स्वयंपाका दरम्यान अशा काही चुका केल्यास शरीरात निर्माण होतात अनेक आजार; निरोगी राहायचे असेल तर अशा चुका करणे टाळा.!

आरोग्य

प्रत्येक व्यक्ती हा दररोज उठून कामावर जात असतो प्रत्येकाचे काही ना काही महत्वाचे कामे असतातच परंतु प्रत्येकाला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याला कोणालाच वेळ नसतो आपण आपल्या कामांमधून काही वेळ काढून आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा विचार देखील करत असतो. अनेक लोक तर दररोज सकाळी उठल्यानंतर थोडे चालणे आणि व्यायाम करणे अशा गोष्टी करत असतात.

परंतु लोकांना एवढ्या साऱ्या गोष्टी करूनही काही शारीरिक समस्या उद्भवत असतात. काही आरोग्याच्या समस्या अशा असतात त्यांच्यावर आपण दवाखान्यामध्ये जाऊनही समाधान मिळवू शकत नाही. ज्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत असतो. या आजारांमुळे आपले भरपूर पैसे देखील वाया जात असतात.

परंतु तुम्हाला माहिती आहे का की आपल्या शरीरामध्ये आजार निर्माण होण्याचे सर्वात मुख्य कारण काय आहे तर ते आहे आपले खानपान. जर आपण आपले खानपान योग्य ठेवले तर आपल्याला कधीच शारीरिक विकार होणार नाहीत. कधीच आपण आजारी पडणार नाही.

हे वाचा:   तुमच्या किचन मध्ये लपले आहे वजन कमी करण्याचे राज, हे काही पदार्थ तुमचे वजन झटपट कमी करेल.!

आपण जेवण बनवताना म्हणजे स्वयंपाक करताना अशा काही चुका केल्या नाही तर कोणताही आजार आपल्याला होऊ शकत नाही. आजच्या या लेखामध्ये आपण या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या स्वयंपाका दरम्यान कधीही करू नये. चला तर मग आपण या गोष्टी सविस्तरपणे पाहुयात. जर हा लेख तुम्हाला आवडला तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा.

1. भाजीमध्ये जास्त तेल वापरणे: भारतीय संस्कृतीमध्ये तेल हे खूपच जास्त प्रमाणात वापरले जाते. स्वयंपाकात तेलाचा खूपच जास्त प्रमाणात वापर केला जातो परंतु अति प्रमाणात तेल खाणे हे शरीरासाठी खूपच घातक असते. शरीरासाठी जेवढे कमी तेल असेल तेवढे उत्तम असते त्यामुळे स्वयंपाक करताना खूपच कमी तेल वापरावे.

2. आजच्या या काळात अनेकांना मसाल्याचे पदार्थ खायला खूप आवडत असतात. परंतु अति मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला अनेक प्रकारचे विकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे साधे घरगुती पद्धतीने बनवलेले किंवा मिरच्या द्वारे बनवलेले साधे मसाले बनवून स्वयंपाकामध्ये वापरावे यामुळे काहीही हानी पोहोचत नाही.

हे वाचा:   रोज जेवणात तूप खाणारे एकदा नक्की वाचा.! तुपाचे पचन शरीरात कसे होत असते.? एकदा नक्की वाचा.!

3. आपण बाजारामधून अनेक प्रकारच्या भाज्या विकत आणत असतो परंतु भाजी बनवताना आपण एक महत्त्वाची चूक करत असतो ती म्हणजे, भाज्या खूप वेळ शिजवून देत असतो. भाज्या ह्या जास्त वेळ शिजवत ठेवल्यामुळे त्यामध्ये असलेले जीवनसत्त्वे नष्ट होत असतात. त्यामुळे कधीही जास्त वेळा पर्यंत भाज्यांना शिजवू देऊ नये.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *