छातीत साचलेली सगळी घाण, बेडका, कफ झटपट बाहेर पडेल.! दोन मिनिटात छाती आणि गळा होईल मोकळा.!

आरोग्य

जर आपल्या छातीत म्युकस lचे प्रमाण वाढले असेल किंवा भरपूर कफ साचल्यामुळे आपल्याला अनेकदा श्वास घेण्यात भरपूर अडथळे निर्माण होतात. जर वारंवार श्वास घेण्यात त्रास होत असेल तर या समस्या कडे अजिबात दुर्लक्ष करू नका. सध्या वातावरणामध्ये बदल झालेले आहे वातावरणातील बदलांमुळे आपल्यापैकी अनेकांना सर्दी,खोकला यासारख्या समस्या त्रास देतात.

या समस्या उद्भवल्यावर छातीमध्ये इन्फेक्शन देखील होण्याची शक्यता असते परंतु आपल्यापैकी अनेकजण डॉक्टरांकडे जाऊन औषध उपचार करतात. योग्य ते औषध उपचार करून देखील आपल्या शरीरावर योग्य ते परिणाम जाणवत नाही. जर तुमच्या बाबतीत देखील या सगळ्या समस्या वारंवार घडत असतील तर आजच्या या लेखांमध्ये सांगितलेला उपाय तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे.

छातीत कफ जमा होण्याची अनेक कारणं आहेत. विषाणू संसर्ग किंवा फ्लू झाल्यानंतर घशात कफ तयार होतो तसेच सर्दी-खोकला, ताप यामुळे सुद्धा घशात कफ जमा होऊ लागतो. एखाद्या गोष्टीची एलर्जी असल्यास कफाचा त्रास होतो म्हणूनच कधी कधी आपण आपली काळजी घेतली नाही किंवा योग्य त्यावेळी योग्य औषधांचा वापर केला नाही तर कफ होण्याची समस्या आपल्याला जाणवू शकते.

हा कफ एकदा छातीमध्ये जमा झाला तर तो सहजा सहज निघत नाही आणि त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो त्याचे पुढील परिणाम हे आपल्या शरीरावर वाईट होऊ शकतात म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत असे काही घरगुती उपाय ज्यामुळे आपण आपला कफ घरबसल्या नष्ट करू शकतो, त्यासाठी आपल्याला महागड्या औषधांचे सेवन करणे देखील लागणार नाही.

चला तर मग जाणून घेऊया घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला इथे वापरायचे आहे ते म्हणजे ज्येष्ठमधाची पावडर. जर तुमच्याकडे जेष्ठमधाचे फांद्या म्हणजेच सुकवून घेतलेले खोड असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता. आणि आपल्याला इथे वापरायचे आहे ते म्हणजे काळी मिरी. काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.

हे वाचा:   खायचे असेल तर अशा कोंबड्यांचे मांस खा, आरोग्यासाठी अतिशय उत्तम मांस व अंडी, जाणून घ्या किती किंमत आहे या कोंबड्यांची...!

त्याचबरोबरच आपल्या कफ साठी देखील ती अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. काळी मिरी हे मॅंगनीजचा एक चांगला स्रोत मानला जातो. मॅंगनीज हे एक खनिज आहे, जे हाडांचे आरोग्य, जखमा बरे करणे आणि चयापचय प्रक्रियेस मदत करतात म्हणून आपल्याला इथे काळ्या मिरीचा वापर करायचा आहे. काळ्या मिरची पावडर बनवून घ्यायची आहे. सर्वप्रथम आता आपल्याला गॅसवर एक पात्र ठेवून त्यामध्ये दोन ग्लास पाणी घ्यायचे आहे.

तुम्हाला जेवढ्या प्रमाणात काढा प्यायचा असेल तेवढ्या प्रमाणात पाणी इथे घ्यायचे आहे. या पाण्यात तयार करून घेतलेली काळ्या मिरीची दोन चमचे पावडर आपल्याला टाकायची आहे. या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे, जेणेकरून काळ्या मिरी मध्ये असलेले सर्व गुणधर्म या पाण्यामध्ये येतील. या पाण्यामध्ये दोन चमचे ज्येष्ठमधाची पावडर देखील टाकायची आहे.

जर ज्येष्ठमधाचे खोड तुमच्याजवळ असेल तर त्याचा वापर देखील तुम्ही करू शकता पण जास्त फायदा आपल्याला याच्या पावडर मुळे मिळेल त्यामुळे जर पावडर असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता. जर तुमच्याजवळ पावडर नसेल तर बाजारामध्ये सहजरीत्या उपलब्ध होणारी अशी अगदी शुल्लक किमतीमध्ये तुम्हाला ही पावडर उपलब्ध होईल तुम्ही त्याचा वापर देखील करू शकता.

आता या मिश्रणाला भरपूर वेळ असेच उकळू द्यायचे आहे. जर तुम्ही दोन ग्लास पाणी घेतले असेल तर ते पाणी एक ग्लास होईपर्यंत म्हणजे पाण्याचे प्रमाण निम्मे होईपर्यंत हे पाणी उकळवून घ्यायचे आहे, जेणेकरून या दोन्ही गोष्टींतील गुणधर्म या पाण्यामध्ये उतरतील आणि हे पाणी आपल्या शरीरासाठी अजून फायदेशीर ठरेल. हे पाणी व्यवस्थित रित्या उकळवून झाल्यानंतर गाळून घ्यायचे आहे.

हे वाचा:   पोटाची हा जबरदस्त आजार एक लिंबू झटकन बरा करेल.! लाखो रुपये वाचवायचे असेल तर हा उपाय केलाच पाहिजे.!

आता हा बनवून घेतलेला काढा जर तुम्हाला पिण्यासाठी कडू लागत असेल किंवा वेगळी चव लागत असेल तर त्यासाठी तुम्ही या काढा मध्ये चवीसाठी थोडासा गूळ देखील वापरू शकता पण यामध्ये आपल्याला साखरेचा वापर करायचा नाही. या काढा मध्ये आपण थोडेसे मध देखील वापरू शकतो,ज्यांना मधुमेह आहे त्यांनी मधाचा वापर करू नये त्यांनी असेच या काढ्याचे सेवन करायचे आहे.

अशाप्रकारे दररोज संध्याकाळी आपल्याला या काढ्याचे सेवन करायचे आहे. लगातार तीन ते चार दिवस या काढ्याचे सेवन करायचे आहे. या काढा च्या एका वापरानेच तुम्हाला कफ कमी झालेला दिसून येईल. जर दुसऱ्या दिवसापासून कफ पडत असेल तर तुम्ही याचे सेवन चार ते पाच दिवसासाठी करू शकता. यामध्ये वापरले गेलेले सर्व घटक हे औषधी गुणधर्मांचे असल्यामुळे याचा आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही.

आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी देखील होणार नाही उलट फायदाच होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.