सुद्धा आश्र्चर्य चकित केले आहे.! हे पान मूळव्याध असणाऱ्या लोकांना असे वापरावे.!

प्रथम सफेद तीळ घेऊन ते तव्यावर थोडेसे भाजून घ्या. तिळामध्ये व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रोटीनही मूबलक प्रमाणात आढळतं. तिळाच्या तेलाने सतत मालिश केल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते. तिळाचं सेवन दातांसाठीही गुणकारी ठरतं. सकाळी ब्रश केल्यानंतर तीळ चावून खाल्ल्याने दात मजबूत होण्यास फायदा होतो.

हे तीळ वाटून त्याची पावडर करून ठेवावी. आणि एका हवा बंद बरणीत ती ठेवून द्यावी. एक चमचा ही पावडर घेऊन एक ग्लास कोमट दुधासोबत घ्यावी. साधारण तीन दिवस नियमित घेतल्यास तुम्हाला लगेच परिणाम दिसून येईल. त्याचप्रकारे तुम्ही भाजलेले तीळ मधासोबत सुद्धा खाऊ शकता. एक चमचा भाजलेले तीळ आणि एक चमचा मध घेऊन ते एकत्र करा. आणि त्याचे सेवन करा.

सोबतच एक ग्लास कोमट दूध प्या. प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारख्या पोषक घटकांमुळे दुधाची गुणवत्ता वाढते. दुधाला थंड पिण्याऐवजी, गरम करू सेवन केले गेले तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतात. कोमट दूध पिण्यामुळे दुधातील पोषण वाढते. हीटिंग प्रक्रिया दुधात उपस्थित एन्झाईम्स सक्रिय करते आणि ते शरीर चांगले शोषून घेतात, ज्यामुळे हाडांची घनता सुधारते.

हे वाचा:   सकाळी भिजवून ठेवलेले बदाम खाल्ल्याने मेंदूत नेमके काय होते माहिती आहे का.? मुलांना बदाम खायला देण्याआधी हे नक्की वाचा.!

कोमट दूध पिण्यामुळे हाडांशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. तसेच हे तीळ खाताना तुम्ही मधाऐवजी गूळ सुद्धा घेऊ शकता. अशाप्रकारे तिळाचे फायदे शरीरातील कॅल्शिअम वाढवतात आणि आपले शरीर सुदृढ बनवतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *