आंधळे होण्याआधी नक्की वाचा.! मोबाईल बघून बघून डोळ्याचे वाटोळे झाले आहे.! त्यासाठी आजपासूनच व्हा सावध आणि करत जा हे एक काम.!

आरोग्य

मित्रांनो जर तुम्हाला चष्मा लागला असेल व तुम्हाला चष्म्याचा नंबर कमी करायचा असेल, तर काय करावं.. ? मित्रांनो आज-काल सगळीकडे ऑनलाईनचा जमाना आहे. लोक मोबाईल, कॉम्पुटरचा अतिरिक्त वापर करतात. वापर करणं आणि अतिरिक्त वापर करणं यामध्ये फरक आहे. सकाळी उठल्यावर लगेच तुम्ही मोबाईल घेत असाल रात्री झोपेपर्यंत मोबाईल तुम्ही वापरता, मोबाईल म्हणजे जीवन झालेले आहे.

घरामध्ये जरी चार माणसे असतील तरी एक या टोकाला तर दुसरा त्या टोकाला मोबाईल घेऊन बसलेला असतो. मोबाईलचे फायदे सुद्धा आहेत व दुष्परिणाम सुद्धा आहेत. परंतु जर तुम्ही एकटक मोबाईल बघत असाल, सतत कॉम्पुटर वापरत असाल तर त्याचा त्रास होणारच यामुळे तुम्हाला चष्मा लागतो. वृद्ध माणसांना चष्मा लागतोच परंतु आजकाल १०-१२ वर्षाच्या लहान मुलांना देखील चष्मा लागतो.

हे दृश्य पाहून थोडं वाईट देखील वाटतं. असं तुमच्या सोबत होऊ नये असं वाटत असेल तर मोबाईलचा अती वापर टाळा. डोळा हा आपल्या शरीराचा खूप महत्त्वाचा अवयव आहे. पाच मुख्य इंद्रियां पैकी डोळा हा एक इंद्रिय आहे. जर डोळे नसतील तर आपण काहीच पाहू शकणार नाही व त्याचे अनुभव सुद्धा घेऊ शकत नाही. तसेच डोळे  हे खूप नाजूक असतात. त्यांची काळजी घेणे आवश्यक असते. डोळे किंवा नेत्र जीवधारींचा तो अंग आहे.

हे वाचा:   या चार राशीचे लोक कधीच गरीब होऊ शकत नाही, हे असते यामागे कारण.!

जो प्रकाशाच्या प्रति संवेदनशील आहे. डोळ्यांची दृष्टी म्हणजेच पाहण्याची शक्ती वाढण्यासाठी आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला एक साधा सोपा घरगुती रामबाण उपाय सांगणार आहोत. हा उपाय अत्यंत नैसर्गिक व आयुर्वेदिक आहे त्यामुळे याचा तुमच्या शरीरावर काही वाईट परिणाम होत नाही. हा उपाय जास्त खर्चिक देखील नाही त्यामुळे अगदी घरातील सामग्रीचा वापर करून तयार करू शकता.

ही माहित तुम्ही कुठे वाचली नसेल म्हणून हा आमचा लेख अगदी शेवट पर्यंत वाचा. गाजर ही फळभाजी आपल्या सर्वांनाच आवडते. गाजर आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे कोशिंबीर व अनेक पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. गाजरात विविध प्रकारचे मिनरल्स व विटामीन असतात. आपल्याला या उपायासाठी ताजे गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. पुढे याला बारीक करून घ्या. दुसरा घटक जो आपल्याला या उपायासाठी वापरायचे आहे तो म्हणजे अक्रोड.

हा एक सुकामेवा आहे. आपल्या मेंदूच्या विकासात अक्रोड खूप मदत करते. लहान मुलांना देखील अक्रोड आवर्जून खायला दिले पाहिजे. यात विविध प्रकारचे घटक असतात जे शरीराला फायदा पोहोचवतात. दोन अक्रोड सोलून आपल्याला या उपायासाठी घ्यायचे आहेत. या नंतरचा आपला घटक आहे लिंबू. लिंबू आपल्या शरीराला रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी खूप मोठा रोल करते. लिंबाच्या सेवनाने शरीराला जीवनसत्त्व क मिळते.

हे वाचा:   खूपच खोकला येत असेल तर, गोळ्या औषधे घेणे आधी, घरातच करायचा हा एक उपाय.! सर तुझ्यासोबत खोकला दोन तासात गायब होईल.!

आपल्या डोळ्यांच्या शक्तीसाठी लिंबाचं सेवन केले गेले पाहिजे. एक पिकलेल्या लिंबाचा रस काढून घ्या. मित्रांनो या नंतरचा घटक आपल्याला या उपायासाठी आवश्यक आहे तो म्हणजे मध. गाजर, अक्रोड व लिंबाचा रस यांना मिक्सर मध्ये टाकून याचे मिश्रण करून घ्या आता यात पुढे मध टाका. हे मिश्रण रोज रात्री झोपण्याच्या आधी घ्या. याच्या नियमित सेवनाने तुम्हाला असणारे दृष्टीच्या संबंधित सर्व समस्या गायब होतील.

हा एक चांगला व सोपा नैसर्गिक उपाय आहे. चष्मा काढून टाकण्यासाठी हा आयुर्वेदिक घरगुती रामबाण उपाय एकदा करून पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.