आपल्या भारतात औषधी वनस्पतींचे भांडार आहे. अनेक वर्षांपासून अनेक वनस्पतींचा औषध म्हणून वापर केला जातो. पण आजकाल अशा वनस्पती दुर्मिळ होत चालल्या आहेत. जसे की तुळस, अडुळसा,कुडा, कडुलिंब इ. घाणेरी ही वनस्पती बहुगुणी वनस्पती मानली जाते. ही एक रानटी वनस्पती असून त्याचे उपयोग अनेक आहेत.
अनेक आजारांवर या वनस्पतीचा फार पूर्वीपासून वापर केला जातो. या वनस्पतीला दगडी किंवा टणटणी असेही म्हणतात. ही वनस्पती राज्यांत कोठेही व उष्ण कटिबंधात सामान्यपणे आढळते. या झाडाची फुले आकाराने छोटी आणि रंगीबेरंगी असतात. फुले लहान, पिवळी, नारिंगी व सच्छद असतात.
मोकळ्या रानावर, रस्त्यांच्या कडेला, कुंपणाजवळ वाढणारं हिरवट बसकट रंगीबेरंगी झुडुप म्हणजे घाणेरी आपल्यापैकी बहुतेकांना सुपरिचित आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घाणेरी वनस्पती अत्यंत गुणकारी आहे. या वनस्पतीच्या सेवनामुळे आपली प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते जेणेकरून आपल्याला संक्रमण आणि अॅलर्जीपासून मुक्ती मिळते.
सर्दी-खोकल्याच्या समस्येवर टणटणी वनस्पती अत्यंत रामबाण उपाय आहे. जर कोणाला पोटामध्ये जंत किंवा कृमि होत असतील तर या दगडी पाल्याचे दोन पाने आणि दोन फुले रोज चावून खाल्ल्यास पोटामध्ये जंत कधीच होत नाहीत.
या वनस्पतीच्या पानांचा उपयोग मूळव्याधी साधी सुद्धा केला जातो.
याची दहा पाने आणि एक ग्लास पाणी घेऊन ती उकळून घ्या. उकळून घेतल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचे आहे. आणि ते पाणी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी एक कप प्या. यामुळे मूळव्याधाचा त्रास निघून जाईल. जर एखाद्या व्यक्तीस दररोज ताप येत असेल तर या दगडी पाल्याचे दोन फुले आणि दोन पाने मिश्रण करून त्याचे चूर्ण सेवन ताप नाही, दगडीपाला ही ज्वर शामक आहे.
गॅस अपचन यावर दगडी पाला खूप गुणकारी, दगडी पाल्याचे तीन ते चार पाने चावून खाल्ल्यास अपचनाचा त्रास कायमचा नष्ट होतो. अशाप्रकारे या वनस्पतीचा खूप उपयोग केला जातो. काही ठिकाणी ही वनस्पती विषारी मानली जाते. त्यामुळे या बहुगुणी वनस्पतीचा उपयोग खूप कमी प्रमाणात केला जातो.
पण ज्यांना याबद्दल पुरेपूर माहिती आहे ते याचा तेवढाच पुरेपूर वापर करतात. म्हणूनच आपण सुद्धा या नैसर्गिक संपत्तीचा मान राखून त्याची माहिती घेऊन त्याचा उपयोग केला पाहिजे. या वनस्पतीला तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट मध्ये नक्की लिहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.