जेवणात ओलं खोबर वापरावे की सुके? ओल्या खोबऱ्याचे शरीरावर काय होतात परिणाम.!

आरोग्य

मित्रांनो नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटले जाते ते काही खोटं नाही. या झाडाच्या प्रत्येक घटकाचा वापर केला जातो. आपल्याकडे नारळाचा वापर भारतीय संस्कृतीमध्ये पूजेसाठी महत्वाचा मानला जातो. नारळाला श्रीफळाच्या नावानेही ओळखले जाते. वेगवेगळ्या पदार्थांची चव सुधारण्यासाठीही ओल्या खोबऱ्याचा वापर केला जातो. नारळामध्ये व्हिटॅमिन, पोटॅशिअम, फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात जे आपल्या शरीराला आवश्यक असतात.

असं म्हणतात ओलं खोबरं खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढत जाते.तसेच पोटही नियमित साफ होतं. उन्हाळ्यात खोबरं आवर्जून खायला हवं. यानेही तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. उष्णता भडकत नाही. अनेक जण पोटातील उष्णता शमवण्यासाठी नारळपाणी शहाळे पितात.. आता..चला जाणून घेऊया ओलं खोबरं खाण्याचे फायदे सविस्तरपणे.

१) मेंदू होतो तल्लख व स्मरणशक्ति वाढते.
खोबरे खाल्याने स्मरणशक्ति वाढते, यासाठि बदाम मिश्रित करून रोज खावे. २) नियमित पोट साफ राहतः जर तुमच पोट खराब झाले असेल तर ओल्या खोबर्याचा मोठा तुकडा खाऊन झोपा, सकाळी तुमच पोट साफ होईल. कारण यात फायबर अधिक प्रमाणात असते. ३) नाकातून रक्त येणे बंद होते. ओल्या खोबर्याचा तुकडा खाल्यास नाकातून येणारे रक्त त्वरित थांबते. अति उष्णतेने हा त्रास होतो.

हे वाचा:   उकळत्या पिठात गरम पाणी टाकून बनवा खारी शंकरपाळी.! चहाबरोबर खूप चांगले लागतात हे शंकरपाळी.! एकदा नक्की ट्राय करा.!

४) सतत येणारी उलटि व मळमळ बंद होतेः
ऊन्हाळ्यात जास्त त्रास होतो. वाढत तपमान, व घाम यामूळे सुद्धा असा त्रास होतो. अश्या वेळी एक मोठा खोबर्याचा तुकडा सेवन करावा. ५) रोगप्रतिकार शक्ति वाढतेः खोबर्याच्या सेवनाने इम्यून सिस्टम मजबूत होते. यात अँटिबँक्टेरिअल, अँटि फंगल व अँटि व्हायरल गुणधर्म असतात. त्यामूळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

६) नारळाचे पाणी गर्भधारणेनंतर रोज घेतल्यास बाळाची कांति सतेज, होते रंग उजळतो असे जुने अनुभवी लोकं सांगतात. ७) पोटातिल जंतः रोज ओल्या खोबर्याचा एक तुकडा खाल्यास जंत मरून पडतात. पोट राहते निरोगी. ८) मुरूमे, तारूण्यपिटिका, पिंपल्स: नारळाच्या पाण्यात काकडिचा रस मिसळून लावल्यास हे त्रास बरे होतात. त्वचा राहते मऊ आणि तरुण.

९) स्मरणशक्तिः नारळाच्या खिसात/ गरात बदाम, अक्रोड व खडिसाखर मिसळून खाल्यास स्मरणशक्ति वाढते. लहान मुलांना हे खुप फायदेशीर ठरते. १०) अनिद्राः रात्री जेवण झाल्यावर नारळाचे पाणी पिल्यास शांत झोप लागते. तुम्हाला जर निद्रानाश असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. ११) ओले खोबरे व गूळ शरिरासाठी चांगला असतो. यामुळे आपल्या शरीरातील लोहाच प्रमाण वाढते. आणि आपल्याला अनेमिया होण्याची संभावना राहत नाही.

हे वाचा:   लिव्हर असे मजबूत केले जाते.! मरेपर्यंत एकदाही लिव्हर चा त्रास झाला तर बोला.! आजपासून हे एकच काम करा.!

१२) मूत्रखडा, युरिन इंन्फेक्शनः रोज नारळाचे पाणी पिल्यास लवकरच मूतखडा विरघळतो. व सर्व प्रकारचे.. मूत्राशयाचे आजार बरे होऊ लागतात. यासाठी नारळ वरदानच होय. १३) नारळाच्या सेवनाने वजन नियंत्रित करता येतं कारण हे थोडे खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक लागत नाही. शिवाय शरीरात आवश्यक घटकांची कमी भरून काढते नारळ.

१४) पौष्टिकताः १०० ग्रॅम नारळाच्या दूधात सुमारे १५४ कॅलरिज असतात, यात फाँस्फरस, व मँग्नेशिअम, असते, लहान मुलांकरता हे एक संपूर्ण आहार आहे. १५) यात चांगले कोलेस्ट्रोल असल्याने हृदयासाठी उत्तम टॉनिक आहे. यामुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल राहते त्यामुळं आपलं हृदय निरोगी.! वरील फायदे बघता नारळ हा पूजेत नव्हे तर घरात आहारात असायलाच पाहीजे. स्वस्थ खा. मस्त रहा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *