ताप आला आहे का.? तापामुळे तोंडाला चव येत नाहीय.? हा रामबाण उपाय एकदा नक्की करा.!

आरोग्य

अनेकदा आपल्याला कोणत्या ना कोणत्या कारणावरून ताप, सर्दी, खोकला इत्यादी प्रकारच्या अनेक समस्या उद्भवत असतात. आज कालच्या या काळामध्ये आजारी पडणे ही समस्या जरा भयंकर बनत चालली आहे. कारण माणसाचे आरोग्य चांगले असेल तर असा मनुष्य कोणतेही कामे अगदी सहजपणे करू शकतो.

 

ज्या व्यक्तीचे आरोग्य चांगले असते त्या व्यक्तीकडे काही नसले तरी चालते म्हणजेच आरोग्य हीच खूप मोठी श्रीमंती आहे यावरून असे आपल्याला समजते. त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. अनेक लोकांना ऋतु बदल सहन होत नाही ऋतु बदलामुळे अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवतच असतात.

 

अनेकदा ताप आल्यानंतर आपल्याला एक समस्या खूपच जास्त प्रमाणात उद्भवते ती म्हणजे तोंडाला चव नसणे. ताप आल्यानंतर आपल्याला काहीच खाऊ वाटत नाही. आपल्या तोंडाला चव नसते. अशावेळी काय करायला हवे हे आपल्याला समजत नाही. यावर एक जबरदस्त असा उपाय सांगितला गेला आहे हा उपाय केला तर अशा प्रकारच्या समस्येपासून नक्की सुटका मिळेल.

हे वाचा:   रात्री झोपताना उशी खाली तुळशीचे काही पाने ठेवून झोपा; सकाळी चमत्कार पाहून तुम्हीही हैराण व्हाल.!

 

हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम एक लिंबू द्यावे लिंबू हे आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे आपले पाचन तंत्र मजबूत बनत असते पोटाच्या अनेक विकारासाठी लिंबू खूपच फायदेशीर मानले जाते. तुम्हाला सर्वप्रथम हे लिंबू कापून घ्यायचे आहे त्यानंतर या लिंबामध्ये असलेल्या सर्व बिया काढून टाकायच्या आहेत त्यानंतर या वरती एक चमचा काळी मिरची पावडर टाकायची आहे व आपले खाण्याचे साधे मीठ टाकायचे आहे.

 

त्यानंतर हे अर्धे कापलेले लिंबू, चमचा च्या साह्याने किंवा चिमट्याच्या साह्याने गॅसवर थोडे गरम करून घ्यायचे आहे. यातून जो पर्यंत थोडासा फेस स्वरूपात पदार्थ बाहेर येत नाही तोपर्यंत याला गरम करून घ्यायचे आहे. ज्यावेळी हे चांगल्याप्रकारे गरम होईल त्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे.

हे वाचा:   अनेक महागडी औषधे यापुढे हात टेकवेल, दवाखान्यात जाण्यापूर्वी एकदा या वनस्पती बद्दल वाचाच, या वनस्पतीने वाचवले आहेत लाखो रुपये.!

 

त्यानंतर याचे काही थेंब तोंडात टाकायचे आहे असे केल्याने तापेमुळे तोंडाला चव नव्हती ती पुन्हा येईल तसेच तुम्हाला कोणतीही गोष्ट खाण्याचे मन करत नसेल तर खाऊ वाटेल. असा हा सोपा उपाय तुम्ही अगदी सहजपणे घरगुती पद्धतीने करू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

 

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *