भारतामध्ये लग्न म्हटले की आला अवाढव्य खर्च. लग्न कोणाचेही असले म्हणजे गरीब असो वा श्रीमंत पैसा हा लागतोच. काही लोक तर प्री-वेडिंग फंक्शन्स अरेंज करतात जे बरेच दिवस सुरू असतात. त्यानंतर लग्न होते आणि त्यानंतरही पार्ट्यां सुरूच असतात. अनेक लोक लग्नात लाखो कोटी रुपये खर्च करत आसतात. परंतु काही लोक असतात जे अत्यंत कमी पैशांमध्ये अगदी साध्या पद्धतीने लग्न करत असतात.
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात एका जोडप्याने अवघ्या 500 रुपयांत लग्न करून एक उदाहरण उभे केले आहे. वृत्तसंस्था एएनआय च्या मते, धार सिटी मॅजिस्ट्रेट आणि आर्मी मेजर यांनी कोर्टात कोणत्याही बॅन्ड किंवा वराती शिवाय लग्न केले आणि लग्नासाठी केवळ 500 रुपये खर्च केले.
चांगल्या पदावर असूनही, दोघांनीही लोकांना संदेश देण्यासाठी कोर्टात लग्न केले आहे. सोहळा अगदी सोपा ठेवून दोघांनीही केवळ 500 रुपये खर्च करून आपल्या लग्नाची गाठ बांधली. वधू शिवांगी जोशी या धार सिटी ची मॅजिस्ट्रेट आहे तर अनिकेत चतुर्वेदी हे भारतीय सैन्यात मेजर आहे. हे दोघेही भोपाळचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यांचे लग्न दोन वर्षांपूर्वी निश्चित केले गेले होते, परंतु कोविडमुळे ते अनेक वेळा पुढे ढकलले गेले. विवाहाच्या काळात अनावश्यक उधळपट्टी रोखण्यासाठी समाजात याबाबतचा निरोप देण्यासाठी या जोडप्याने अखेर सोप्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर दोघांनी धार येथे कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आणि सोमवारी कोर्टात 500 रुपये जमा करून लग्न केले. लग्नाला कुटुंबातील काही सदस्य, कर्मचारी आणि धार जिल्हाधिकारी आलोक कुमार सिंह उपस्थित होते. लग्नानंतर या जोडप्याने सांगितले की लग्नात उधळपट्टी न केल्याने मुलीच्या कुटुंबावर खर्चाचा त्रास होत नाही. यासोबतच पैशांचा गैरवापरही होत नसतो.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.