इम्युनिटी मजबूत करायची आहे का? मग घरातल्या सगळ्या व्यक्तींना प्यायला सांगा हा काढा, बनवण्यासाठी अत्यंत सोपा कोणीही बनवू शकतो

आरोग्य

आज कालच्या या काळामध्ये आजार म्हटले की प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहत आहे. कारण वेगवेगळ्या व्हायरल इन्फेक्शन ची बाधा आपल्याला होऊ लागली आहे. अशावेळी आपल्या शरीरामध्ये ताकद असणे म्हणजेच इम्युनिटी असणे खूप गरजेचे आहे. कारण शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवली तर शरीराकडून त्या समस्येला लढण्याची ताकद असणे खूप गरजेचे असते.

आजकाल अनेक वेगवेगळे आजार होऊ लागले आहेत या आजारांना लढण्यासाठी आपल्याकडे ढाल असणे गरजेचे आहे. ही ढाल म्हणजे त्या व्यक्तीची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती. ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते तो व्यक्ती त्या आजारांविरुद्ध चांगल्याप्रकारे लढू शकतो. त्यामुळे कधीही आपली इम्युनिटी वाढेल अशा पदार्थांचे सेवन करायला हवे. आजच्या या लेखा मध्ये आम्ही तुम्हाला एक असा काढा सांगणार आहोत जो तुमच्या इम्युनिटी ला सहजपणे वाढवेल.

हे वाचा:   पोटातली सगळी घाण काही सेकंदात मोकळी होईल.! पोटातले सर्व आतडी मोकळी होतील.! डॉक्टर देखील हैराण आहेत.!

हा काढा बनवण्यासाठी आपल्याला दालचिनी व मधाची आवश्यकता भासणार आहे. दालचिनी प्रत्येक घरांमध्ये उपलब्धच असते. मध हा आरोग्यासाठी खूपच उपयुक्त मानला जातो याचे आरोग्यासाठी भरपूर फायदे सांगितले जातात. या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त मानल्या जातात. याच्या उपयोगामुळे आपण नॉर्मल सर्दी-खोकला देखील बरा करू शकतो.

हा काढा बनवण्याची आपण कृती पाहूया. प्रथम गॅस वर एक पातेले ठेवून त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचे आहे. पाणी चांगल्या प्रकारे उकळल्यानंतर त्यामध्ये दालचीनी पावडर टाकावी चांगल्या प्रकारे या पावडरला एकत्र होऊ द्यावे. आता या पाण्याला दोन ते तीन मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे उकळू द्यावे. उकळलेले हे मिश्रण एका कपामध्ये काढून घ्यावे व यामध्ये एक ते दीड चमचा मध टाकावा व याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे आणि गरम गरम याचे सेवन करावे.

हे वाचा:   मोठ्या आवडीने बदाम खात असाल तर, एकदा कसे बनतात तेही वाचूनच जा.!!! तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!

या काढाचे सेवन तुम्ही नियमीत स्वरुपात करू शकता किंवा आठवड्यातून एक ते दोन वेळा देखील करू शकता. याचे सेवन रिकाम्यापोटी करायला हवे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना– आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *