आजकाल अनेक प्रकारचे आजार निर्माण होत आहेत. अशा प्रकारच्या अनेक आजारांमुळे तसेच लहान सहान आजारामुळे देखील आपण खूपच हैरान होऊन जात असतो. अगदी थोडीशी ताप जरी आली तरी आपल्याला काही सुधरत नसते. हे आपल्याला सहन होत नसते. दुखण्यामुळे आपले शरीर हे अतिशय कमजोर होऊ लागते. शरीरामध्ये काही काम करण्यासाठी ऊर्जा राहत नसते.
अशा प्रकारची ही समस्या अनेक लोकांना सहन करावी लागत असते. अशा प्रकारच्या या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे एनर्जी ट्रेनिंग घेऊन बघत असतो जेणेकरून दुखण्यामुळे निर्माण झालेली कमजोरी निघून जाईल आपल्या शरीरामध्ये एनर्जी येत राहील. परंतु याने आपल्याला काही फरक पडत नाही. पण चिंता करण्याची काही गरज नाही आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी यावर एक छोटासा उपाय घेऊन आलो आहोत.
हा उपाय अतिशय सोपा असून तुम्ही घरगुती पद्धतीने देखील करू शकता. या उपायामुळे दुखण्यामुळे आलेली कमजोरी, थकवा सर्व जाईल. तुम्ही एकदम अगोदरच्या सारखे व्हाल यात काही शंका नाही. चला तर मग पाहूया हा उपाय कशाप्रकारे केला जाऊ शकतो, हा उपाय करण्याची योग्य पद्धत व या उपायामुळे आपल्याला कसा फायदा होतो हे सविस्तरपणे पाहूया.
हा उपाय करण्याची आपण सर्वप्रथम कृती पाहूया. गॅसवर एक ग्लासभर पाणी ठेवायचे आहे. चांगल्या प्रकारे पाणी उकळल्यानंतर यामध्ये घरामध्ये असलेला एक मसाल्याचा पदार्थ टाकावा तो म्हणजे जीरा. जीरा मध्ये असे तत्व असतात जे आपल्या शरीराला इम्युनिटी पावर देत असते. या पाण्यामध्ये एक चमचा भरून जीरा टाकावा. हे पाणी जवळपास अर्धे होईपर्यंत त्याला उकळू द्यावे.
त्यानंतर यामध्ये एक अद्रकाचा छोटासा तुकडा टाकावा. परंतु ज्या लोकांच्या पोटामध्ये आग होत आहे, ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे, तसेच मधुमेहाचा व मूळव्याधाचा त्रास आहे अशा लोकांनी अद्रक अजिबात टाकू नये. या उकळत्या पाण्यामध्ये थोडेसे अद्रक कुटून टाकावे. त्यानंतर यामध्ये तीन ते चार काळीमिरी टाकावी. ज्यावेळी हे चांगल्याप्रकारे थंड होईल त्यानंतर याला गाळून घ्यावे व यामध्ये अर्धा चमचा काळे मीठ टाकावे.
त्यानंतर हा काढा प्यावा. हा काढा पिल्यानंतर तुम्हाला नक्कीच शरीरामध्ये ऊर्जा निर्माण झालेली दिसेल. या सोबतच तुम्हाला थोडेफार अन्न देखील खावे लागणार आहे. चांगला आहार घ्यावा जेणेकरून शरीरामध्ये ऊर्जा संचार करत राहील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.