दुबळ्या पतल्या लोकांनी आजपासून या दोन वस्तू खाणे सुरू करा.! भरभर वजन वाढू लागेल.! हे दोन पदार्थ तुमचे शरीर धष्टपुष्ट करून टाकेल.!

आरोग्य

मित्रांनो आपले शरीर धष्टपुष्ट व मजबूत असावे व वजन योग्य मात्रेत असावे असे सगळ्यांनाच वाटत असते. आपले शरीर निरोगी व बळकट असले तर आपण सगळ्यात वेगळे व आकर्षक दिसतो. वजन वाढवण्यासाठी आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो शरीर सुडोल व शक्तीशाली बनविण्यासाठी अनेक जण मेडिकल स्टोर मधले अनेक उत्पादनांचा वापर करतात.

मात्र या पदार्थांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. अनेक वेळा आपले वजन वाढत नाही व चार चौघात आपले व्यक्तिमत्व पडून दिसते आणि तुम्ही सुद्धा सुडोल व बळकट शरीराची स्वप्न पाहत असाल व तुम्हाला देखील योग्य वजन हवे असेल तर तुमच्यासाठीच आज आम्ही हा लेख घेऊन आलो आहोत. तुमच्यासाठी आम्ही असे नैसर्गिक उपाय घेऊन आलो आहोत जो तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करेल.

हे उपाय जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. खजूर या घटकाला आपण सर्वच ओळखतो. खजूर हे अत्यंत शक्ती वर्धक असतात. प्र’सुती झालेल्या महिलांना खजूर आवर्जून खायला दिले जातात. खजूरामध्ये मोठ्या प्रमाणात लोह व फोस्फेट सोबतच विविध घटक असतात जे आपल्याला वजन वाढवण्यासाठी मदत करतात. हा उपाय तयार करण्यासाठी खजूर फोडून त्यातील बिया काढून टाका.

पुढे यात शुद्ध गायीच्या तूपाला भाजून भरा. आता अश्या प्रकारे हे खजूर सकाळ व संध्याकाळ दोन वेळा घ्या. याच्या सेवनाने तुमचे वजन वाढू लागेल व तब्येत देखील चांगले बनेल. व्यायाम करणार्या लोकांनी हा उपाय नक्की करा. या सोबतच केळे खाणे देखील वजन वाढीला मदत करते. केळं हे एक स्वस्त आणि आरोग्यासाठी मस्त फळ आहे.

हे वाचा:   तुळशीच्या बुडात टाकली दहा रुपयांची ही वस्तू, तुमची तुळस पूर्ण हिरवीगार आणि टवटवीत होईल.! नक्की वाचा कशी.?

केळ्यामध्ये पोटॅशियम, विटामीन, फायबर्स, कार्बोहायड्रेट आणि जीवनसत्व क असते केळ्याची चव गोडसर आंबट असते ज्यामुळे लहान मुलांनाही केळी खूप आवडतात. शिवाय केळं सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारं फळ आहे. केळीमध्ये पुरेसे पोषकतत्त्व असल्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचे चांगले परिणाम पटकन दिसून येतात.

केळीमध्ये पोटॅशिअम असल्यामुळे उपाशीपोटी एक केळं खाल्यास तुम्हाला त्वरीत एनर्जी मिळते. केळं खाण्याचा शरीरावर तर चांगला परिणाम होतोच शिवाय त्यामुळे त्वचेचंही आरोग्य सुधारते. केळ्यामुळे तुमचे वजन भरपूर वाढते अशी एक समज आहे. खाण्यास काहीच हरकत नाही. शिवाय जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर दररोज एक केळं खाण्यासही काहीच हरकत नाही.

एकतर केळं खाण्यामुळे तु्म्हाला सतत भुक लागणार नाही आणि खालेल्या अन्नाचे पचनही व्यवस्थित होईल. केळ्यामधील पोषक तत्त्वांचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर चांगला परिणाम होतो. केळ्यातील घटकांमुळे तुमच्या रक्तदाबावर नियंत्रण राहते आणि चांगला परिणाम तुमच्या किडनीच्या कार्यावर होतो. केळ्यात पोटॅशिअम हे विघटनशील असल्यामुळे तुमची किडनी अथवा मू’त्रपिंड यामुळे निरोगी राहण्यास मदत होते.

हे वाचा:   अशा प्रकारे केस काळे केले तर पुन्हा पांढरे होणार नाहीत, केस पांढरे असतील तर एकदा उपाय जाणून घ्याच.!

ज्यांना मू’त्रपिंडाचे विकार आहेत त्यांच्यावर केळं खाण्याचा प्रयोग केल्यामुळे चांगला फरक जाणवल्याचे अनेक संशोधनात आढळून आलेले आहे. त्यामुळे मू’त्रपिंडाचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी दररोज एक केळं खाणं नक्कीच फायद्याचं ठरू शकते.तसेच मनुके पाण्यात भिजवून मग खाणे देखील तुमचे वजन वाढवण्यास खूप मदत करेल.

मनुके हे कॅल्शियम व विटामीन यांनी भरलेले असतात. यांच्या सेवनाने तुमचे वजन तर वाढेलच मात्र पचन तंत्र देखील नियमित कार्यरत होईल. अन्न नीट प्रकारे पचन होण्यास मनुके मदत करतात. आम्ल पित्ताचा जर त्रास वारंवार जाणवत असेल तर सुके मनुके खा याने तुम्हाला नक्की आराम जाणवेल. या दिलेल्या पदार्थांचे सेवन नियमित करुन तुम्ही तुमचे शरीर सुंदर व धष्टपुष्ट बनवू शकता व वजन देखील त्वरित वाढू लागेल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.