अशा लोकांच्या टाचा कधीच उलायच्या थांबत नाही.! जाणून घ्या काय असते टाचा उलण्या मागचे गणित.! आपण का चुका करतो?

आरोग्य

अनेक वेळा आपण बघितले असेल की अनेकांच्या टाचा हया खूपच उललेल्या असतात म्हणजे त्यावर खूप भेगा पडलेल्या असतात. यावर उपाय योजना करूनही अनेक वेळा आपल्याला यावर फरक पडत नाही अशा वेळी नेमके काय करायला हवे? कधी कधी तर यातून रक्त सुद्धा येत असते. अशा वेळी आपण याचा लवकरात लवकर उपचार पूर्ण करून घेणे खूप गरजेचे असते.

भेगा पडण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे धूळ आणि खराब प्रकारे त्वचेची काळजी घेणे. याशिवाय, जर तुमच्या टाचांना वर्षभर भेगा पडत असतील तर त्यामागील कारण व्हिटॅमिनची कमतरता आणि हार्मोनल असंतुलन असू शकते. जेव्हा तुमच्या शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असते, तेव्हा टाच फुटण्याची समस्या कायम राहत असते. याशिवाय चुकीच्या प्रकारची पादत्राणे घालणे किंवा घट्ट किंवा उंच टाचांचे पादत्राणे घातल्याने टाचाला भेगा पडण्याची समस्या निर्माण होते.

हे वाचा:   झोपते वेळी कांदा आपल्या उशी जवळ ठेवून झोपा.! दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिसेल हा जबरदस्त बदल.! असे का केले जाते माहिती आहे का.?

कोरफडीचे जेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. ज्याप्रमाणे एलोवेरा जेल त्वचेचे पोषण करते, त्याचप्रमाणे टाचांच्या भेगा लवकर भरून काढण्यासही मदत करते. जर तुम्ही टाचा फुटण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी पाय पाण्याने चांगले स्वच्छ करा. नंतर त्यावर कोरफडीचे जेल लावा. याव्यतीरिक्त तुम्ही रात्री पातळ मोजे घालून झोपू शकत असाल तर ते खूप लवकर बरे होईल.

एलोवेरा जेल व्यतिरिक्त, पेट्रोलियम जेली देखील टाचांच्या भेगा भरू शकते. यासाठी पेट्रोलियम जेलीचा पातळ थर घोट्यांवर लावावा लागेल. ते लावा आणि रात्रभर राहू द्या, दुसऱ्या दिवशी तुम्हाला फरक जाणवेल. पिकलेल्या केळ्यामुळे टाचांना भेगा पडण्याच्या समस्येपासून सुटका मिळते. यासाठी एक पिकलेले केळ घेऊन ते मॅश करा आणि नंतर फाटलेल्या घोट्यांवर लावा. आता केळी 15 मिनिटे सुकू द्या आणि नंतर पाण्याने धुवा.

हे वाचा:   आता बनवा अंडा भेंडी.! भेंडीची भाजी जर अशी बनवली तर, लिहून घ्या दोन पोळ्या जास्त खाल.!

त्यानंतर पायांना मॉइश्चरायझर लावा. दूध आणि मध हे त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते. अशा स्थितीत टाचांना भेगा पडण्यासाठी हा रामबाण उपायही कमी नाही. यासाठी दूध आणि मध मिसळून बारीक पेस्ट तयार करा आणि भेगा पडलेल्या टाचांवर लावा. थोडा वेळ कोरडे राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा. दूध आणि मधापासून पायांना भरपूर पोषण मिळते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *