मित्रांनो आणि मैत्रिणींनो काय तुम्ही देखील पांढऱ्या केसांमुळे हैराण झाला आहात? जर उत्तर हो असेल तर ही अनोखी माहिती तुमच्यासाठीच. तुम्ही केस रंगवण्यासाठी बाजारातून रासायनिक उत्पादन घेऊन येता आणि केसांना लावून अनेक केसांच्या तक्रारीना आमंत्रण देता. जसे कि, केस अति प्रमाणात गळणे, रुक्ष होणे, निस्तेज होणे अजूनच सफेद होणे!
तर यावर पर्यायी उपाय म्हणजे आज आम्ही तुमच्यासोबत घरगुती डाय कसा बनवायचा याबद्दल माहिती शेयर करणार आहोत. आणि हा डायमुळे तुमच्या केसांना एक देखील नवीन समस्या होणार नाही. याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. यासाठी तुम्हाला लागेल मोहरीचे तेल आणि कापूस. कापसाची मोठी वात वळून घ्या. हा कापसाचा गोळा मोहरीच्या तेलात १५ मिनिटे बुडवून ठेवा.
त्यानंतर बाहेर एका प्लेट मध्ये काढा. तुमच्या केसांच्या पांढरेपणा नुसार यामध्ये कमी जास्त असे मोहरीचे तेल घालावे. आता हा कापूस काडेपेटीच्या मदतीने प्लेट मध्येच जाळा. सफेद केसांची समस्या आजकाल अगदी सामान्य बाब आहे. या दिव्यावर पळी अशा पद्धतीने ठेवा कि वात विझणार नाही आणि पूर्ण काजळी पळीच्या आतील गोलाकार भागात साचेल. छोटी वात घेतल्यास काजळी तयार व्हायला वेळ लागेल.
केस काळे करण्यासाठी आवश्यक तेवढी काजळी जमल्यास दिवा विझवा. थोडं थांबून गरम पळी नॉर्मल होऊन द्या. दुसऱ्या चमचाच्या मदतीने पळीवरील काजळी खरडून एका प्लेटमध्ये काढून घ्या. पळी जळत नाही फक्त त्यावर जमलेली काजळी आपल्याला उपयोगी पडणार आहे या उपायामध्ये. ही पावडर चमच्यानेच थोडी एकदम बारीक करून घ्या. प्रत्येक वेळी अशा प्रकारे काजळी बनवायला आपल्याकडे वेळ नसतो.
त्यामुळे एकदम मस्त जास्त काजळी बनवून तुम्ही एखाद्या डब्बी मध्ये साठवू शकता. तुमचे कामं कमी होईल. आता तुमचे सर्व केस होतील काळे यासाठी पाहुयात हा उपाय कसा करायचा..? प्रकार १. एका वाटीत तुमच्या केसांच्या प्रमाणानुसार कमी-जास्त ही पावडर घ्यावी. यामध्ये एक चमचा कोरफडचा गर घाला. कोरफडी मुळे केसांना होणारे फायदे तर तुम्ही जाणताच ते वेगळे सांगायला नको.
प्रकार २. एका वाटीमध्ये ही पावडर घेऊन त्यामध्ये एक चमचा मोहरी चे तेल घाला. प्रकार ३. एका वाटीमध्ये ही पावडर घेऊन यामध्ये एक चमचा आवळ्याचे तेल घाला. आपल्या केसांच्या नुसार तुम्ही तेलाचे आणि पावडर याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तीनही गोष्टी वाटीत व्यवस्थित मिक्स करून घ्या. आम्ही तुम्हाला तीनही वेगळे प्रकार सांगितले आहेत. तुम्हाला आवडेल तो प्रकार निवडा.
हा नैसर्गिक रंग असल्याने तुम्हाला कोणतीही हानी होणार नाही. कापसाच्या मदतीने किंवा ब्रशने तुम्ही वरील पैकी कोणताही एक प्रकार निवडून तुमच्या केसात हा नैसर्गिक घरगुती बनवलेला कलप लावा. आवळ्याचे तेल तर केसांत चिटकत देखील नाही. खूप जास्त प्रमाणात लावायची गरज नाही. अगदी हलकेच रंग पुरेसा आहे तुमचे केस नैसर्गिक प्रकारे काळेभोर करण्यासाठी.
तीनही प्रकारात काहीही फरक नाही. तुमचे कितीही सफेद केस असुद्या आता तुम्हाला काळजी करायची काहीही गरज नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही इतके सुंदर होतील केस! केसातील हा कलप वळल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. हा रंग सहज जात नाही. यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्स नाही. तीन ते चार वेळेस हा प्रयोग केल्याने तुमचे केस पुन्हा एकदा नैसर्गिक प्रकारे काळे होतील.
असा हा रंग लावल्यानंतर एकच काळजी घ्या ती म्हणजे केस लागलीच शाम्पूने केस धुवू नका साध्या पाण्यानेच केस धुवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.