कांदा केसासाठी चांगला की वाईट.? तुम्ही केसांना कांद्याचा रस लावता का.? मग एकदा हे नक्की वाचा.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जण आपल्या केसांसाठी कांद्याचा वापर करत असतात . केसांसाठी कांदा अत्यंत फायदेशीर असतो तो पण केसांसाठी कोणत्या प्रकारचा कांदा फायदेशीर असतो हे आपल्यापैकी अनेक जणांना माहीत नसते.अनेकदा असे होते की आपण कांदा वापरत असतो पण त्याचे परिणाम मात्र आपल्या केसांवर जराही दिसत नाहीत. कारण आपण निवडलेला कांदा हा चुकीचा असू शकतो.

म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत नक्की कोणत्या प्रकारचा कांदा आपल्या केसांसाठी उपयोगी आणि गुणकारी असतो. कांद्यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे आपल्या केसांची वाढीस मदत करतात. यामध्ये उपलब्ध असलेले सल्फर हे केसांना जाड आणि चमकदार बनवते. केसांची लांबीही वाढते. कांद्याचा रस हा आपल्या मेंदूतील र’क्ताभिसरण वाढवतो. यासोबतच आपल्या टाळूला मजबूत करते.

त्यामुळे, केस देखील मजबूत होतात आणि त्यांची वाढ ही झपाट्याने होते. केस अकाली पांढरे होणे ही आजकाल एक मोठी समस्या झाली आहे. कांद्याचा रस हा केस अकाली पांढरे होण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लावतो, तसेच केस काळे करतो. कांद्यामध्ये कॅटलस नावाचे एन्झाईम असते, जे केस पांढरे होण्यापासून रोखते आणि आपले केस मूळापासून काळे करते. केस काळे करण्यासाठी कांद्याचा वापर हा हेअर पॅक म्हणून करता येतो.

हे वाचा:   थोडे चालले तरी दम लागतो का.? थोडेसे काम केले तरी दम लागत असेल तर तुम्हाला झाला आहे हा आजार.! या दोन गोष्टी खाल्ल्या तरच बरा होईल हा आजार.!

त्याचबरोबर आजकाल सर्वजण केसांमधील कोंड्याच्या समस्येने त्रासले आहेत. पण केसांमधील कोंड्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी कांदा वरदान आहे. कोंड्याच्या समस्येमुळे आपल्या टाळूवर खाज येण्याची समस्या निर्माण होते. यावर कांद्याचा रस हा फायदेशीर ठरतो. कारण, कांद्याचा रस हा कोंडा निर्माण करणाऱ्या बॅक्टेरिआला ठार मारते. तसेच, कोंड्याच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी तुम्ही कांद्याच्या रसाचा वापर करुन बनवण्यात आलेला हेअर पॅक केसांना लावू शकता.

पण कांदा जो आपल्या केसांसाठी उपयोगी असतो तो वेगळा असतो आता हा ओळखायचा कसा? तर आपल्या जवळ दोन प्रकारचे कांदे असतात एक कांदा जो अत्यंत लाल असतो. तर दुसरा कांदा थोडासा पिवळा असतो म्हणजेच कमी लाल असतो लालसरपणा अगदी कमी असतो. जेव्हा आपण लाल कांदा कापतो तेव्हा थोडेसे डोळ्यातून पाणी येते पण जेव्हा आपण तो पिवळ सर कांदा कापतो तेव्हा आपल्या डोळ्यातून ढसाढसा पाणी वाहायला लागते.

याचे कारण म्हणजे कांद्यामधील सल्फरची मात्रा जेव्हा एखाद्या कांद्यामध्ये सल्फरची मात्रा जास्त असते तेव्हा आपल्या डोळ्यातून जास्त प्रमाणात पाणी येते आणि याच सल्फरची गरज आपल्या केसांना असते. त्यामुळे पिवळसर कांदा आपल्या केसांसाठी चांगला असतो. लाल कांदा जर आपण आपल्या केसांसाठी वापरला तर जेवढी पोषकतत्वे आपल्याला हवी आहेत तेवढी त्यामधून मिळणार नाही कारण जसे मी म्हटले आहे यामध्ये सल्फरची मात्रा कमी असते त्यामुळे आपल्याला थोडाफार पिवळा दिसणारा कांदा वापरायचा आहे.

हे वाचा:   मधुमेह आणि कोथिंबीर; बऱ्याच जणांना माहिती नसेल ही माहिती.!

त्यामुळे आपले केस मजबूत होतात केस गळती थांबते सोबतच केस काळे होत देखील होतात त्यासाठी एका कांद्याचा रस काढून दिवसा एका तासासाठी आपल्या केसांवर लावून हलक्या हाताने मालिश करून घ्यायचे आहे आणि एका तासानंतर केस धुऊन टाकायचे आहेत लाल कांद्याच्या तुलनेत पिवळा कांद्याने आपल्या केसांना कमी वास येतो. आठवड्यातून दोन ते तीन वेळा देखील तुम्ही या कांद्याच्या रसाचा वापर करू शकता.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.