आपल्या शरीराच्या अशा काही भागांवर आपल्याला नको असलेले केस वाढत असतात आणि आपण त्यां केसांना काढण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रीम लावणे, पार्लर ला जाणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रेझर देखील वापरतो. पण त्यामुळे देखील आपल्याला अनेक प्रकारचे त्रास जसे की खाज येणे, लाल चट्टे होणे किंवा पुरळ येणे अशा प्रकारचे त्वचेचे त्रास देखील होतात.
या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज आपण असा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत,ज्यामुळे तुम्हाला नको असलेले केस तुम्ही घर बसल्या काढू शकता. हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला घरातल्या रोजच्या वापरातील गोष्टी लागणार आहेत.हा उपाय केल्याने आपल्या त्वचेला काही हानी देखील होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया या साठी आपल्याला काय सामग्री लागणार आहे.
आजचा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे. या बटाट्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे . नंतर या बटाट्याची साले काढून बारीक किसून घ्यायचे आहेत. बटाटा किसून झाल्यावर गाळणीच्या मदतीने या बटाट्याचा रस काढून घ्यायचा आहे. आता निघालेल्या रसामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे . त्यानंतर बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस या मिश्रणामध्ये एक चमचा मीठ टाकायचे आहे.
या मिश्रणामध्ये एक चमचा व्हिनेगर देखील टाकायचे आहे. आता या सर्व घटकांना एकत्रित पणे मिक्स करून घ्यायचे आहे. कोणत्याही प्रकारच्या टीशू ने किंवा कापसाने या तयार झालेल्या मिश्रणामध्ये बडवून तुमच्या नको असलेल्या केसांच्या त्वचेवर कमीत कमी एक मिनिटे गोलाकार पद्धतीने मसाज करायचे आहे. सर्वप्रथम जेव्हा तुम्ही केस काढायची प्रक्रिया कराल तेव्हा सुरुवातीला तुम्ही हा उपाय करा.
जोपर्यंत हे मिश्रण तुमच्या त्वचेमध्ये जात नाही तोपर्यंत तुम्ही ही क्रिया करा. पाच ते सहा वापरानंतर तुमच्या केसांची वाढ हळूहळू कमी झालेली दिसून येईल. आणि नंतर त्या ठिकाणी केस उगवणे देखील बंद होईल. या केलेल्या उपायांमुळे तुमच्या त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. आपल्या शरीरावरील नको असलेले केस काढण्या साठी आपण करत असलेला दुसरा उपाय म्हणजे आपल्याला एका वाटीमध्ये दोन चमचे तांदुळाचे पीठ घ्यायचे आहे.
या तांदुळाच्या पिठामध्ये आपल्याला एक चमचा टूथपेस्ट टाकायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपण तयार केलेला बटाट्याचा रस दोन ते तीन चमचे टाकायचे आहे. आता या मिश्रणाला एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. जर हे मिश्रण तुम्हाला थोडेसे घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून थोड्या प्रमाणात बटाट्याच्या रसाचा वापर करू शकता. हे मिश्रण एका क्रीम सारखे पातळ झाल्यावर तुमच्या शरीरावरील नको असलेल्या केसांच्या त्वचेवर लावून पाच मिनिटे ठेवून त्यानंतर टिशू च्या मदतीने केस काढून टाकू शकता.
हा उपाय केल्याने तुमची त्वचा काळी पडणार नाही तसेच तुमच्या त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. बटाट्या मध्ये असणारे अँटी अक्सिडेंट प्रॉपर्टी आपल्या त्वचेमध्ये जाऊन हळूहळू केसांना कमजोर करण्याचे काम करते. त्यामुळे केसांची होणारी वाढ हळूहळू कमी होते. त्याच बरोबर बटाटा आपल्या चेहऱ्यावर एक चमक आणि चेहरा टवटवीत ठेवण्यास मदत करतो आणि हा उपाय घरगुती उपयोगातील घटकांनी बनल्यामुळे आपला खर्च देखील वाचतो.
तुम्ही ही क्रीम जेव्हा तुमच्या त्वचेवरचे केस काढून टाकायची असतील तेव्हाच करा. कारण तुम्ही ही क्रीम बनवून ठेवू शकत नाही. या सांगितलेल्या उपायांचा वापर करून झाल्यानंतर तुम्ही त्वचेवर तुमचे रोजचे मोश्चरायझर किंवा बदामाचे तेल देखील लावू शकता. यामुळे त्वचा कोरडी होणार नाही. आणि त्वचा मुलायम राहायला मदत होते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.