दमा, अस्थमा असणाऱ्या लोकांसाठी खास माहिती.! खूप गोळ्या औषधांचे सेवन केले आता करा हा घरगुती उपाय.!

आरोग्य

दमा हा श्वसनाचा विकार आहे. या विकारांमध्ये रुग्णांना प्रामुख्याने श्वास घ्यायला त्रास होतो. उन्हाळ्याच्या दिवसात श्वसनाचा त्रास अनेकदा होत असतो. एकदा का श्वास घ्यायला त्रास झाला तर जीव गुदमरतो. जीव घुटमळतो. मनुष्याला श्वास घ्यायला नाही होत. ही बैचनी इतकी भयंकर असते की ठराविक वेळेनंतर तुमचा जीव देखील जाऊ शकतो.

सुरुवातीच्या काळामध्ये दमा, अस्थमा हा आजार एखादे विशिष्ट वय झाल्यावर मनुष्याला होत असे परंतु हल्ली लहान मुलांमध्ये देखील श्वास घेण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळतात. बहुतेक वेळा जर तुमचे फुफ्फुसे व्यवस्थित रित्या कार्य करत नसतील. शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्याची प्रक्रिया व्यवस्थितरित्या होत नसेल तर अशावेळी देखील आपल्याला दम लागतो.

चालताना त्रास होतो आणि परिणामी दमा आपल्याला सतावू लागतो. जर तुम्हाला देखील श्वास घ्यायला त्रास होत असेल तर सुरुवातीच्या काळामध्येच आपल्याला काही लक्षणे दिसतात त्यांच्यावर उपाययोजना करणं अत्यंत गरजेचे आहे, यामुळे तुमचे पुढील आयुष्य निरोगी राहू शकेल. आजच्या लेखांमध्ये दमा, अस्थमा व अन्य श्वासांचे विकार मुळापासून नष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत.

हे वाचा:   चांदीचे काळे पडलेले दागिने मिनिटभरात होतील पांढरेशुभ्र अगदी नवे घेतले तसे.!

हा उपाय केल्याने सुरुवातीच्या काळामध्येच दमाचे दिसणारे लक्षण नाहीसे होऊन जाईल आणि तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही. श्वसनाचे सगळे विकार दूर करण्यासाठी आज आपण जो उपाय करणार आहोत तो अत्यंत महत्त्वाचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लसूणच्या पाकळ्या लागणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, लसूण मध्ये अँटीबॅक्टरियल आणि वेदनाशक गुणधर्म असतात.

जर तुमच्या फुफुसांमध्ये कोणत्याही प्रकारे विषारी घटक जमा झाले असतील तर ते दूर करण्याची शक्ती लसूणच्या पाकळ्यांमध्ये असते आणि म्हणून तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या बारीक ठेचून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला सुंठ लागणार आहे. सुंठ म्हणजे आल्याची सुकलेली पावडर. ही पावडर बाजारामध्ये सहजरीत्या उपलब्ध होते.

आल्यामध्ये उष्णता निर्माण करणारे गुणधर्म असतात आणि म्हणूनच तुमच्या छातीमध्ये कोणत्याही प्रकारचा कफ जमा झाला असेल तर तो कफ दूर करण्याची शक्ती आले मध्ये असते. आता आपल्याला एका पातेल्यामध्ये बारीक वाटलेले लसूण टाकायचे आहे आणि सुंठ पावडर टाकायचे आहे. या दोन्ही पदार्थांमध्ये एक ग्लासभर दूध मिक्स करायचे आहे. दुधामध्ये कॅल्शियमची मात्रा जास्त असते आणि म्हणूनच तुमच्या शरीराला कॅल्शियम मिळण्याची आवश्यकता दुधामुळे पूर्ण होते.

हे वाचा:   घरीच उगवा इलायची.! कधीच दुकानातून इलायची आणायची गरज पडणार नाही.! महिलांसाठी खास आहे नक्की वाचा.!

आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित उकळू द्यायचे आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. हा उपाय तुम्हाला दिवसातून दोन वेळा किंवा एक वेळा अवश्य करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या फुफुसून आली की मध्ये किंवा श्वसन नलिकेमध्ये कोणताही प्रकारचे विषाणू जमा झाले असतील तर ते निघून जातील आणि तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारचा श्वसन विकार होणार नाही.

दमा असेल तर तो दमा लवकरच बरा होऊन जाईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.