नमस्कार मित्रांनो, वर दिलेल्या शीर्षकानुसार आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जुन्यात जुनी असलेली मूळव्याधीची समस्या कशी दूर करावी? सोबतच रक्ताची मुळव्याध असेल तर ती देखील कसे ठीक करायचे हे आपण पाहू या. ते पण घरगुती उपायांनी. १००% सुरक्षित व कोणताही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला फायदा होईल.
मुळव्याधीचे दुखणं हे अत्यंत त्रासदायक असतं जे कोणाला सांगता ही येत नाही. जास्त दीर्घकाळापर्यंत हा रोग राहणे अथवा वाढणे दोनही शरीरास हानिकारक आहे. हा उपाय केल्याने तुमची ही समस्या नष्ट होईल. यासाठी तुम्हाला लागणार आहेत नारळाची साल. नारळ वापरल्यानंतर त्याचे साल आपण तसेही फेकून देतो, परंतु याचा वापर करूनच आपण औषधी कसं बनवायचं ते बघुयात.
हा उपाय तुम्ही जास्त बनवून साठवू देखिल शकता. ही नारळाची साल जाळून त्याची राख बनवून घ्यायची आहे. दुसरा घटक लागणार आहे ते म्हणजे ताजं दही. खूप आंबट दही या उपायासाठी घेऊ नये. दह्याचे सेवन नेहमी सकाळी करावे, रात्री याचे सेवन करू नये. थंडीच्या दिवसांमध्ये आंबट दही शरीरास हानिकारक ठरते. नेहमी ताज्या दह्याचे सेवन करावे. या उपायात रात्री दही लावा आणि सकाळी याचे सेवन करायचे आहे.
दही नसल्यास ताक किंवा मठ्ठा देखील चालू शकते. त्या उपायामध्ये नारळाच्या सालीचे भस्म /राख रोग्याला दह्यासोबत घ्यायचे आहे. ते कसे व किती प्रमाणात कधी खायचे आहे हे सविस्तर पुढे सांगितले जाईल. नारळाच्या साली एक साफ मोठ्या भांड्यात घेऊन जाळा. गार झाल्यावर हे फाळणीने गाळून घ्यावे जेणेकरून बारीक पावडर मिळेल व तुमच्या घशामध्ये मोठे सालाचे तुकडे अडकणार नाहीत.
नारळ थंड गुणधर्म असलेला पदार्थ आहे. मुळव्याध का होते? आपल्या आहारात तेलकट खूप मसालेदार चमचमीत पदार्थ खाल्ल्याने उष्णता वाढून पोटात जळजळ होते आणि हळूहळू त्याचे रूपांतर मुळव्याधीत होते. बद्धकोष्टता होणे हे मुळव्याध होण्याची पहिली पायरी होय. त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर पहिला त्यावर उपाय करा.
हा उपाय करत असताना भरपूर पाणी प्या. दिवसातून दोन ते तीन वेळेस ताक मठ्ठा याचे सेवन करा. फळ भरपूर खा. फायबर युक्त अन्नपदार्थाचे सेवन आहारात वाढवा. साल असणारी डाळ खा. तेलकट पदार्थ टाळा. तिखट मसालेदार चमचामीत खाणं बिलकुल बंद करा. खाणंपिणं नीट ठेवा. एक ¼ चमचा हे भस्म / राख तुम्ही दही, ताक किंवा मठ्ठया सोबत घ्या. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा.
आठवड्यातून तीनदा एक दिवसाआड हा उपाय तुम्ही करा. तुम्हाला आराम मिळेल. रक्त असलेली मूळव्याध असेल तर आठवडाभर तुम्ही हा उपाय करावा. यानी तुमच्या पोटात थंडाई येईल. उरलेली नारळाच्या सालीची पावडर तुम्ही हवा बंद डब्यात भरून ठेवा. आशा आहे तुम्हाला सांगितलेला हा अनोखा उपाय नक्कीच फायदेशीर ठरेल. गरज असलेल्यां सोबत हा उपाय शेयर करा.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.