या काही चुका केल्या तर किडनीमध्ये मुतखडा नक्की झाला म्हणून समजा.! या चुका आयुष्यात कधीच करू नका, आयुष्यात तुम्हाला मुतखडा होणार नाही.!

आरोग्य

मित्रांनो काय केल्याने किडनी स्टोन पासून आपण स्वतः ला वाचवू शकतो ? किडनी स्टोन म्हणजेच किडणीमध्ये दगड असणे. ही गोष्ट जेवढी ऐकायला भयंकर वाटते त्यापेक्षाही खूप जास्त भयंकर याचे परिणाम आहेत. कारण ज्या व्यक्तीला हा आजार होतो त्यांचं उठणं, बसणं कठीण होऊन जातं. किडणी स्टोन होतो कसा ? कोणत्या व्यक्तींना होऊ शकतो ? आणि जर हा आजार कोणाला झालाच तर याच्यावर उपाय काय?

तर हे सर्व आज आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम किडणी काय आहे टीचर काय काम आहे हे जाणून घेऊया. किडणीचे प्रमुख कार्य शरीरातून अवशिष्ट आणि तरल पदार्थांना युरिन म्हणजेच लघवीवाटे बाहेर काढणे हे असते. याशिवाय किडणी आपल्या शरीरामध्ये मीठ, पोटॅशिअम व ऍसिडचे प्रमाण नियंत्रित करण्याचे काम करते त्याचबरोबर किडणीमधून ते हार्मोन्सही बाहेर येतात जे आपल्या शरीराला कार्य करण्यात मदत करतात.

म्हणून जेव्हा एकादी व्यक्ती जास्त दा’रू पिऊ लागते तेव्हा त्याचा परिणाम किडणीवर होतो. कारण दा’रूसारख्या तरल पदार्थाला किडणीच फिल्टर करते आणि त्याला फिल्टर करता करता किडणीच खराब होऊ लागते. डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे जर तुम्ही अशा ठिकाणी रहात असाल जिथे गरम जास्त होते तर किडणी स्टोन होण्याचा धोकाही त्यांना जास्त असतो. जर तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी ठेवले, कोल्ड ड्रिंक्स व जंकफूड जास्त खात असाल तर किडणीमध्ये स्टोन होण्याचा धोका वाढतो.

काही कामे अशीसुद्धा असतात ज्यामध्ये लोकांना गरमीच्या सामना करावा लागतो त्यामुळे त्यांना डिहायड्रेशन होते अशा लोकांना स्टोन होण्याचा धोका निर्माण होतो. जर एखादया व्यक्तीला युरिन इन्फेक्शन असेल किंवा किडणीच्या काही समस्या असतील अशा व्यक्तींना सुद्धा किडणी स्टोन होण्याची शक्यता असते. तसेच ज्या व्यक्तींना मेटॅबॉलेट डिसऑर्डर असते जसकी काही हार्मोनल डिसऑर्डर व जे व्यक्ती लठ्ठपणाला स्मोरे जात आहेत अशा व्यक्तींना सुद्धा किडणी स्टोन होण्याची शक्यता असते.

हे वाचा:   ही वनस्पती देवानेच धरती वर पाठवली आहे, या वनस्पती मध्ये आहे अनेक आजारांना गायब करण्याची शक्ती.!

परंतु आश्चर्य चकित करण्यासारखी गोष्ट तर ही आहे, जे व्यक्ती आरामदायी जीवन जगत असतात म्हणजेच ज्या व्यक्तींना कोणतेही फिझिकल ऍक्टिव्हिटी किंवा मेंटल ऍक्टिव्हिटी करवी लागत नाही अशा व्यक्तींना सुद्धा किडणी स्टोन होण्याची शक्यता असते. निश्चितच आपल्यातील काही लोक या आजारापासून पीडित असतील. किडणी स्टोन पासून स्वतःला वाचवण्यासाठी आपल्यला जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे असते. म्हणजेच २ ते ३ लिटर पाणी प्रत्येक व्यक्तीने प्यायलेच पाहिजे.

परंतु एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, भरपूर पाणी एकदाच नाही यायचे आहे. थोडं थोडं पाणी सतत प्यायचं आहे जेणेकरून आपल्या शरीराला काही नुकसानही होणार नाही व आपली भुकदेखील मरणार नाही व आपल्याला पाण्याचे गुणदेखील प्राप्त होतील. तसेच आपण जास्तीत जास्त फळे व भाज्या खाल्ल्या पाहिजे. विशेषतः आपल्यला सिट्रेक फळे खाल्ली पाहिजे म्हणजे लिंबू, संत्रे, मोसंबी इत्यादी. आता आपण काय नाही खायला पाहिजे याबाबद्दल माहित करून घेऊया.

हे वाचा:   वर्षानुवर्षे जुनी साचलेली पायावरची घाण आणि मळ काही मिनिटात साफ करेल हा जबरदस्त उपाय..!

आपल्याला आपल्या जेवणात मिठाचे प्रमाण कमी करायला हवे. प्रोसेस्ड व लाल चिकन सुद्धा खाऊ नये. ऑक्सिलेट कन्टेनिंग पदार्थ खाऊ नये. ऑक्सिलेट हे एक प्रकारचे तत्व असते ज्यामध्ये स्टोन बनतं आणि हे तत्व आपल्याला शेंगदाणे, पालक, चॉकलेट यामध्ये आढळून येतो आणि आपण अशा प्रकारचे पदार्थ नाही खाल्ले पाहिजे. सांगितल्या गेलेल्या गोष्टींचे नीट पालन केल्याने आपल्याला स्टोन होणार नाही. परंतु जर आपल्याला आधीच स्टोन झाला असेल तर काय करायला हवे?

याच्यावर उपचार करण्याच्या २ पद्धती आहेत औषधे व ऑपरेशन. औषधे फक्त ५ते७ mm च्या स्टोन साठी असते. यापेक्षा मोठया स्टोनसाठी ऑपरेशन करावे लागते. याचा ऑपरेशन दुर्बिणीने केला जातो. जर स्टोन १ते२ cmचा असेल तर अशा परिस्तिथीमध्ये ESWL चा प्रयोग केला जातो. यामध्ये किरणांद्वारे स्टोन्सना तोडले जाते आणि त्यानंतर औषधांच्या सहाय्याने याला ठीक करणे जाते. किडणी स्टोन भयंकर आजार आहे परंतु योग्य काळजी घेतल्याने यावर मात करणे अशक्य नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.