शहरांमध्ये विंचू चावण्याचे प्रमाण कमी असले तरी दमट, अंधाऱ्या जागी गोठ्यांजवळ विंचू असू शकतात. अशा ठिकाणी वावरताना तसेच शेतात काम करताना अपघाताने विंचू चावू शकतो. विंचू हा तोंडाने चावत नाही, तर तो त्याच्या शेपटीने डंख मारतो, त्याला एक नांगी असते. ती पोकळ असून त्यात विषाने भरलेली नळी असते.
या नांगीने जखम होऊन त्यातून विष आपल्या शरीरात सोडले जाते. विंचवाचे विष सापाहून विषारी असते. परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने सापाच्या विषाप्रमाणे त्याचे परिणाम दिसत नाहीत. विंचूच्या जाती सुद्धा वेगवेगळया दिसून येतात. विंचू चावलेल्या जागी खूप आग होते. ती जागा लाल होते. काही वेळेस डोके दुखणे, चक्कर, मळमळ होणे, खूप घाम येणे, हातापायाला पेटके येणे, बेशुद्ध होणे अशी लक्षणे दिसून येतात. जेवढा विंचू लहान तेवढा धोका कमी, पण खूपच मोठा विंचू चावल्यास त्रास पण तेवढाच जास्त दिसून येतो.
आज आपण बघणार आहोत कोणत्याही प्रकारचा विंचू चावल्यावर त्याचा त्रास एक मिनिटात कमी होण्यासाठी तीन घरगुती उपाय. या मध्ये सगळ्यात पहिल्या उपायासाठी लागणारी वनस्पती म्हणजे उंबर. उंबर हा सर्वत्र आढळतो. उंबर हा यावर अत्यंत रामबाण उपाय आहे. अश्या या उंबराची दोन पान घ्यायची आहेत़ आणि, आपल्या घरामध्ये जे सामान असेल किंवा दगडाने बारीक वाटून त्याचा जो लगदा तयार होईल तो विंचू चावला आहे, त्या ठिकाणी ठेवुन त्यावर एक कपडा बांधायचा.
यानंतर पहा एक मिनिटात याचा त्रास कमी झालेला दिसून येईल. यानंतर आहे दुसरा उपाय. तो आहे आपल्याला सहज आढळणारी वनस्पती म्हणजे बोर. यासाठी बोरीच्या झाडाची ५-६ पाने घ्यायची आणि, ती दगडाने बारीक करुन त्याचा जो लगदा तयार होईल तो विंचू चावला आहे, त्या ठिकाणी ठेवुन द्यायचा आणि वरुन एक कपडा बांधून ठेवावा. याने वेदनेचा दाह कमी व्हायला लागतो, तसेच विष उतरण्यास मदत होते, आणि काही वेळातच याने आराम पडतो.
यानंतर तिसरा उपाय आहे तो म्हणजे, आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी वनस्पती म्हणजे तुळस. तुळशीची सुद्धा ५-६ पाने घ्यायची आहेत, आणि ती बारीक कुस्करून किंवा बारीक वाटून, त्याचा लगदा ज्या ठिकाणी विंचू चावला आहे त्या ठिकाणी लावून त्यावर कपड्याने बांधून ठेवावे. याने सुद्धा लगेचच आराम मिळतो. विंचू चावल्यावर हे तीन उपाय नक्की करून बघा.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.