हृदय बनवा दगडासारखे मजबूत.! जीवनात म’रेपर्यंत कधीच हृदयासंबंधी चे रोग होणार नाही.! हृदय मजबूती साठी करा हे.!

आरोग्य

तुम्हाला माहित आहे का आजकाल जगामध्ये सर्वत्र हृदयरोगाने मरणाऱ्या लोकांची संख्या अतिशय तीव्रतेने वाढतच चालली आहे. आपण येणाऱ्या प्रत्येक दिवशीच कोणी मोठी सेलिब्रेटी, आपले नातलग अथवा जवळच्या काही व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचे ऐकतो. काल पर्यंत ठीक वाटणारी व्यक्ती देखील अचानक मृ’त्युमुखी हृदयाच्या विकारांमुळे पडते.

अगदी आपल्या तब्येतीची आणि आरोग्याची विशेष काळजी घेणार यांच्याबाबतीत देखील असे घडत आहे. आपलं हृदय कीती आरोग्यदायी आहे? काय अशी कारण आहेत ज्यामुळे आपले हृदय कमजोर होत आहे आणि आपल्याला माहीतही पडत नाही? हृदयाचे हेल्थ जाणून घेण्‍याच असे काही नवीन टेक्निक आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आम्ही या लेखाच्या माध्यमातून केला आहे.

एकेकाळी अशा प्रकारचा हृदयरोग पन्नास ते साठ वर्षानंतर च्या लोकांना व्हायचा. परंतु आजकाल याचे प्रमाण अगदी तीस ते चाळीस वर्षापर्यंत येऊन ठेपले आहे. पूर्वीचा लोकांपेक्षा आज-काल आपले हृदय कमजोर आहे. भारतामधील अकाल मृत्यु मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कारण आहे ते म्हणजे हृदया संबंधित रोग. मोठ्या प्रमाणात बाहेरचे फास्ट फूड जंक फूड खाणे, अकाली झोपणे, जेवणाच्या बदलत्या वेळा, मद्यपान आणि धूम्रपान करणे.

जास्त करून लोकांचे जीवन शैली याच पद्धतीची झाली आहे. ज्यामध्ये सुरुवातीला काही वाटत नाही. नंतर एकाएक छातीत दुखू लागते. कारण आहे वाढलेले कोलेस्ट्रॉल, नसा ब्लॉक होणे अथवा हार्ट अटॅक. रोजच्या जेवणातील अन्नपदार्थ देखीलआपल्या हृदयाच्या तब्येतीवर खूप फरक टाकत असतात. अर्जुन सालं : भारतामध्ये फार पूर्वीपासून याचा उपयोग केला जातो. याचा उच्च रक्तदाब, हार्ट फेल्‍युअर आणि नसांचे ब्लॉक होणे यामध्ये खूप लाभदायी ठरते.

हे वाचा:   सोन्याहूनही किमतीची आहे ही एक वनस्पती, दिसेल तिथून घरी आना ही आयुर्वेदिक वनस्पती.!

यामध्ये अँटी आयजेमिक, अँटी ऑक्सीडेंट, अँटी अथरोजेनिक, हायपोलिपिडेमिक गुणधर्म आढळतात. ज्याचा नियमित वापराने आपले हृदय दीर्घकाळासाठी सशक्त राहते. बाजारामध्ये आजकाल अर्जुनारिष्ट नावाचे औषध देखील तयार मिळते. किंवा दिवसातून एक ते दोन वेळेस याची गोळी देखील तुम्ही घेऊ शकता. अथवा घरी काढा भरून देखील तुम्ही याचं सेवन करू शकता. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर याचा परिणाम वेगवेगळा होतो.

लहान मुलं आणि गर्भवती महिला यांनी याचे सेवन करू नये. काळे मनुके : आपल्या शरीरासाठी उच्च रक्तदाब, छातीत दुखणे आणि खासकरून बॅड कोलेस्ट्रॉल घटवण्यासाठी मनूका अत्यंत लाभदायी आहे. मनोक याच्या सेवनाने आपल्या शरीरामध्ये नायट्रीक ऑक्साईड वाढते. त्यामुळे हृदयाचे सर्व रोग आपल्यापासून दूर राहतात. यामध्ये लोह, विटामिन बी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामुळे बद्धकोष्टता, ॲसिडीटी दूर होते आणि रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते.

20 ते 25 मनुके रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर बिया सकट चावून खा. लसूण : जेव्हा गोष्ट रक्तदाब नियंत्रण ठेवण्याची आणि हृदयासंबंधीचे रोग दूर ठेवण्याची असेल तर त्यामध्ये लसणाचा आहारात सेवन अवश्य करावे. खासकरून थंडीच्या दिवसांमध्ये याचे फायदे अनेक पटींनी वाढतात. अल्फा अल्फा : याबद्दल फार कमी लोकांना माहिती असते. याच्या बियांना मटकी प्रमाणे मोड आणून सेवन करणे शरीराला अत्यंत फायदेशीर असते. त्याचा नियमित वापराने हृदया संबंधीचे सर्व रोग आपल्यापासून राहतात दूर.

हे वाचा:   या झाडाच्या पानाने अनेक लोकांच्या शुगर च्या गोळ्या केल्या आहेत बंद.! रोज दोन पाने शुगर येईल नियंत्रणात.!

यामुळे रक्तातील साखर देखील नियंत्रणात राहते. अक्रोड : यामध्ये अँटिऑक्सिडंट anti-inflammatory तसेच लिपिड लोरिंग गुणधर्म आढळतात. ज्यामुळे कोरोनरी हार्ट डिसीज आणि ब्लड वेसल्स निकामी होण्याचा धोक्यांना दूर ठेवतात. रोज अक्रोड खाल्ल्याने शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. यासोबतच ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळे आणि अनेक गोष्टी आहेत ज्या हृदयाशी संबंधित आजार ठीक करतात.

रोज एक आवळ्याचे सेवन केल्याने आपल्या हृदयाचे स्वास्थ्य सुधारते. हळदीमध्ये आढळणारे करक्यूमिन मध्ये anti-inflammatory गुणधर्म मुळे हृदयरोगात कमालीची सुधारणा दिसते. जेष्ठमध, आले, लवंग, दालचिनी, तुळस हे घटक देखील हृदयाला शक्तिवान बनवतात. यामुळे यांचा काढा अधून-मधून घेणे फायदेशीर ठरते. धने बडीशेप पांढरे तीळ देखील हृदयासाठी एक नैसर्गिक औषधाप्रमाणे काम करतात. या सर्व गोष्टींमुळे आपल्या हृदयाला खूप फायदा होतो.

परंतु आपल्या चुकीच्या सवयी सगळ्यावर पाणी फिरवतात. तळलेले पदार्थ, जंक फूड, थोडीदेखील अंगमेहनत न करणे, स्मोकिंग ड्रिंकिंग गुटखा तंबाखू खाण्याच्या सवयी.. यामुळे चांगले खाल्लेले आपल्या अंगी लागत नाही. तेंव्हा आपल्या आहारात नियमित पालेभाज्या फळे सॅलड चे भरपूर प्रमाण असावे. सोबतच अशा वाईट सवय सोडून द्या आणि तुमच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *