झोप न लागण्याची समस्या आता कायमची मिटली जाणार.! डोळे मिटल्या बरोबर लगेच क्षणात येणार झोप.! निद्रानाश वर करा पर्मनंट इलाज.!

आरोग्य

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला काही उपाय आणि टीप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला निद्रानाशाची समस्या आता कधीच भेडसावणार नाही. आज-काल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि अनेक प्रकारच्या ताणतणावांमुळे अशी समस्या बऱ्याच का आजूबाजूला बघायला मिळते. वाढता मोबाईलचा आणि सोशल मीडियाचा वापर देखील याला कारणीभूत आहे.

अनेक जण या समस्येसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित गोळ्या खाण्याचे आधीन बनतात. परंतु यामुळे तुमच्या शरीराचे नुकसान होते. तेव्हा गोळ्या न खाता शांत झोप कशी मिळवायचे यासाठी वाचा हा संपूर्ण लेख. कोणताही आजारावर उपाय करण्यापूर्वी त्याच्या मागचे मूळ कारण जाणून घ्या. आणि मूळ कारणावरचा इलाज केल्याने तुमची समस्या लवकर संपते.

तुम्हाला अतिचिंता करण्याची व ते विचार करण्याची सवय असेल हे एकमेव त्यामागचे कारण होय. वयोमानानुसार झोप कमी होत जाते हे नैसर्गिक आहे. आम्ही सुचवत आहोत ते उपाय तर अवश्य करा परंतु घरामध्ये वादविवाद टाळा, अतिविचार करणे सोडा, नैराश्‍य येत असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

उपाय १: रात्री झोपायच्या अगोदर गरम पाण्याने पाय स्वच्छ धुऊन घ्यावेत. यानंतर पायांच्या तळव्याला मोहरीच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करा. यामुळे आपले डोके जास्तच विचार करत राहते ते शांत होते. यासोबतच तुम्ही सकाळी उठल्यावर मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा.

हे वाचा:   अंड्याची टरफले फेकून देणाऱ्यानो, एकदा हे नक्की वाचा, एकही टरफल बाहेर फेकले जाणार नाही.!

उपाय २: सर्पगंधा आणि अश्वगंधा याची पावडर बाजारात सहज उपलब्ध होते. दोन्ही पावडर समप्रमाणात घेऊन यांचे चूर्ण बनवा. रात्री झोपताना तीन ते पाच ग्रॅम असे चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्या. यामुळे तुम्हाला गाढ झोप लागण्यास मदत होईल.

उपाय ३ : दोन चमचे मेथीच्या पानांचा रस आणि एक चमचा मध व्यवस्थित मिक्स करून सकाळी याचे सेवन केल्याने झोप न येण्याच्या समस्येपासून सुटका होते. तुम्हाला शुगरचा त्रास असल्यास यामध्ये मध घालू नका.

उपाय ४: एक कप गरम दुधामध्ये अर्धा चमचा दालचिनी पावडर मिसळून रात्री झोपेच्या आधी पिल्याने तुम्हाला ताबडतोब गाढ व शांत झोप लागते. उपाय ५: झोपण्याच्या आधी एक कप गरम दुधामध्ये एक चमचा जायफळ पावडर घाला. यासोबतच एक चिमोटे भारत के सर देखील यात घाला. असे दूध पिल्याने तुमचे झोप न येण्याची समस्या दूर होईल.

उपाय ६: एक ग्लास पिण्याजोगे कोमट दुधामध्ये एक चमचा मध घालून पिल्याने देखील झोप न येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. मधुमेह असलेल्यांनी मधाचा वापर करू नका. उपाय ७: एक चमचा जिरा भाजून वाटून घ्या. एक ग्लास गरम पाण्यामध्ये हे मिसळा. आणि पाच मिनिटांपर्यंत झाकून ठेवा. दररोज झोपायच्या आधी हे पिल्याने तुम्हाला निद्रानाशाची समस्या सतावणार नाही.

हे वाचा:   हे पाणी सकाळी एकदा प्या, मुतखड्याचा त्रास गेलाच म्हणून समजा, खूपच जबरदस्त असा उपाय...!

उपाय ८: झोप न येण्याची समस्या दूर करण्यासाठी बडीशेपचा देखील खूप फायदा होतो. यासाठी ग्लास पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप घालून उकळावे. असे पाणी दिवसातून दोन वेळा पिल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

या सर्व घरगुती उपायांपैकी तुम्ही कुठलाही उपाय करू शकता. परंतु यासोबतच तुम्हाला दररोजच्या ध्यानधारणा करणे गरजेचे आहे. नियमित प्राणायाम करा. चांगल्या प्रतीचा आहार घ्या. त्यामुळे अति विचार करण्याची तुमची समस्या जाईल. तुम्ही दुःखी न राहता मनापासून आनंदी राहाल. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त आवडणाऱ्या गोष्टींमध्ये मन रमवा.

झोपण्याच्या तासभर आधी मोबाईल लांब ठेवा. वेळेवर झोपून शरीराला होणाऱ्या अनेक रोगांपासून दूर ठेवा आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *