१० रूपयांच्या बिस्कीटने बनवा मजेदार रेसिपी जी आज पर्यंत कधी खाल्ली नसावी व कधी पाहिली नसावी..दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनवतो पण आज आपण एक वेगळी रेसिपी जाणून घेणार आहोत.रोज रोज तोच स्वाद व तोच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. कोणतातरी नवीन पदार्थ बनवण्यात व त्याचा आस्वाद घेण्यास आपल्या सर्वांना आनंद वाटतो पण, तो पदार्थ बनवायचा कसा?
कोणत्या पद्धतीने बनवायचा व त्याच्या साठी लागणारे साहित्य कोणकोणते असावा,हे आपल्याला माहीत पाहिजे व सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे जो पदार्थ आपण आपल्या खाण्यासाठी बनवत आहोत तो कमी खर्चिक असावा असं तर सर्वांनाच वाटतं चला तर मग अशाच एक नवीन रेसीपी बनवण्याचा प्रयत्न करूया.. आजची रेसिपी खरतर खूपच खास आहे कारण या रेसिपीसाठी खूपच कमी खर्च म्हणजेच फक्त १० रुपये लागणार आहेत.
आपल्या सगळ्यांची सकाळ चहा आणि बिस्कीट ने होते तर मग चला त्याच बिस्कीट ने बनवूया एक वेगळी रेसिपी जी बनवायला ही सोपी आहे आणि या रेसिपीज ला खर्च देखील येत नाही. सर्वप्रथम आपल्याला साहित्य घेताना १० रुपयांचे किंवा जास्तीत जास्त २०रुपयांचे बिस्किट घ्यायचे आहे. हे बिस्किट साधे असावे क्रिम वाले बिस्कीट असू नये हे लक्षात घ्यावे. आपल्याला जेवढ्या प्रमाणात रेसिपी बनवायचे असेल तेवढ्या प्रमाणात आपण बिस्किट घ्यावे.
रेसिपी ला लागणारे साहित्य: बिस्किट, तूप, ड्रायफ्रुट्स, मिल्क पावडर सर्वात आधी आपल्याला एका भांड्यात तूप गरम करत ठेवायचाआहे त्यानंतर तूप गरम झाल्यावर त्यात अख्खे बिस्किट नॉर्मल तळायचे आहेत त्यांना थोडंसं ब्राऊन होऊ द्यायचं आहे.बिस्किट ब्राउन झाल्यावरती ते बिस्कीट तुपातून काढून घ्यायचे आहेत व बिस्किट थंड झाल्यावर त्यांचे लहान-मोठे तुकडे करून मिक्सर मधून वाटून घ्यायचे आहेत.
वाटलेले मिश्रण बारीक असावे याची काळजी घ्यावी. वाटलेल्या बिस्किटच्या मिश्रणाला एका भांड्यात काढून घ्यावे त्यानंतर दुसर्या भांड्यात रेसिपीची चव वाढवण्यासाठी मिल्कपावडरचा उपयोग करणार आहोत. अर्धा कप मिल्क पावडर घ्यावी आणि त्या हळूहळू दूध एकत्र करून घ्यावा. मिल्क पावडर आणि दुधाचे एकत्र मिश्रण करून ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यावं.
आता आपण गॅस वर एक भांडे ठेवायचे. भांडे गरम झाल्यावर त्यात अर्धा कप किंवा चवीनुसार साखर घालावी. बिस्किट मध्ये तर साखर असतेच पण रेसिपीला चव येण्यासाठी परत त्यात साखर टाक ने गरजेचे आहे. एका भांड्यात साखर घेऊन त्यात थोडं पाणी टाकून पाक सारखं एकत्रित करून घ्यावं. एकत्रित करून घेतल्यास एक तार होईल अशी ती एकत्रित करून चाषणी म्हणजेच पाक तयार करावा.
चाषणी एकत्रित करताना त्यात थोडीशी इलायची पावडर टाकावी त्याने रेसिपीत एक वेगळीच चव येईल साधारणतः दोन मिनिटं ही चाषणी गॅसवर ठेवायची त्यानंतर आपण जे मिल्क पावडरचे मिश्रण तयार केलेलं ते त्यात एकत्रित करून घ्यावं ते मिश्रण जास्तीत जास्त एक ते दोन मिनिटं गॅसवर गरम होऊ द्यावे. मिश्रण थोडं घट्ट झाल्यावर त्यात आधीच बिस्किटांचे बारीक केलेले मिश्रण एकत्रित करून घ्यावा व बारीक गॅसवर त्याला ३-४ मिनिटांसाठी एकत्रित होऊ द्यावं.
मिश्रण घट्ट झाल्यावर एका केकटिन मध्ये प्लॅस्टिकचा पेपरला तूप लावून त्यावर तयार केलेलं मिश्रण एक सारखा करून घ्यावा व त्याला फ्रिजमध्ये ५ ते १० मिनिटांसाठी थंड होऊ द्याव. सुरीने त्याचे हवे तसे कापे करून घ्यावे व त्याला अलगद एका प्लेटमध्ये काढून घ्यावे त्याच्यावर ड्रायफ्रूट्स टाकून हवे तसे सजवून द्यावे ही. अश्या प्रकारे आपली कधी न खाल्लेली कधी न पाहिलेली अनोखी रेसिपी दहा रुपयांच्या बिस्किटनी बनवलेली मिठाई तयार झालेली आहे.ही रेसिपी तुम्ही अवश्य बनवून पाहा.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.