मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक अशी रेसिपी जे तुमच्या तब्येतीला करेल अगदी ठणठणीत मजबूत. खूप टेस्टी आणि हेल्थी आहे ही रेसिपी. बऱ्याचदा मुलं काय आपण स्वतः देखील दूध पिणं पसंत करत नाही. दूध पिणं सगळ्या वयोगटातील लोकांना फायदेशीर असते. परंतु या पद्धतीने बनवून पिल्यास त्याचे फायदे कैक पटीनी वाढतात. सगळे त्रास होतील गायब.
बनवायला अतिशय सोपी अशी ही कृती आहे. हे तुम्ही बनवून ठेवून साठवू शकता. चला तर मग पाहुयात ही कृती काय आहे ते…! दूध पिण्याच्या एक दिवस आधी तुम्हाला ही तयारी करावी लागेल फक्त इतकेच… या रेसिपीमध्ये आपल्याला लागणार आहे काळी खारीक व बदाम. १० खारीक देठ आणि बिया काढून घ्या यात १५-२० बदाम घाला. हे पाण्यात भिजवून ठेवा.. रात्रभरासाठी.
सकाळपर्यंत खारीक छान भिजून फुगलेली असेल. खारीकची चव आवडत असल्यास त्या ऐवजी मऊ खजूर तुम्ही न भिजवता यात वापरू शकता. भिजवलेली बिया काढलेली खारीक आणि साल काढलेले बदाम मिक्सर मध्ये वाटून घ्या. यामध्ये थोडं दूध घाला. पेस्ट बनवा. ही पेस्ट जास्त बनवून तुम्ही फ्रिजर मध्ये देखील ठेवू शकता. फ्रिज मध्ये ठेवू नका कारण दोन दिवसांनी ही पेस्ट दुधात घातल्यास दूध नासण्याची शक्यता असते.
आता दूध बिना सायीचे, बिना जास्त क्रीम वाले साधं गायीचे घ्यावे. कारण रोज हेवी दूध पिऊन वजन वाढण्याचा वेगळी समस्या सुरु होईल. ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी फॅट्स असलेले म्हशीचे दूध वापरा. दोन ग्लास दूध उकळून घ्या. उकळताना यामध्ये अडीच चमचा आपण बनवलेली पेस्ट घाला. बाकीचे मिश्रण फ्रिजर मध्ये ठेवा. पून्हा बनवयच्या आधी थोडा वेळ आधी बाहेर काढून घ्या.
हे दुध सतत हलवत रहा. थोडं उकळून झाल्यावर यात एक छोटा चमचा हळद घाला. यानंतर विलायची पावडर दोन तीन चिमूटभर घाला. एक छोटा तुकडा दालचिनी घाला. जास्त गोड आवडत असल्यास त्यांनी थोडी धागेवाली खडीसाखर घाला. गुळ घातल्यास दूध फाटेल. खारीक गोड असतातच कमी गोड आवडणाऱ्यांनी हे घालू नये. अजून थोडं उकळून झाल्यावर गॅस बंद करा.
यातून दालचिनी तुकडा बाजूला काढा. लक्षात ठेवा असे दूध खूप घट्ट बनवू नका. अशाप्रकारे आपले हे दूध तयार. हे रोज प्या. ८-१० दिवसातच फरक जाणवेल. झोप चांगली होईल. ताजेतवाने वाटेल. औषध घेण्यापेक्षा असे घरगुती नैसर्गिक उपाय करून बघा. ते म्हणतात ना, Prevention is better than cure..!
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.