मित्रांनो चटमटक खाऊन, अपुरी झोप, प्रदूषण याना त्या अनेक करणामुळे आपली त्वचा निस्तेज होऊ लागते. सणासुदीला तर चेहरा टवटवीत हवाच. सुदंर नितळ त्वचा हे प्रत्येक मुलींचेच नाही तर मुलाचे ही स्वप्न असते. अखेर सुंदर दिसणं कोणाला आवडत नाही. मेकअप करून तारपूर्त सुंदर दिसता येत ही पण त्वचाच सुंदर असेल तर आतून एक कॉन्फिडन्स वाढतो.
आज आपण पाहूया. एक उपटन स्कबर कसे बनवायचे? आता सुंदर दिसणं घरच्या घरी असलेल्या पदार्थापासून आहे सहज शक्य. ते ही नैसर्गिक आणि स्वस्त! यासाठी तुम्हाला लागणार आहे दोन चमचे चना डाळ आणि दोन चमचे मसूर डाळ. दोन डाळी एकत्र करून कढई मधन हलकसर भाजून गार करून मिक्सरवर बारीक पावडर करून घ्या. व ते गाळून घ्या.
त्यात दोन छोटे चमचे हळद घाला. हळदीचा त्वचेसाठी फायदा हे नव्याने तुम्हाला सांगायला च नको. त्यात चार छोटे चमचे चंदन पावडर घाला. एक चमचा गुलाब पाकळ्याची पावडर (बाजारात मिळते किंवा घरी बनवू शकता.) पुढे त्यात भरड वाटलेली साखर दोन मोठे चमचे घाला. हे मिश्रण एकत्र नीट होण्यासाठी पुन्हा चाळून घ्यावे.
हे झालं तुमचं स्क्रबर तयार. त्यात दोन चमचे नारळ तेल, चार चमचे बदाम तेल, लिंबू आणि गुलाबपाणी थोडेसे घालून ड्रायसर एक मिश्रण बनवा. एक महिन्यासाठी हे बनवायचे आहे. वापरते वेळी यात तुम्ही पाणी घाला, कोरडी त्वचा असल्यास मलाई घाला. ऑईली स्किन आणि मिक्स स्किनसाठी दही घाला. लावण्यासाठी हे उटणे किंवा स्क्रबर तयार.
अंगावरील दागिने काढून हे स्क्रबर लावून अलगद ती त्वचा घासा. त्वचेवरील मळ निघून त्वचा चमकू लागेल. नंतर थंड पाण्याने धुवून कोरड्या टॉवेल ने टिपत टिपत पुसावे. घासून पुसू नये. राहिलेले मिश्रण फ्रिजमध्ये बाटलीत भरून ठेऊ शकता. त्वचेवर मुरम असल्यास यात कडीनिंब च पाणी घालून फेसपॅक बनवून लावा.
टीप : हळद पावडर ऐवजी उपलब्ध झाल्यास ताजी हळकुंड पेस्ट वापरावी. अजून जास्त चांगला परिणाम मिळतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.