ह्या टिप्स वाचल्या नाही तर पश्चाताप करत बसावे लागेल.! आयुष्यात खूप कामी येतील ह्या टीप्स आणि ट्रिक्स.!

आरोग्य

आपल्या घरात अनेक प्रकारची सामग्री असते जिच्या मदतीने आपण अनेक प्रश्न चुटकी सरशी सोडवू शकतो. मित्रांनो आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या पावसाळ्यामध्ये खूप उपयुक्त ठरतील. सगळ्यात आधी नंबर येतो मक्याचा. आपण नेहमी मक्याला एकत्र गॅसवर किंवा कोळश्यावर भाजतो. जास्त करून कोळसा घरी उपलब्ध नसल्याने आपण गॅस वरच भाजून मका खातो पण ती मज्जा येत नाही.

आता मी जो उपाय सांगणार आहे त्यामुळे मका छान भाजला जाईल, जळणार सुद्धा नाही व खूप चवीष्ट लागेल. मक्याला नीट सोलून नीट धुवून व पुसून घ्यायचे आहे. आपल्याला आता एक कुकर घेऊन त्यामध्ये थोडे तेल लावून जेवढे मके राहतील तेवढे ठेवायचे आहेत. एक कापसाचा जाड कपडा घेऊन पाण्यात बुडवून हलके पिळून घ्यायचे आहे. आता त्याच्या २ ते ३ घड्या करून त्या मक्यांवर ठेवून द्यायचे आहे.

तुम्हाला वाटत असेल की बिना पाण्यामुळे मके जळतील व कुकरदेखील फुटेल. परंतु आपण त्या कपड्यामधून पूर्ण पाणी न काढल्यामुळे कुकरमध्ये वाफ तयार होईल आणि मके तर तयार होतील च व आपल्या कुकरला देखील काही नुकसान होणार नाही. गॅस मंद आचेवरच १० ते १२ मिनिटे ठेवून हे शिजवायचे आहे आणि मधे-मधे मके हलवायचे आहेत. त्यांनतर एकाबाजूने ते शिजून तयार झाल्यावर दुसऱ्या बाजूला देखील फिरवून ते शिजवून घ्यायचे आहे.

हे वाचा:   टाचेपासून डोक्यापर्यंत असलेल्या सगळ्या रोगांना संपवते हे पाने, लाखमोलाचे आहेत ह्या वनस्पतीचे पाने.!

आता चवीनुसार मीठ मसाला लावून हा मका खाऊन बघा. आपल्या घरामध्ये मातीच मडकं असेल तर पावसाळ्यात त्या मडक्यावर सफेद बुरशी येते. असे झाल्यामुळे प्रश्न निर्माण होतात यातील पाणी प्यावे कि नाही ? तर मित्रांनो पाणी आतमध्ये खराब नाही होत बाहेरील बाजूला फक्त बुरशी येते. यासाठी एक कपड्यांचा ब्रश घेऊन बाहेरील बाजू नीट घासून घ्यायची आहे आणि धुवून नंतर पुसून घ्यायचे आहे. यामुळे बुरशी निघून जाईल.

त्यानंतर एका पेंटब्रशच्या सहाय्याने दार आठ दिवसांनी मडक्याच्या बाहेरील बाजूला तेल लावायचे आहे. भले तुम्ही कितीही वेळा नवीन मडके विकत घ्या परंतु हे नेहमी असेच होईल त्यामुळे या उपायामुळे तुम्हाला प्रत्येकवेळी नवीन मडकं घ्यायची गरज पडणार नाही. आपल्याला एक कमळ काकडी घ्यायची आहे. हे खूप पौष्टिक असते. आजकाल याच्या खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, नाश्ता व चायनीज पदार्थदेखील बनवले जातात.

आज मी तुम्हाला संगणार आहे की ही कश्या प्रकारे विकत घ्यायची आहे. जेव्हाही तुम्ही हे विकत घ्याल तेव्हा नक्की बघा कि हे दोन्ही बाजूने बंद असायला हवे. या कमळ काकडीच्या खाली कमळाचे स्टॅम्प असते. जर नीट बंद असेल तर आतमध्ये माती नसते परंतु जर खुले असेल तर आतमध्ये माती असू शकते. यालानीत सोलून आपल्याला हव्या त्या प्रकारे तयार करून हे खायचे आहे.

हे वाचा:   या सात गोष्टी शुगरच्या पेशंटसाठी अमृत आहेत.! या सात गोष्टीचे सेवन करणारे लोक शुगर पासून नेहमी दूर जातात.!

याला बनवण्याची बऱ्याच रेसिपी उपलब्ध आहेत. आपल्या कडे या कमळ काकड्या खूप जास्त असतील व एकाच दिवसात त्या आपण बनवू शकत नसाल तर त्यांना साठवून कश्या पद्धतीने ठेवायचे. कारण हे पाण्यामध्ये तयार होते त्यामुळे आपण याना पाण्यामध्येच ठेवायचे आहे. नीट धुवून, सोलून त्याला छोट्या तुकड्यांमध्ये कापून कोणत्यातरी पाण्याच्या भांड्यामध्ये हे ठेवायचे आहे. परंतु आपल्याला याचे पाणी रोज बदलायचे आहे.

आत दिवसापर्यंत हे खराब होणार नाही. जर आपल्याला कमळ काकड्यांचा ऋतू नसताना देखील त्या मिळाल्या तर त्यांना कसे बनवावे हे जाणून घेऊया. ऋतुमधील कमळ काकड्या लवकर मऊ बनतात परंतु ऋतू नसतानाचे कमळ काकड्या लवकर मऊ होत नाहीत कडक राहतात. या उपायासाठी कुकर मध्ये पाणी टाकून यांना शिजवून घ्यायचे आहे. एक छोटे चमचा तूप किंवा मीठदेखील टाकू शकता.

त्याचप्रमाणे जर तीन ते चार पालकची पाने यामध्ये टाकली तर हे खूपच मऊ होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.