सलग आठ दिवस मेथी चे पाणी पिल्यानंतर समोर आले असे काही.! मेथीचे पाणी शरीरात नेमके काय करते.?

आरोग्य

 

आपल्या शरीराला अनेक पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. जर तुमच्या शरीराला योग्य पोषक तत्व जर प्राप्त झाली तर तुमचे शरीर आतून आणि बाहेरून सदृढ व निरोगी राहते. आपल्यापैकी अनेक जण बाहेरचे पदार्थ सेवन करत असतात. बहुतेक वेळा खूप सारे पदार्थ सेवन केल्याने आपल्या शरीरामध्ये अनेक विषारी घटक जमा होत असतात.

हे विषारी घटक बाहेर काढण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे प्रयत्न करत असतात आणि तुम्हाला एक गोष्ट माहितीच असेल की हल्ली लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना ऍसिडिटी, पित्त, आम्ल, यासारख्या अनेक समस्या उद्भवत असतात. वेळेवर अन्न पचन न होणे, खाल्लेले व्यवस्थित न पचणे आणि म्हणूनच आंबट, करपट ढेकर येणे यासारख्या गोष्टीमुळे आपल्या संपूर्ण दिवस वाया जातो.

जर तुमच्या बाबतीत देखील काही या घटना घडत असतील तर अजिबात चिंता करू नका. आजच्या लेखांमध्ये आपण अशा एका औषधी आयुर्वेदिक वनस्पती बद्दल म्हणजेच पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत. हा पदार्थ तुम्ही कोणत्याही स्वरूपामध्ये सेवन केला तर तुम्हाला लाभदायक ठरतो. या पदार्थाची भाजी देखील बनवली जाते. या पदार्थाची पावडर बनवली जाते आणि हा पदार्थ अनेकदा भिजवून देखील केला जातो चला तर मग जाणून घेऊया नेमका हा पदार्थ आहे तरी कोणता..

आपल्यापैकी अनेक जण सकाळी उठल्यावर चहा पीत असतात परंतु चहा प्यायल्याने आपल्या शरीराला आवश्यक असलेले पोषक तत्व प्राप्त होत नाहीत, उलट शरीरामध्ये जो काही गॅस जमा झालेला असतो त्या गॅसमुळे भविष्यात अनेक नको त्या समस्या उद्भवतात. आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला मेथी विषयी महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. मेथी ही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये संजीवनी मानली गेलेली आहे.

मेथी मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे तुमच्या शरीरातील विषारी घटक लवकर बाहेर काढतात. मेथीचा उपयोग तुमच्या शरीराला तर होतोच पण त्याचबरोबर केसांना त्वचेला सांधेदुखी, गुडघेदुखी यांसारख्या अनेक समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी लाभदायी देखील ठरतात. जर तुम्ही मेथीची पावडर बनवून केसांना लावल्यास तुमचे केस मजबूत बनतात. केसांना नैसर्गिकरित्या काळा रंग प्राप्त होतो.

हे वाचा:   हे पाहून डॉक्टर देखील हैराण आहेत की या उपायाने केस काळे बनले जातात.!

केसांच्या मुळाशी कोणत्याही प्रकारचे विषारी घटक जमा झाले असतील तर ते निघून जातात. दिवसभर अन्नपदार्थ सेवन केल्यानंतर आपण सकाळी उठल्यावर थेट चहा पीत असतो. ही सवय अत्यंत चुकीची आहे. चहा प्यायल्याने आपल्याला फ्रेश वाटते हे मान्य आहे परंतु हा फ्रेश पणा तुमच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतो. तुम्ही सकाळी उठल्यावर उपाशीपोटी मेथीचे पाणी सेवन केले तर तुमच्या शरीरातील सारे विषारी घटक दूर होऊन जातील आणि ते बाहेर पडतील त्यामुळे तुमची पचन संस्था पूर्वीपेक्षा जास्त कार्य करू लागेल.

ज्येष्ठ मंडळी अनेकदा आपल्याला सल्ला देत असतात की सकाळी उठल्यावर कोमट पाणी सेवन करायला पाहिजे यामुळे देखील तुमच्या पोटामध्ये जे काही आम्ल रस निर्माण झालेले आहेत ते दूर होऊन जातात आणि सकाळी उठल्यावर प्रेशर देखील लवकर येतो. तुमच्या शरीरातील वात, पित्त, कफ या तिन्ही दुसऱ्यांना संतुलित राखण्याचे कार्य करते. जर तुमच्या घरातील एखाद्या सदस्याला सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी यासारख्या वाताच्या व सर्दी खोकला यासारख्या पित्ताच्या समस्या निर्माण झाल्या असतील तर या सगळ्या समस्या दूर करण्याचे कार्य मेथीचे दाणे करत असतात.

तुम्हा सर्वांना माहितीच असेल की, हिवाळ्याच्या दिवसात अनेक जण शरीराला उष्णता मिळावी याकरिता मेथीचे लाडू सेवन करत असतात. मेथीचे लाडू सेवन केल्याने तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते व त्याचबरोबर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत बनते सकाळी उपाशीपोटी मेथीचे पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरामधील जे काही विषारी घटक आहेत ते दूर होतात म्हणून आपल्याला रात्री झोपताना एक ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मेथीचे दाणे मिक्स करायचे आहे.

आता हेच पाणी आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचे आहे व सकाळी उठल्यावर उपाशीपोटी सेवन करायचा आहे असे केल्याने मेथीचे सारे औषधी गुणधर्म पाण्यामध्ये उतरेल आणि तुमच्या शरीराला नवसंजीवनी प्राप्त होईल. जर तुम्हाला रोज रात्री मेथी पाण्यामध्ये भिजवून सकाळी सेवन करणे शक्य होत नसेल तर अशावेळी तुम्ही मेथी पावडर बनवून सकाळी कोमट पाण्यासोबत एक चमचा सेवन करू शकता.

हे वाचा:   एक्सपायर झालेल्या गोळ्या औषधांचे सेवन केल्यास काय होत असते? अनेकांना हे माहिती नाही.!

यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि तुमच्या शरीराला ऊर्जा देखील मिळेल तुम्ही मेथीची भाजी बनवून देखील खाऊ शकता त्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन फायबर मिळू शकते. ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठता वारंवार सतावते. पोट वेळेवर साफ होत नाही अशा व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये मेथीची भाजी अवश्य सेवन करायला हवी. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर असेल वारंवार ब्लड प्रेशर वाढतो तसेच मधुमेह असेल शुगरची मात्रा कमी होत नसेल तर अशावेळी देखील मेथीचे पाणी तुमच्या शरीरासाठी लाभदायक ठरते.

तुम्हा सर्वांना माहिती असेल की आपल्या तोंडातील जी लाड असते ती औषधी तत्त्वांनी भरपूर असते परंतु आपल्यापैकी अनेक जण थंड पाण्याने गुळण्या करून ती लाळ बाहेर फेकत असतात असे करणे चुकीचे आहे. लाळी मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे तुमच्या शरीराला मजबूत देण्याचे कार्य करतात. जर तुम्ही सकाळी उपाशीपोटी मेथीचे पाणी नियमितपणे दहा दिवस सेवन केले तर तुम्हाला फरक जाणून येईल तसेच पोटाचे सगळे आजार दूर होईल.

तुमचे शरीर अगदी पूर्वीप्रमाणे तजेलदार दिसू लागेल. तुमची त्वचा उजळून लागेल आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये सुधारणा दिसून येईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.