मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात कापूराच्या खूप मोठे महत्व दिले जाते. आपल्या घरात कोणती ही पूजा या कापूराच्या अस्तित्वा शिवाय संपन्न होत नाही. पूजेच्या शेवटी कापूर जाळून मग पूजेची सांगता केली जाते. कापूर आपण राहत असणार्या वास्तूसाठी खूप आवश्यक आहे. भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी लोक कापूर आवर्जून पेटवतात. पूजेच्या वेळी कापूर जाळण्याच्या मागे आपल्या धर्म ग्रंथात अनेक अश्या पौराणिक गोष्टी व कथा लिहून ठेवल्या गेल्या आहेत.
परंतू मित्रांनो कापूर लावण्या मागे काही सायंटिफिक कारणे देखील आहेत. होय कापूराच्या गंधाने आपल्याला असणारे श्वसनाचे विकारी बरे होवू लागतात. त्याच बरोबर घरातील नकारात्मक वातावरण नाहीसे होवून सकारात्मक विचारांना चालना मिळू लागते. सर्दी अथवा पडसे या सारखे छोटे आजार देखील बरे करण्याची शक्ती या कापूरामध्ये आहे.
याच्या सोबत दाढ दुखी होत असेल तर अश्या वेली देखील कापूर ठेवावा अश्याने तुम्हाला होणारे दुखणे कमी होऊ लागेल. कापूर हा एक नैसर्गिक वेदना शामक आहे. कापूराच्या धुरीने डोळ्यांची होणारी आग आणि खाज नक्कीच कमी होईल. अस्थमा तसेच श्वास घेण्यास आपत्ती असणार्या लोकांनी कापूराची धुरी घ्यावी अश्याने सर्व विकार लगेच नाहीसे होतील. तसेच फक्त हिंदू धर्मात नव्हे तर बाकीच्या धर्मातील लोक देखील सायंकाळी कापूर पेटवून घरातील वातावरण सकारात्मक बनवतात. कापूराची उत्पत्ती ही स्वतः देवाधि देव महादेव म्हणजेच शंकर भगवान यांनी केली आहे आणि असा वर दिला आहे की जे पूजेच्या समयी कापूर पेटवतात त्यांना शंभर अश्व मेध करण्याचे पुण्य मिळेल.
आपण पूजा अर्चना करतो पण आपल्याला याचा संपूर्ण फायदा मिळत नाही. अनेक वेळा मेहनतीचे फळ आपल्या पदरात पडत नाही.घरातील सुख शांती विस्कळीत झालेली असते. दिवस रात्र अतोनात कष्ट करून देखील घरात पैसा टिकत नाही. शिक्षण क्षेत्रात देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागते सोबतच कामा धंद्यात देखील हवे तसे यश मिळत नाही. अश्या वेळी आपल्या धर्म ग्रंथात म्हणजेच गरुड पुराणात या सर्व समस्यांचे समाधान म्हणून कापूराच्या संबंधित काही माहिती दिली गेली आहे.
ही माहिती आपल्या पैकी सर्वांच्या कामाची आहे. कष्टा, दुःख आणि नैराश्याचे दिवस आता आयुष्यातून कायमचे निघून जातील. दुधाचे डोंगर जातील आणि सुखाची सोनेरी पहाट तुमच्या आयुष्यात येईल.मित्रांनो घरात अश्या काही जागा असतात ज्या ठिकाणी कापूर पेटवून ठेवल्यास तुम्हाला सर्व बाजूंनी नफा होवू लागेल. यशाचे दरवाजे आपो आप उघडतील आणि माता लक्ष्मीची कृपा व शुभ दृष्टी आपल्या वर सदैव राहील.
1. मित्रांनो आज काल भांडण तर प्रत्येक घरत होतच असते मात्र काही वेळा ही भांडणे नाती तोडतात. त्याच्या बरोबर अनेक ठिकाणी तर रोज भांडण तंटे होतात. कधीच घरात शांती नांदत नाही. छोट्या छोट्या गोष्टींनी मोठे कडाक्याचे भांडण होते. अश्या वेली चार कापूराचे तुकडे घ्यावेत व घराच्या चार कोपर्या लगत ठेवून द्यावे. जर होत असेल तर हे चार तुकडे घरच्या बाहेर ठेवलेत तरी हरकत नाही. हे पेटवू नयेत तर असेच ठेवून द्यावे. हा उपाय घरातील कोणत्या होऊ सदस्याने केला तरी चालेल. हा उपाय करताच घरातील भांडण तंटे आपो आपच नाहीसे होतील आणि घरातील एकोपा वाढेल आणि सुख शांतीचा वास होऊ लागेल.
2. त्याच बरोबर व्यवसायात यश मिळत नसेल, गिर्हाईक दुकानाकडे फिरकत नसेल व कारखाने देखील ठप्प पडले असतिल. या सर्व समस्यांनी तुमची मानसिक स्थिती बिघडली असेल अश्या वेळी मित्रांनो काचेच्या बरणीत सात कपूरच्या तुकड्यांना ठेवा यात चार तुरटीचे तुकडे टाका सोबतच खडी मीठाच्या दोन तुकड्यांना ठेवा असे एकत्र करून ही बरणी दुकान, कारखाना अथवा काम करण्याच्या ठिकाणी पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी ठेवून द्या.
या उपायाने आपल्या व्यवसाय धंद्याला चालना मिळेल, आपल्या दुकानाकडे गिर्हाईक स्वतःच आकर्षित होऊन वळू लागतील. हातात पैसा खेळू लागेल. गमावलेले सर्व काही अगदी महिन्या भरातच तुम्ही परत मिळवाल. या नंतर ही सर्व सामग्री एका सुती फडक्यात गुंडाळून वाहत्या पाण्यात विसर्जित करा. आता ही काचेची बरणी पाण्याने स्वच्छ करून यात पुन्हा ही सामग्री भरून ठेवा. हा उपाय अतिशय गुणकारी आहे याला आपल्या आचरणात नक्कीच आणून पहा.