आजच्या काळात, जीवनशैली आणि खाण्याच्या मार्गामुळे, किती रोग उद्भवले हे माहित असेलच. पूर्वी टक्कल पडण्याची समस्या ही वयस्कर माणसांमध्ये दिसत होती. पण आता ही समस्या किशोरवयीन मुलांपासून सुरू झाली आहे. यामुळे आपले वय वाढलेले दिसते. याचा व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो व अशा लोकांमध्ये स्वतःवरचा विश्वास कमी झाल्याचे आढळते.
केसांच्या समस्येने जेवढा मानसिक तणाव स्त्रियांना होतो, तितकाच पुरुषांनाही असतो. आजकाल वैज्ञानिक पद्धतीने हेअर टान्सप्लान्टेशन, स्टेम सेल, लेझर ट्रीटमेंट आणि हेअर विविंग करून टक्कलावर उपचार केले जातात. केसांची वाढ ॲनाजेन, फॅटाजेन व टेलोजेन या तीन टप्प्यांत होते. आजार, औषधे किंवा अनुवांशिकता अशी विविध कारणे केस गळण्याच्या मुळाशी असू शकतात.
काही औषधे जसे कर्करोग, आर्थरायटिस, नैराश्य, हृदयविकार आदीवर वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे केस गळतात. मुलेमुली ताण-तणाव, प्रदूषण, वजन कमी करण्याचा दबाव, असंतुलित आहार, विविध प्रकारची व्यसने, विचित्र हेअर स्टाइल्स करण्याचा अट्टाहास या कारणांमुळे कमी वयातच केस गळण्यासारख्या समस्यांना सामोरे जात आहेत.
पुरुषांप्रमाणे स्त्रियांमध्येसुद्धा डोक्याला टक्कल पडू शकते. यात आनुवंशिकता असू शकते. ज्या व्यक्तींच्या घरी आईच्या किंवा वडिलांच्या नातेवाईकांनामध्ये टक्कल असते, त्यांना हा त्रास उद्भवू शकतो. शरीरात तयार होणारे अँड्रोजेन हे संप्रेरक यास कारणीभूत असते. या संप्रेरकाचा प्रभाव केसांच्या मुळांवर पडतो व अशी मुळे हळूहळू बारीक होतात. केसांच्या जाडीवरदेखील याचा परिणाम होतो, त्यामुळे केस विरळ होतात.
या प्रकारात केस प्रत्यक्ष गळून पडत नाहीत; परंतु केसांमध्ये फटी पडून आतील त्वचा दिसायला लागते. स्त्रियांमध्ये जर पॉलिसिस्टीम ओव्हरीज असतील तर ही लक्षणे आढळून येतात. तसेच, रजोनिवृत्तीनंतर शरीरातील इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्याने सुद्धा टक्कल पडू शकते. असे काही रोग आहेत ज्यांची नावे आपण पहिल्यांदाच ऐकत असतो. परंतु जर आपण आपला आहार सुधारला तर आपण आजारांपासून दूर राहू शकतो.
मित्रांनो, आज या पोस्टमध्ये, आम्ही तुम्हाला टक्कल काढण्यासाठी किंवा पुन्हा नवीन केस वाढविण्यासाठी एक उपाय सांगणार आहोत. जे फार कमी लोकांना माहित आहे. आणि हे खूप सोपे आहे. तर मग आपण जाणून घेऊया ती कोणती गोष्ट आहे…
साहित्य: – कोलगेट आणि ईनो, खोबरेल तेल
कृती: – केस नसलेल्या डोक्याचा भाग स्वच्छ करा, कोलगेट काढून त्या जागेवर लावा आणि वरुन ईनो लावा, आता बोटाच्या सहाय्याने हळू हळू हे मिश्रण जेथे केस नाहीत त्या जागेवर लावा. कोलगेट आणि ईनो व्यवस्थित मिसळल्यावर हलक्या हाताने हे मिश्रण लावा आणि नंतर थोड्या वेळासाठी किंवा ते कोरडे होईपर्यंत ठेवा, नंतर ते धुवा.
मधाच्या सुक्या पोळ्यामध्ये नारळ तेल गरम करा आणि पोळ्याला काळे झाल्यावर ते बाहेर काढून एका बाटलीमध्ये ठेवून हे तेल टाळूवर लावल्यास तुमचे केस जलद वाढतीळ. ईनो आणि कोलगेट यांचे मिश्रण आपल्या विरामित फॉलिकल्स पुन्हा उघडतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.