मित्रांनो, आपल्या आसपास मनाला भावणाऱ्या मन प्रसन्न करणाऱ्या सुंदर अशा वनस्पती असतात. घराजवळ, तलावाशेजारी, रस्त्यावर अशा वनस्पती आपोआप उगवतात. पावसाळ्यात तर अशा वनस्पतींना उधाण येते. निसर्ग बहरून येतो. अशीच एक वनस्पती आहे जी तुम्हाला रस्तावर आजूबाजूला अनेक ठिकाणी दिसते. पानाच्या किनारी ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते.
आज या वनस्पती बद्दल आपण माहिती बघणार आहोत ती आहे रुई यालाच आकडा किंवा मदार असे म्हणतात. भारतातील कुठल्याही गावी ही वनस्पती सहज आढळते. दोन प्रकारच्या रुई आहेत. एकावर पांढरे सफेद तर दुसर्यावर जांभळा/ वांगी रंगाची फुलं असतात. सफेद रंगाचे फूल असलेल्या रुईचे, आयुर्वेदातील अनेक औषधे मध्ये उपयोग केला जातो. यामध्ये शरीरावरील सूज कमी करण्याची अनोखी शक्ती असते.
ही वनस्पती जखम कमी करण्यासाठी, दाग, खाज खुजली, नायटा ला कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. तुम्हाला असह्य दात दुखी असेल तर दातदुखी मध्ये हि वनस्पती संजीवनी पेक्षा कमी नाही. त्यासोबतच सांधेदुखी, गुडघेदुखी असल्यास या वनस्पतीच्या सहाय्याने ते तुम्ही ठीक करू शकता. शरीरावर खूप मोठी लवकर भरून न येणारी जखम/ घाव असतील तर त्याला कसे ठीक करता येईल?
मित्रांनो त्या साठी तुम्ही रुईच्या वनस्पती चे दूध घ्या. (जस तुम्ही पान तोडली असता त्यातून एक चीक बाहेर येईल त्यालाच रुईचे दूध म्हणतात.) त्यात हळद मिक्स करा. जिथं घाव /जखम आहे त्या वरती ही पेस्ट लावा. यासोबतच तुम्हाला वाटलं तर तुम्ही रुई चे ताजी पान गरम करून जखमेवर बांधू शकता. असं केल्याने तुमच्या जखमा लवकर भरून निघतील.
तुम्हाला मुळव्याध /piles /बवासीर ची समस्या असेल खूप दुखत असेल तर मित्रांनो पृथ्वीच्या पानांत आणि दुधात असे गुण असतात की जर आपण योग्य प्रकारे उपयोग केला तर मूळव्याधीत आराम मिळतो. रुईचा चीक घ्या. तो मूळव्याधी च्या कोंबवर खूप सावधगिरीने लावायचा आहे. असं केल्याने कोंब गळून पडतात आणि तुम्हाला मूळव्याधीत आराम मिळतो.
रुईच्या पानांचे दूध काढताना एक काळजी घ्यायचे आहे की डोळ्यांना काहीही होणार नाही /डोळे त्याच्या संपर्कात येणार नाहीत. डोळे जाण्याची संभावता असते. नायटा /खाज /खुजली ची समस्या असेल तर पांढऱ्या रुईचे वनस्पतीचे दूध त्या भागावर लावल्याने तुम्हाला फायदा होईल. सोबतच जर तुम्हाला दात दुखी ची गंभीर समस्या असेल तर तुम्ही रुईच्या झाडाचा चीक /दूध हिरड्यांवर लावा.
जिथे तुम्हाला दात दुखी होते त्या जागी हे दूध लावल्याने आराम मिळतो. तुम्ही सांधेदुखी ने त्रस्त असाल तर रुईच्या पानामध्ये असे गुणधर्म आहेत की तुमची सांधेदुखी पळून जाईल. त्यासाठी तुम्ही रुईचे पानावर तीळ तेल लावून गरम करून घ्या. आणि ते दुखणाऱ्या सांध्यावर आणि गुडघ्यावर लावून सुती कपड्याने बांधा. हा उपाय सलग केल्याने नक्कीच फरक पडतो. सूज असल्यास तीही कमी होईल.
आम्ही आज दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडले असेल. त्याचा तुम्ही नक्कीच फायदा करून घ्यावा. आवडल्यास ही माहिती तुम्ही आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.