अनेक वर्षापासून छाती जड पडलेली आहे का.? छातीतली सर्दी कायमची मोकळी होईल.! आयुष्यात कधी कफ आणि सर्दी होणार नाही.!

आरोग्य

सध्या खूप थंडी सुरू झाली आहे. थंडी सुरु झाली असता आपल्या सर्वांना सर्दी-खोकला पडसे डोकेदुखी या समस्यांना एकदा तरी सामोरे जावेच लागते. त्याचा वेळीच उपाय केला नाही तर ही समस्या वाढत जाऊन असह्य होते. यावर आपण गर्मी देणाऱ्या उष्ण वस्तूंचे सेवन करतो त्यामुळे गॅस एसिडिटी अपचनाचे वेगळेच रोग उद्भवतात. असं आपल्यासोबत होऊ नये यासाठी आम्ही आज एक रामबाण उपाय तुम्हाला सांगणार आहोत.

या उपायामुळे तुमची सर्दी खोकला हे तर ठीक होईलच परंतु कोणताही काढे घेतल्यामुळे शरीरात होणारी उष्णता भडकते त्यातून होणारे त्रास हे सर्व टळणार आहे. पेरूचे पान यासाठी आपल्याला लागणार आहे. पेरू खाण्याचे फायदे आपण सर्व जाणतोच. पण पेरूची पानेही किती गुणकारी आहेत हेही आपल्याला आज समजेल. या पानांमध्ये विटामिन सी आणि लोह प्रचंड प्रमाणात असते.

सर्दी मध्ये तुम्ही या पानांचा काढा बनवून पिल्यास तुम्हाला त्वरित फरक पडेल. घसाच्या तक्रारींवर हे अत्यंत फायदेशीर आहे. पेरूच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट, अँटीबॅक्टरियल आणि anti-inflammatory गुणधर्म असतात. फायबरचे प्रमाण भरपूर असते. आपल्याला कोणत्याही इन्फेक्शन पासून दूर ठेवण्याचे गुणधर्म या पानांमध्ये असतात.

हे वाचा:   काळया झालेल्या मानेला औषध काय.? एका दोन रुपयाच्या पुडीत तुमची मान गोरीपान होऊन जाईल.! लिहून घ्या.!

पेरूची सात ते आठ स्वच्छ ताजी पाने घ्या. ती स्वच्छ पाण्याने चार पाच वेळेस धुऊन घ्या. दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवा. आणि अर्धवट उकळलेले दिसता त्यात पेरुची स्वच्छ धुतलेली कच्ची कोवळी पाने टाकावीत. पानं टाकल्यानंतर सुमारे दहा ते पंधरा मिनिट हे पाणी मंद आचेवर उकळावे. खूप जास्त प्रमाणात खोकला असल्यास त्या पाण्यामध्ये चार ते पाच काळीमिरी घालाव्या.

सोबतच तीन ते चार लवंगा घाला. कितीही भयंकर सर्दी खोकला शिंका येत असतील तरीही त्या त्वरित जातील, या काढ्याच्या सेवनाने. हा काढा एकदाच घेतल्याने 50 टक्के फरक तुम्हाला जाणवेल. हा काढावा तुम्हाला सलग तीन दिवस, दिवसातून दोन वेळा घ्यायचा आहे. पोटामध्ये उष्णता भडकली असल्यास, याच्या सेवनाने तुम्हाला फायदाच होईल.

हे वाचा:   खर्च आला सगळा पंधरा रुपये पण ब्युटी पार्लर मध्ये जे होऊ शकत नाही ते हा साधा सोपा उपाय करून दाखवतो.! चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी नक्की करा.!

तुम्ही जेवढे पाणी घातले होते त्याच्या अर्ध पाणी राहील तितका वेळ तुम्हाला हा काढा उकळायचा आहे. या काढ्याचे अजून फायदे म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात राहते, शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते, जुलाब व केस गळती चा तक्रारींवर हा काढा फायदेशीर आहे. टीप : हा काढा गाळून घ्या. यात तुम्ही मध घालू शकता.

लिंबू घालू शकता. घशामध्ये जास्त त्रास होत असेल तर मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.