फक्त 3 वेळा वापरा.! कधीच हाडे दुखी होणार नाही.! गुडघे दुखत असेल तर हा उपाय तुमच्या साठीच आहे.!

आरोग्य

आज आपण जाणून घेणार आहोत असा घरगुती उपाय ज्यामुळे हाडांचे दुखणे, डोळ्यांमध्ये आलेली कमजोरी, थकवा, जॉईंट पेन, कंबर दुखी यासारख्या आजारांवर मात करण्यासाठीचा हा घरगुती उपाय. त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे ते आपल्याला बाजारपेठेमध्ये सहज उपलब्ध होऊन जाईल किंवा आपल्या स्वयंपाक घरामध्ये देखील सहजपणे उपलब्ध होईल.

चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणत्या प्रकारची सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला येथे लागणार आहे खसखस. खस खस ला इंग्रजी मध्ये आला पोपी सीड्स म्हणून देखील ओळखले जाते.दुसरी गोष्ट आपल्याला इथे लागणार आहे ती म्हणजे बडीशेप. बडीशेप ला इंग्रजी मध्ये फेंनेल सीडस म्हणून देखील ओळखले जाते.

बडीशेप जास्त महाग नसते आणि आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहजपणे उपलब्ध होते. बडीशेप जेवढे स्वस्त असते त्याउलट ती आपल्या शरीरासाठी भरपूर उपयुक्त असते. बडीशेप चा उपयोग आयुर्वेदामध्ये देखील केला जातो. कारण बडीशेप ही औषधी गुणधर्मांनी भरपूर आहे. पोटासाठी देखील बडीशेप चा वापर केला जातो आणि हाडांच्या दुखण्यासाठी देखील बडीशेप चा वापर केला जातो.

त्याचबरोबर तिसरी गोष्ट आपल्याला येथे घ्यायची आहे ती म्हणजे सुके खोबरे. तुमच्याकडे सुके खोबरे नसेल तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचा देखील वापर येथे करू शकता. थोडेसे सुके खोबरे घ्यायचे आहे. त्याच बरोबर आपल्याला येथे लागणार आहे खडीसाखर. ज्याला इंग्रजीमध्ये रॉक शुगर देखील म्हटले जाते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शरीर व तोंड गोड होण्यासाठी आपल्याला इथे खडी साखरेचा वापर करायचा आहे.

हे वाचा:   जगात आले आहे हे भयंकर किडे.! यांना बघून दुर्लक्ष करणे पडू शकते महागात.! हे किडे माणसासोबत करतात असे काही.!

ज्यांना या घरगुती उपाय करताना गोड खाणे आवडत नसेल तर ते खडीसाखरेचा वापर टाळू शकतात. सर्वप्रथम आपल्याला बडीशेप ला मिक्सर ग्राइंडर द्वारे बारीक पूड तयार करून घ्यायची आहे. पावडर बनवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला बडीशेप ची पावडर बारीक करून घ्यायची आहे त्यामध्ये दाणे दाणे ठेवू नये. त्यानंतर गॅसवर एक पात्र ठेवून ते थोडेसे गरम झाल्यावर त्यामध्ये दोन चमचे घरगुती तूप टाकायचे आहे.

इथे तुपाचा वापर करणे अनिवार्य आहे कारण ज्यांना गुडघेदुखी हाडांचा त्रास असेल त्यांनी तुपाचा वापर करणे गरजेचे आहे. दोन चमचे तुपामध्ये आपल्याला एक चमचा खसखस टाकायचा आहे. खसखस थोडासा हलका भाजून झाल्यावर त्यामध्ये एक ग्लास दूध टाकायचे आहे आणि गॅस मंद आचेवर ठेवायचे आहे. जर तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे नसेल तर तुम्ही या घरगुती उपायांमध्ये गाईच्या दुधाचा किंवा low-fat दुधाचा वापर करू शकता.

हा उपाय उन्हाळ्यामध्ये वापरू शकतो हा उपाय खास उन्हाळ्यासाठी बनलेला आहे. आता या मिश्रणामध्ये आपल्याला सुके खोबऱ्याचा तुकडा टाकायचा आहे. त्याचबरोबर यामध्ये एक ते दोन चमचे खडीसाखर टाकायची आहे. ज्यांना गोड नको असेल ते खडीसाखरेचा वापर करणे टाळू शकतात. आता जेव्हा दुधाला उकळी यायला सुरुवात होईल तेव्हा त्यामध्ये एक चमचा बडीशेप ची बारीक करून घेतलेली पावडर टाकायची आहे.

हे वाचा:   आता म्हातारेही दिसू लागतील तरुण.! फक्त खोबरेल तेलामध्ये ही एक वस्तू मिळवून केसांना लावा.! काळेभोर केस दुसऱ्या दिवशी तयार होतील.!

बडीशेप पावडर टाकून झाल्यावर उकळी आल्यावर लगेचच गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर या पूर्ण मिश्रणाला चांगल्याप्रकारे थंड होऊ द्यायचे आहे. कारण गरमीचे दिवस असल्यामुळे आपल्याला याचे सेवन गरम-गरम करायचे नाही आहे. हे मिश्रण थंड झाल्यावर एका ग्लास मध्ये काढून घ्यायचे आहे आणि आता हे दूध पिण्यायोग्य झालेले आहे. त्यामध्ये टाकलेल्या सुक्या खोबऱ्याचे आपल्याला चावून सेवन करायचे आहे.

आता तयार झालेला घरगुती उपाय आपल्याला जेवणानंतर एका तासाने सेवन करायचा आहे. याचा वापर तुम्ही दुपारी किंवा रात्री कोणत्याही वेळेस करू शकता. जेव्हा तुम्ही या उपायाचा वापर करणार असाल त्या दिवशी जेवण थोडे कमी घ्या कारण हे दूध पिऊन देखील तुमचे पोट भरणार आहे. या घरगुती उपाय याचा वापर तुम्हाला लगातार तीन दिवस करायचा आहे.

तीन दिवसाच्या वापराने तुम्हाला भरपूर फरक झालेला दिसून येईल. तुमचे गुडघे दुखी, कंबर दुखी हाडांचे दुखणे नाहीसे होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *