खाज, खरुज, नायटाची आता कायमची चिंता मिटली.! आता करा शेवटचा इलाज, यापुढे एकही डाग शरीरावर दिसणार नाही.!

आरोग्य

आज आपण लढणार आहोत त्या रोगाशी जी बऱ्याचदा अनेक लोकांना होते. याच नाव आहे Eczema. जे इसब, नायटा, गजकर्ण प्रकारात येते. आपण बनवणार आहोत यासाठी एक खास मलम जो नार्मल नैसर्गिक आहे. याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. या उपायाने तुम्हाला खूप आराम मिळेल. हा एक त्वचेसंबंधित गंभीर आजार आहे. ज्यामुळे त्वचा लालसार होऊन खूप असह्य खाज सुटून वेदना होऊ लागतात.

याचे प्रमाण वाढल्यास रक्त देखील येऊ शकते. जास्तकरून हे पावसाळ्यात वाढते. त्वचेच्या समस्या म्हणजे अशा की ज्या मुळे आपण त्रासून जातो. ज्यात आपण बऱ्याचदा नारळ तेल लावतो व डॉक्टर कडे जाऊन गोळ्या खात बसतो. डॉक्टरांचा सल्ला ऐकलाच पाहिजे पण अनेकदा जास्त गोळ्यांनी साईड इफेक्ट होतो हे विसरून चालणार नाही.

यामुळे तात्पुरता इलाज तर होतो पण याचे शरीरावर दीर्घ दुष्परिणाम बघायला मिळतात. जस केस गळणे, ओठ सुकणे, पाय सुजणे, झोप न येणे असे अनेक साईड इफेक्ट दिसतात. हे थांबवण्यासाठी परत गोळ्या. चक्र सुरूच राहते व यामुळे शरीराची हानी होते. त्यामुळे हा घरगुती उपाय तुम्ही करून बघा. सगळ्यात आधी तुम्ही हे तपासा की कोणता कपडा(जसे शिफोन / सिंथेटिक इत्यादी) तुम्हाला सूट करत नाही.

हे वाचा:   कानाला हातही न लावता कानातला सगळा मळ घाण एका सेकंदात बाहेर काढा.! अगोदर पेक्षा दुप्पट ऐकू येईल.! वृद्ध लोकांसाठी खास माहिती.!

कॉटन कपडा वापरण्याचा सल्ला आम्ही तुम्हाला देऊ अगदी अंतरवस्त्र सुद्धा! रोज दोनदा सकाळी व झोपताना अंघोळ अगदीच केली पाहिजे तेही माइल्ड सौम्य साबणाने. कपडे धुताना वेगळे धुवून उन्हात नीट वाळवा. यानी बॅक्टरिया राहणार नाही. अर्धवट गार कपडे कपाटात ठेवू नका. ऊन नसेल तर इस्त्री करून नीट वाळेल असं टांगून ठेवा. इस्त्रीने कपड्यावरील बॅक्टरिया मरतात.

हे झाल्या काळजी घेण्याच्या गोष्टी आता उपचार बघूया. आपल्या कडीलिबांची पान स्वच्छ धुवून घ्या. हे गरम पाण्यात उकळन घ्या. हे आपल्या अंघोळीच्या पाण्यात घालून अंघोळ करा. असं केल्याने अनेक इन्फेकशन तर असेच संपतील. जर कडूलिंब उपलब्ध नसेल तर एक झाकण डेटॉल अंघोळीच्या पाण्यात घाला. आता पाहूया एक मलम.

कसा बनवायचा? याला लागणारे सर्व सामान घरात सहज उपलब्ध होतील असे ऑरगॅनिक आहेत. यासाठी आपल्याला लागणार आहे हळकुंड जी घरी बारीक करून पावडर बनवायची आहे. बाजारातील आयती हळद मध्ये केमिकल असते. दुसरा घटक आहे कोरपडीचा ताजा गर आणि कडुलिंबाचे तेल. हे तीनही घटक प्रत्येकी एक एक चमचा एका वाटीत एकत्र घ्या. चमच्याने नीट फेटून एक मलम बनवा.

हे वाचा:   शरीराची कोणतीही बंद पडलेली नस एका झटक्यात चालू होईल.! फुगलेल्या किंवा निळ्या झालेल्या नसा असतील तर एकदा नक्की वाचा.!

ते बाटलीत भरून ठेवा. इन्फेकटेड त्वचेवर हा मलम लावण्याआधी तो भाग साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. न पुसता त्वचाचे पाणी वाळू द्या मग हा मलम लावा. काही दिवसातच आराम मिळेल. फरक स्वतः च अनुभवा. रात्री लावून सकाळी कोमट पाण्याने ही त्वचा स्वच्छ धुवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *