एका पानात आहे हजारो आजारांना दूर करण्याची शक्ती, जाणून घ्या पिंपळाच्या पानांचे फायदे.!

आरोग्य

हिंदू धर्मामध्ये अनेक वृक्षांना प्राण्यांना महत्त्व दिले गेले आहे. झाडांना देखील हिंदू धर्मात महत्व दिले गेले आहे. ज्याप्रमाणे तुळस असते त्याचप्रमाणे वड पिंपळ यांना देखील महत्त्व दिले जाते. पिंपळ ही वनस्पती तशी घराच्या आजूबाजूला सहज उपलब्ध असते. याचे भलेमोठे वृक्ष देखील असते. जेवढा याचा धार्मिक दृष्ट्या महत्त्व आहे. तेवढेच याचे आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्व सांगितले गेले आहे.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला पिंपळाच्या पानांचा आपल्या आरोग्यासाठी कसा उपयुक्त असा प्रभाव आहे हे सांगणार आहोत. पिंपळाच्या पानांचे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असे फायदे सांगितले जातात. या विषयीची सर्व माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.

कोणत्याही प्रकारच्या श्वसनाच्या समस्येमध्ये पिंपळ वृक्ष तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी पिंपळ झाडाच्या सालीचा आतील भाग बाहेर काढा आणि वाळवा. हा वाळलेला भाग पावडर बनवून सेवन केल्यास श्वसनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. याशिवाय त्याची पाने दुधात उकळून प्यायल्याने दम्यातही फायदा होतो. ज्या लोकांना दमा अथवा श्वसनाचे विकार आहेत अशा लोकांनी नक्की याचा उपयोग करावा.

हे वाचा:   हे पदार्थ आहेत कॅ'न्सर चे मूळ.! आजपासूनच बंद करा.! आरोग्य दहापट मजबूत होईल.! आरोग्यासाठी एकदा नक्की वाचा.!

पिंपळ च्या काडीने ब्रश केल्याने दात मजबूत होतात आणि दातदुखीची समस्या संपते. याशिवाय 10 ग्रॅम पिंपळची साल आणि 2 ग्रॅम काळी मिरी बारीक करून तयार केलेली पेस्ट वापरल्यास दातांच्या सर्व समस्या संपतात. विषारी कीटकाने चावल्यास अशा वेळी जर डॉक्टर उपस्थित नसतील, थोड्या थोड्या वेळाने बाधित व्यक्तीस पिंपळच्या पानांचा रस दिला तर विषाचा प्रभाव कमी होऊ लागतो.

दाद, खरुज, खाज यासारख्या त्वचेच्या समस्यांमध्ये, पिंपळाची मऊ पाने खाणे किंवा त्याचा डीकोक्शन पिणे फायदेशीर आहे. याशिवाय फोडे आणि मुरुमांसारखी समस्या असल्यास पीपळाची साल चोळून लावल्याने फायदा होतो. शरीराच्या कोणत्याही भागावर जखम असल्यास, पिंपळाच्या पानांची गरम पेस्ट लावल्याने जखम बरी होण्यास मदत होते. याशिवाय रोज ही पेस्ट वापरून आणि पिंपळाची साल लावल्याने जखम लवकर भरते आणि जळजळ होत नाही.

हे वाचा:   डोळ्यांची नजर वाढवून चष्मा काढून टाकेल हा घरगुती उपाय...! आता आंधळ्या व्यक्तीला पण दिसू लागेल.!

अशा प्रकारचे अनेक फायदे पिंपळाच्या झाडापासून आपल्याला मिळत असतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *