भगवान शंकर कायम प्रसन्न असतात या राशीच्या लोकांवर; यांच्या घरची तिजोरी कधीच खाली होत नाही.!

अध्यात्म

मित्रांनो अनेक वेळा जीवनभर इमानदारीत काबाड कष्ट करून देखील आपल्याला यशाचे शिखर गाठता येत नाही. आपण या गोष्टीचा अनुभव आपल्या खासगी जीवनात नक्कीच घेतला असेल या सोबतच आपल्या आजू बाजूला देखील अनेक असे लोक आहेत ज्यांनी आयुष्यभर काम केले परंतू अजून ही गरिबी काही त्यांचा पाठलाग सोडत नाही. साठ वर्षे सर्विस करून देखील जेवढे नाव लौकिक आणि पैसा जमा होत नाही त्याच्या पेक्षा किती तरी पटीने जास्त पैसा काही लोक अगदी काही महिन्यात कमवतात.

तुम्ही कधी विचार केला आहे असे का होत असेल..? आपले हिंदू धर्म शास्त्र सांगते की अश्या लोकांवर देवाची अनोखी कृपा असते. राशी भविष्य असा एक विषय ज्याची मूळे खोलवर माणसाच्या नशिबा सोबत जोडली गेलेली आहेत. हे कसे तर एखाद्या व्यक्तीचा चांगला आणि वाईट काळ हे ग्रहांच्या स्थानावर अवलंबून असते. जर ग्रह आणि तारे योग्य स्थानी विराजमान असतील तर यशाचे दरवाजे कायमचे तुमच्यासाठी उघडे असतात. मात्र याच्या प्रमाणे जागा अयोग्य असेल तर मात्र अनेक संकटांना तोंड द्यावे लागू शकते.

मित्रांनो भारतीय ज्योतिष शास्त्राच्या अनुसार प्रत्येक राशीला एक स्वामी ग्रह असतो. त्याच बरोबर त्या राशीला आपले असे एक आराध्य दैवत देखील असते. तर आज आपल्या या लेखात आपण अश्या राशीं बाबत जाणून घेणार आहोत ज्यांचे आराध्य दैवत स्वतःच देवाधि देव महादेव शिव शंकर आहेत. असे म्हटले जाते जर व्यक्तीने राशीच्या अनुसार देवाची पूजा केली तर त्यांच्या जीवनात सुख आणि समृद्धी नक्की येते. तसेच त्यांच्या जीवनात शांती आणि आनंद नांदू लागतात. त्याच प्रमाणे आपणच अश्या राशीं बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे आराध्य देव शिव शंकर आहेत.

हे वाचा:   रोज देवपूजेत दिवा लावताना बोला हे 3 शब्द; कितीही मोठा शत्रू असुदे तुमच्यासमोर गुडघे टेकेलच.!

ज्योतिष शास्त्राच्या अनुसार मित्रहो कर्क राशीचे आराध्य दैवत भगवान शिव शंभू आहेत. या राशीवर चंद्राचे राज्य आहे यांची स्मरणशक्ती खूप तल्लख असते. आपल्या कामात हे खूप निपुण असतात आणि हातातले काम संपल्या शिवाय यांना चैन पडत नाही. अश्या स्वभावामुळे त्यांची जागो जागी प्रशंसा देखील केली जाते. अश्या लोकांना समूहात रहायला आवडते तसेच कोणती ही व्यक्ती त्यांच्याकडे लगेच आकर्षित होते.

कामाच्या ठिकाणी वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत यांचे चांगले जुळते आणि सबंध तयार होतात. अश्या मन मिळावू स्वभावामुळे या राशीच्या लोकांचे अनेक मित्र देखील बनतात. जिथे जातील तिथे स्वतःच्या नावाची एक निराळी ओळख या कर्क राशीचे लोक तयार करतात. त्याच बरोबर मित्रांनो हे लोक समाजात एक वेगळी ओळख तयार करून सन्मान देखील मिळतात. ज्योतिष शास्त्राच्या अनुसार हे लोक खूप जास्त हट्टी असतात आणि मनासारखे होत नाही तोपर्यंत हे लोक मागे सरत नाहीत. होय जी गोष्टी मिळवायची ठरवली की ती गोष्टी कोणत्या ही परिस्थिती प्राप्त करून राहतात.

हे वाचा:   महिलांनी सायंकाळी किंवा सकाळी या गोष्टी केल्या तर घरात घडतात या अपशकुन गोष्टी, महिलांनी नक्की ध्यानात ठेवाव्यात या काही गोष्टी यामुळे होऊ शकते घरात असे काही.!

कर्क रास असलेले लोक बोलण्याच्या बाबतीत पटाईत असतात. हे आपल्या बोलण्याच्या कौशल्याने अगदी कमी वेळात कोणाला ही आपलेसे करून घेतात. आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि वाणीच्या जोरावर हे आयुष्यात खूप पुढे जावू शकतात सोबतच भरपूर पैसा देखील कमवतात. या राशीचे लोक जसे पैसे कमवण्यात माहीर आहेत त्याच प्रमाणे पैसे खर्च करताना देखील पुढचा मागचा अजिबात विचार करत नाहीत.

या कारणामुळे हे लोक पैसे साठवून ठेवू शकत नाहीत. स्वतः च्या सुख आणि सोयीवर हे खूप पैसे वापरतात. तरी देखील त्यांच्या कडे पैशाची कमतरता कधीच नसते. कर्क राशीचे लोक समाजातील लोकांशी चांगले सबंध ठेवतात. आपल्या घरच्या सर्व सदस्यांवर यांचे बारीक लक्ष्य असते आणि यांचे आपल्या कुटुंबावर प्रेम देखील तेवढेच असते. नोकरी धंद्यात देखील हे कधीच आळसाने काम करत नाहीत त्यामुळे त्यांना यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. जी गोष्ट बोलतात ती करून दाखवण्याची हिम्मत या राशीच्या लोकांकडे असते. सोबतच एकदा बोलतात त्यावरच ठाम राहतात. कर्क रास असलेल्या लोकांनी देवाधि देव महादेव यांची पूजा अर्चना करावी. याने तुम्हाला सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी मदत मिळेल.