अन्नग्रहण पेक्षा ज्या लोकांची उत्सर्जन क्रिया ही योग्य राहात असते असे लोक निरोगी राहात असतात. अशीच एक समस्या आहे समस्या म्हणजे बद्धकोष्ठता. यामुळे माणसाला खूप त्रास होत असतो तसेच यामुळे शरीरामध्ये अनेक घातक विकार निर्माण होत असतात. त्यामुळे याकडे प्रत्येकाने काळजीने बघायला हवे.
अनेक वेळा आपण या बाबतचे वेगवेगळे उपाय देखील करून बघत असतो प्रत्येक वेळी याचा फायदा होतोच असे नाही. काही वेळा शारीरिक नुकसान देखील होण्याची शक्यता असते. परंतु जर तुम्ही घरगुती साहित्य वापरून उपाय केले तर यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होईल तसेच तुमच्या काही आरोग्याच्या समस्या असतील तर त्या देखील नष्ट होईल.
ज्या लोकांना बद्धकोष्टता म्हणजे अपचनाचा त्रास आहे ऍसिडिटी जास्त प्रमाणात होते अशा लोकांसाठी एक साधा सोपा उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय केल्याने तुम्ही बद्धकोष्ठते पासून कायमची सुटका मिळवू शकाल. ज्या लोकांचे पोट हे साफ होत नसेल तर अशा लोकांसाठी देखील हा उपाय आहे. हा उपाय केल्याने तुमचे पोट हे झटपट साफ होईल.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन पदार्थ लागतील पहिला पदार्थ म्हणजे पन्नास ग्रॅम शेंगदाणे व दुसरा पदार्थ म्हणजे एक ग्लास पाणी. या दोन्ही पदार्थाच्या मदतीने आपण हा उपाय करणार आहोत. शेंगदाण्याचे आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळे फायदे सांगितले जातात. शेंगदाण्याला गरिबाचे बदाम देखील म्हटले जात असते.
आपल्याला हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये ग्लासभर पाणी टाकायचे आहे त्यामध्ये हे शेंगदाणे टाकायचे आहे. तसेच यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचे आहे व याला थोड्या वेळात करिता उकळू द्यावेत. जवळपास पाच मिनिटे पर्यंत शेंगदाणे उकळू द्यावे व त्यानंतर यामध्ये असलेले पाणी हे काढून घ्यावे.
दररोज रात्री झोपताना हे शेंगदाणे थोडेसे खायचे आहे व त्यानंतर लगेच वरून पाणी प्यायचे आहे. असे जर तुम्ही दोन ते तीन दिवस केले तर पोट हे अगदी झटपट मोकळे होईल. तसेच गॅस एसिडिटी असेल तर ती देखील गायब होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.