सर्व पापातून व्हाल मुक्त जर श्रावणात कराल या वस्तूचे दान, महादेवाच्या कृपेने होईल सर्व इच्छा पूर्ण.!

अध्यात्म

श्रावण महिना सुरु झाला आहे. अनेक लोकांनी संपूर्ण महिनाभर उपवास धरला असेल. श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची उपासना केली जाते. श्रावण महिना भगवान शिव यांना खूप प्रिय आहे आणि म्हणून महादेवाची पूजा, जल अभिषेक, शिव कथा वाचणे आणि ऐकणे याला खूप महत्त्व दिले जाते.

पण यासोबतच श्रावन महिन्यात काही विशेष गोष्टी दान करण्याचे शिव पुराणातही लिहिले आहे. हिंदू धर्मात दानधर्म यांना खूप महत्त्व दिले गेले आहे. हे आपल्याला केवळ आनंद आणि समृद्धीच देत नाही तर संपत्ती, वैभव आणि समृद्धी देखील देत असते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की श्रावण महिन्यात कोणत्या वस्तू दान कराव्यात आणि त्यातून तुम्हाला काय फायदा होईल.

मीठ दान: मीठ नेहमी दानधर्माच्या गोष्टींमध्ये समाविष्ट केले जाते. वास्तुशास्त्रातही मीठाला महत्त्व दिले गेले आहे, असे मानले जाते की मीठ सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. जर तुम्ही श्रावण महिन्यात एखाद्या गरीब व्यक्तीला मीठ दान केले तर तुमच्या घरात सुख आणि समृद्धीचा प्रवेश होतो. एवढेच नाही तर जर तुम्ही बराच काळ वाईट काळाला सामोरे जात असाल तर ते सुद्धा निघून जाते.

हे वाचा:   रात्रीचे कपडे वाळत घालत असाल तर सावधान; घडू शकतात हे गंभीर परिणाम.!

तुपाचे दान: तूप अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानले जाते. यात भरपूर औषधी गुणधर्म देखील आहेत. तूप औषध म्हणून देखील वापरले जाते. भगवान शंकरालाही तुपाने पवित्र केले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही श्रावण महिन्यादरम्यान तूप दान केले तर तुमच्या शरीराची रोगराई बरी होऊ शकतो. जर कोणताही आजार तुम्हाला बराच काळ त्रास देत असेल, तर त्यातही तूप दान केल्यास तुम्हाला आराम मिळू शकतो.

काळे तीळ दान: जर तुम्ही श्रावण महिन्यात काळे तीळ दान केले तर राहू-केतू आणि शनीचे वाईट परिणाम टाळता येतात. विशेषतः जे लोक शनीची साडेसाती, पितृ दोष इत्यादींनी त्रस्त आहेत, अशा लोकांनी उपाय म्हणून शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावेत आणि एखाद्या गरीब व्यक्तीला काळे तीळ दान करावे.

हे वाचा:   लोक तुम्हाला भाव देत नाहीत का.? स्वतःची किंमत लोकांसमोर कशी वाढवायची.? स्वामी सांगतात...

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *