पोट झटपट साफ करण्यासाठी आताच करा हा उपाय, पोटातले गॅस सर्व नष्ट, एसिडिटी कधी होणारच नाही.!

आरोग्य

बद्धकोष्ठतेच्या समस्येने आज-काल प्रत्येक जण त्रस्त आहे. थंडीच्या दिवसात तर बद्धकोष्टताचे प्रमाण जास्तच वाढते कारण थंडीमध्ये आपले पाणी पिणे खूपच कमी होते. बऱ्याच जणांच्या शरीरामध्ये फायबरचे प्रमाण अति कमी असते त्यामुळे त्यांना बद्धकोष्ठतेचा सामना करावा लागतो. बद्धकोष्ठतामुळे आपल्याला दिवसभर जडत्व येते.

काहीही अन्न खाल्ल्यास ते आपल्या घश्यात येते. ऍसिडिटीच्या तक्रारीचे प्रमाण देखील वाढते. गॅस चा त्रास वाढतो. अशा मध्ये कितीही जुन्या पोटांच्या तक्रारी असल्यास केवळ एक दिवसात होतील गायब या उपायाने..! हा साधा सरळ उपाय आहे. या उपायामध्ये अशी वस्तू वापरली आहे की जी सहज सर्वत्र उपलब्ध होते. घरगुती नैसर्गिक उपाय असल्यामुळे यामध्ये कोणतेही रासायनिक घटक नाहीत.

त्यामुळे शरीराला कोणताही प्रकारचे नुकसान नाही. हे बनवण्यासाठी तुम्हाला फक्त पाच मिनिटांचा वेळ लागतो. आता तुम्ही तुमच्या पोटाच्या तक्रारी आणि बद्धकोष्ठ ते पासून चटकन मुक्ती मिळवू शकाल. यासाठी आपल्याला लागणार आहे मुळेठी. यालाच मराठी मध्ये आपण ज्येष्ठमध असे म्हणतो. हे आपल्या पूर्ण शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते त्यातल्या त्यात पोटासाठी तर वरदानच होय.

हे वाचा:   केसांना काळे करणे सोडून द्यावे लागेल.! कारण आता घरचे काही साहित्य वापरून होतील काळेभोर केस.! एकदा नक्की वाचा आभार मानावे लागेल.!

यामुळे तुमचे शरीर गरम राहील. तुमची सर्दी खोकल्याची समस्यादेखील ठीक होईल. बद्धकोष्ठतेची समस्या देखील होईल मुळापासून नष्ट. तुमच्या जवळच्या किराण्याच्या दुकानात तुम्हाला सहज उपलब्ध होईल जेष्ठमध. आजकाल बाजारात ज्येष्ठमधाची पावडर सुद्धा मिळते. या उपायात दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे ओवा.

गॅस, अपचन आणि ऍसिडिटी साठी ओवा रामबाण उपाय आहे. हा उपाय संध्याकाळी करणार असल्यास सकाळी तयार करून ठेवावा यासाठी एक ग्लास पाणी घ्या. अर्धा चमचा ओवा पाण्यात टाका. ज्येष्ठ मध पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यावर खूप माती असते. स्वच्छ धुतल्यावर दोन तुकडे ओवा घातलेल्या पाण्यात घाला. दिवसभर हे भिजू द्या.

रात्री या मिश्रणात अजून पाव ग्लास पाणी घालून मंद आचेवर कमीतकमी पाच-सात मिनिटं उकळवा. यावेळी थोडस आलं किसून यात घाला. हे पेय उकळून तयार झाल्यावर एक तास असेच राहू द्या. यात दोन चिमूटभर काळ मीठ घाला आणि हे जेवणानंतर एक तासाने हे पेय गाळून प्यावे. हे पेय गरम गरम पिण्याची गरज नाही.

हे वाचा:   तुम्ही कधी विचारही करू शकणार नाही, एक अंड तुमच्या केसांचे काय हाल करू शकतात.! केसांची सुंदरता हवी असलेल्या लोकांनी एकदा नक्की वाचा.!

टिप्स : १. या उपाया सोबत दिवसभरात चार ते पाच लिटर पाणी पीत राहावे. २. शारीरिक हालचाल चालणे व्यायाम यापैकी काहीही असले पाहिजे. ३. सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यावे. ४. हा उपाय नियमित करू नये. बद्धकोष्टतेची समस्या झाल्यावर सलग तीन ते चार दिवस हा उपाय करावा. ५. हिरव्या पालेभाज्या आणि फायबर युक्त फळे यांच आहारातील प्रमाण वाढवा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *