टक्कल पडलंय? चिंता सोडा.! हा एकच नैसर्गिक उपाय केस आणून देईल.!

आरोग्य

आजकाल अनेक लोकांना एक समस्या सतावत आहे ती म्हणजे डोक्यावर टक्कल पडणे. या लोकांचे डोके हे तरुणपणी खूप चांगले असते. म्हणजे त्यावर चांगले केस असतात. परंतु काही काळानंतर हळू हळू डोक्यावर टक्कल पडू लागते. अशावेळी लोक खूप निराश होत असतात. यासाठी बाजारात हजारो प्रॉडक्ट उपलब्ध आहेत जे दावा करतात की या आमच्या प्रॉडक्ट ने तुमच्या डोक्यावर केस नक्की परत येतील.

टक्कल पडणे सहसा अनेक कारणांमुळे होते. एंड्रोजेनेटिक अॅलोपेसिया आणि एलोपेसिया एरिआटा व्यतिरिक्त, इतर अनेक घटक आहेत ज्यामुळे केस गळतात. जास्त काळजी करणे, शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, हार्मोनची असंतुलित पातळी, त्वचेच्या समस्या आणि कर्करोगाच्या उपचारांमुळे टक्कल पडणे ही समस्या निर्माण होत असते.

तशी बघायला गेले तर ही समस्या खूपच साधारण समस्या आहे. परंतु यामुळे आपले सौंदर्य पूर्णपणे बिघडले जात असते. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला एक साधा छोटा उपाय सांगणार आहोत. या उपायाने तुम्हाला नक्की फायदा होईल. हा उपाय त्या लोकांसाठी आहे ज्याच्या डोक्यावर टक्कल आहे आणि त्यांचे केस गळत आहे.

हे वाचा:   ही आहे जगातली खूपच चमत्कारी वनस्पती, आरोग्यासाठी आहे हजारो फायदे.!

आम्ही तुम्हाला जो उपाय करण्यास सांगत आहोत त्यासाठी लागणारे साहित्य हे सहजपणे आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असते. आपल्याला या उपयासाठी जवस लागणार आहे. जे लोक सकाळी उठतात आणि जवस पाण्याबरोबर पितात अशा लोकांना लठ्ठपणा नियंत्रित करण्याबरोबरच हे चांगले आरोग्य आणि केसांसाठी देखील फायदा होतो.

जवसमध्ये व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, सेलेनियम, जस्त आणि लोह सारखी पोषक तत्त्वे आढळतात. त्यात ओमेगा -3 आणि 6 फॅटी एसिड देखील असतात, जे आपल्या केसांना मुळांपासून पोषण देतात. आपल्याला हा उपाय करण्यासाठी जे पदार्थ लागणार आहे ते आपण पाहूया. आपल्याला यासाठी जवस पावडर लागेल दोन ते तीन चमचे, दही दोन चमचे, मेथी पावडर एक छोटा चमचा आणि थोडेसे हेयर ऑईल.

हे बनवण्यासाठी मिक्सरमध्ये जवस चे दाणे बारीक करून बारीक चूर्ण बनवा. यानंतर, एका वाटीत चार चमचे जवस पावडर, मेथी पावडर, दही आणि थोडे पाणी मिसळा आणि हे मिश्रण चांगले फेटून घ्या. यामध्ये तुम्ही तुमच्या केसांनुसार तेलाचे काही थेंब देखील घालू शकता. ही पेस्ट कपड्याने झाकून किमान 30 मिनिटे सोडा आणि तुमचे हेल्दी हेअर पॅक तयार होईल.

हे वाचा:   नको ती चरबी पाण्यासारखी वितळून जाईल.! पाण्यात या चार गोष्टी टाकून पील्याने पोट चरबी मुक्त होईल.!

हे मिश्रण केसांवर लावल्यानंतर बोटांनी मसाज करा. त्यानंतर 2 ते 3 तास सोडा. त्यानंतर आपले केस चांगल्या शाम्पू ने धुवा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *