हे तर सर्वांना माहीतच आहे कि लवंग हा एक लाभदायक मसाला आहे. आयुर्वेदामध्ये याचे खूप महत्त्व आहे. लवंगा मध्ये अनेक आरोग्य संबंधीच्या समस्या दूर करण्याचे गुणधर्म असतात. लवंगाचे तेल देखील अनेकदा बाजारांमध्ये मिळत असते लवंगाचे तेलाचे देखील अनेक फायदे सांगितले जातात.
लवंग तेलामध्ये अँटी व्हायरल, अँटी मायक्रोबियल, अँटी फंगल आणि अँटी सेप्टिक गुणधर्म असतात. म्हणून लवंग तेल हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. लवंग तेल हे आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर मानले जाते लवंग तेलाचा उपयोग साबण आणि बॉडीलोशन मध्ये केला जात असतो.
लवंग तेल हे त्वचेसाठी देखील वरदानच आहे. त्वचा संबंधीच्या कुठल्याही समस्या यामुळे नष्ट होत असतात. सौंदर्य वाढविण्यासाठी देखील लवंगा च्या तेलाचे उपयोग आहेत. तसेच या व्यतिरिक्त डोकेदुखी, मळमळ होणे, तणाव कमी करण्यासाठी आणि मुरमांवर उपचार करण्यासाठी लवंगाचे तेल उपयुक्त ठरेल.
चला तर मग गुंडाच्या तेलाचे काही फायदे बघुयात. लवंगाचे तेल हे डोकेदुखीवर खूपच फायदेशीर मानले जाते. स्थायू मध्ये असलेला त्रास आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी तसेच शरीरामध्ये होत असलेल्या वेदना कमी करण्यासाठी लवंगतेल उपयुक्त ठरेल. असे सांगितले जाते कि लवंग तेलामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात म्हणजे दहा कमी करण्यासाठी याचा फायदा होत असतो.
ज्या भागात आपल्याला वेदना होत आहे त्या ठिकाणी या तेलाने मालिश केल्यास सर्व वेदना दूर होत असतात. चिमूटभर मीठामध्ये लवंगाचे काही थेंब टाकावेत व हे थेंब कपाळावर लावावेत. यामुळे डोकेदुखीची समस्या पूर्णपणे नष्ट होत असते. असे जर तुम्ही केले तर तुम्हाला डोकेदुखीची समस्या कधीही होणार नाही. जरी कधी जाणवली तर हा उपाय पुन्हा करावा.
अनेकदा दैनंदिन जीवनातील काही गोष्टींमुळे आपल्याला तणाव सहन करावा लागत असतो. तणावामुळे अनेक घातक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी लवंगतेल फायदेशीर ठरते. लवंग तेल तणाव चिंता आणि मानसिक थकवा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे मन शांतीचा अनुभव देखील लाभत असतो.
लवंगाचा तेलामध्ये काही थेंब तूप टाकावे व याला कपाळावर गोलाकार पद्धतीने फिरवत मालिश करावी. असे केल्याने मन शांती वाटत असते. पूर्णपणे डोके थंड झाल्यासारखे वाटत असते. हा अनुभव तुम्ही नक्की घेऊन बघायला हवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.