आपण आणखी जाड होऊ म्हणून भात खाणे सोडले असेल तर एकदा हे वाचा.! भात खाल्ल्याने खरच वजन वाढते का.? जाणून घ्या शास्त्रीय कारण.!

आरोग्य

अनेकदा आपल्याला एक प्रश्न पडत असतो की भात खावा की नाही खावा.? भात खाल्ल्यानं वजन वाढत का असं जर कोणाला आपण विचारलं तर तो हो म्हणेल कि नाही म्हणेल? तर आज आपण जाणून घेणार आहोत खरंच भात खाल्ल्याने वजन वाढतं का. भात खाल्ल्याने वजन वाढतं असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे अनेकजण एकतर भात कमी खातात किंवा अजिबातच खात नाहीत.

त्यामुळे पोळी आणि इतर पदार्थांचं अधिक सेवन केलं जात. मग मूळ मुद्दा बाजूला राहून इतर गोष्टींच्या सेवनाने वजन वाढायला लागतं. तर आज आम्ही तुम्हाला भात खाल्ल्याने वजन वाढतं का हे सांगणार आहोत. भात खाल्ल्याने वजन वाढत यास कोणताही शास्त्रीय आधार नाही. अनेकदा भात बनवताना किंवा फ्राय करताना जास्त तेल किंवा तूप टाकलं जात. त्यामुळे त्यातल्या कॅलरी चे प्रमाण वाढून लठ्ठपणा येऊ शकतो.

हे वाचा:   डायबिटीज झाला असेल तर, हे पदार्थ शंभर टक्के खायला हवे.! शुगरच्या पेशंटसाठी या गोष्टी आहेत खूप मोठे वरदान.!

तांदळाचे पोषक तत्वे शरीराला मिळावीत या साठी भात योग्यप्रकारे तयार करणं आवश्यक आहे. तो बनवताना योग्य काळजी घेतली तर भाताने वजन न वाढता उलट कमी व्हायला मदत होईल. भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात फायबर्स असल्यामुळे बराच वेळ पर्यंत तुमचे पोट भरलेलं राहतं आणि भूकही लागत नाही. त्यामुळे भात तयार करताना आवडत्या भाज्यांसोबत तो बनवावा.

पांढऱ्या तांदळांपेक्षा लालसर तांदळात फायबर्स आणि कॅलरी कमी असतात. त्यात इतर डाळी टाकून किचडी बनवावी. त्यामुळे आहारात कमी प्रमाणात कॅलरी घेतल्या जातात. तुरीची डाळ किंवा राजम्यासोबत तांदूळ शिजवावा. या पदार्थांमध्ये अधिक प्रथिने असल्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.

जेवताना एक वाटीपेक्षा जास्त भात खाऊ नये. भातातील पाणी काढून टाकल्याने त्यातील न्यूट्रिअन्स निघून जातात आणि असा भात खाल्ल्यानेही वजन नियंत्रणात राहतं. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   दाढ कधी दुखु लागलीच तर झटकन तोंडात टाकायची ही एक गोष्ट.! दाढ दुखी साठी परमनंट इलाज आहे हा.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *