जर आपल्या चेहऱ्यावर नको असलेले केस असतील तर आपल्याला नकोसे होत असते. बहुतेक वेळा आपला चेहरा सुंदर देखील दिसत नाही. नको असलेले केस चेहऱ्यावर दिसून येण्याची समस्या महिन्यांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळते. अनेक महिला अशा आहेत ज्यांच्या अप्पर लिप्स वर आपल्याला केस पाहायला मिळतात. गालावर केस पाहायला मिळतात.
हे नको-असलेले-केस दूर करण्यासाठी बाजारामध्ये उपलब्ध असणारे वेगवेगळे रासायनिक पदार्थ आपण वापरत असतो परंतु या पदार्थांचा वापर केल्याने चेहऱ्यावरील केस कमी होण्याऐवजी अनेकदा दिसून येतात त्याच बरोबर आपल्याला अनेक इन्फेक्शन देखील झालेले दिसून येते. जर तुमच्या बाबतीत देखील या सगळ्या समस्या वारंवार घडून येत असेल आणि तुम्ही सगळे उपाय करुन थकलेले असाल तर अजिबात काळजी करू नका.
आजच्या लेखामध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने काही दिवसांमध्ये तुमच्या चेहऱ्यावर नको असलेले केस पूर्णपणे निघून जाणार आहेत, चला तर मग जाणून घेऊया करण्यासाठी आपल्याला कोणती सामग्री लागणार आहे आणि आजचा उपाय आपल्याला कशा पद्धतीने बनवायचा आहे त्याबद्दल.
चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण पार्लरमध्ये जाऊन ब्लीच वॅक्सिंग किंवा लेझरचा वापर करत असतात. ब्लीज केल्याने आपली त्वचा मऊ होते परंतु अनेकदा आपली त्वचा वरून जळून जाते तसेच अनेक जण थ्रेडिंग करतात. वोक्सिंग करत असताना केस खेचले जातात आणि आपल्या हातापायाच्या किंवा चेहऱ्यावरील ज्या काही नाजूक पेशी असतात.
त्या तूटण्याची शक्यता असते तसेच अनेक जण रेझरचा वापर करतात जर चुकीच्या पद्धतीने रेझर चेहऱ्यावर फिरवला गेला तर र’क्त देखील निघू शकते आणि तुमच्या चेहऱ्यावर कायम स्वरूपी चे निशान राहतील. आपल्या चेहऱ्यावरील नको असलेले केस नैसर्गिक रित्या दूर करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी जो पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे बेसन पीठ.
बेसन पीठ ला चण्याचे पीठ देखील म्हटले जाते. हा पदार्थ आपल्या घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतो. बेसन पीठाचे अनेक फायदे आपल्या शरीरासाठी असतात त्याचबरोबर शरीरावर व त्वचेवर पडलेले काळे डाग दूर करण्यासाठी देखील बेसन पिठाचा वापर केला जातो त्याच बरोबर त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व बेसन पीठ मध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे गव्हाचे पीठ. गव्हाचे पीठ देखील आपल्याला सहज रित्या उपलब्ध होते.आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला कच्चे दूध देखील लागणार आहे. हे तिन्ही पदार्थ एकत्र करून आपल्या चेहर्यावर लावले जातात. लहानपणी अनेकदा पाहिले असेल जर आपल्या घरी लहान बाळ असेल तर आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिक बाळाच्या शरीरावर नको असलेले केस किंवा त्वचा तर काळी झाली असेल तर त्या तिन्ही पदार्थांची पेस्ट करून बाळाच्या अंगाची मालिश करत असतात यामुळे बाळाच्या अंगावर असलेले नको असलेले केस दूर होऊन जातात.
आणि चेहऱ्यामध्ये व त्वचेमध्ये देखील उजळपणा आलेला आपल्याला पाहायला मिळतो. असाच उपाय आपल्याला देखील करायचा आहे. आपल्याला हे तिन्ही पदार्थ एकत्र करून छान पेस्ट बनवायची आहे आणि ही आपल्या चेहऱ्यावर लावायची आहे. चेहऱ्यावर लावल्यानंतर अर्धा ते एक तास ही पेस्ट व्यवस्थित रित्या सुकल्यानंतर आपल्याला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायची आहे परंतु ही पेस्ट सुकल्यानंतर आपल्याला हलका मसाज देखील करायचा आहे.
यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नको असलेले केस हळूहळू निघून जातील. अशा प्रकारे हा उपाय आपल्याला आठवड्यातून दोन वेळा तरी करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे काळे डाग जर झाले असतील वांग पिंपल आले असतील तर यासारख्या समस्या दूर होतील व त्याचबरोबर नको असलेले केस हमखास निघून जातील.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.