पोट आणि गॅस साठी उत्तम माहिती.! पोटात जमा झालेली सगळी घाण झटकन पडेल बाहेर.! कधीच दुखणार नाही पोट.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पोट दुखी वरचे उपाय. जर तुमचे पोट जेवण झाल्यानंतर जास्त भरलेले वाटत असेल , पोटामध्ये जळण होत असेल, दिवसभर विचित्र असे ढेकर येणे, गॅसचा त्रास असेल, पोटामध्ये दुखणे किंवा गॅसचा त्रास हा डोक्यापर्यंत पोचल्यामुळे सतत डोकं दुखणे तर या सर्व समस्यांवर आपणच असा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत की त्या उपायामुळे तुम्हाला या कोणत्याच समस्या उद्भवणार नाही.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त महाग गोष्टींची गरज लागणार नाही आणि हा उपाय करण्यासाठी जास्त वेळ देखील लागणार नाही पण हा उपाय एवढा गुणकारी आहे की तीन दिवसातच तुम्हाला फरक जाणून येईल. गरमी मध्ये हा उपाय खूप फायदेशीर आहे कारण हा उपाय केल्याने शरीरातील गरमी ही पूर्णपणे कमी होऊन जाते आणि त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.

हा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम धने (coriander seeds) लागणार आहेत. धने म्हणजे काय हे सर्वांना माहित असेलच. प्रत्येक दुकानात धने उपलब्ध असतात. धने चा उपयोग स्वयंपाक घरात खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. धने आपल्या शरीराला खूप फायदेमंद असतात. धन्यामध्ये असे गुणधर्म आहेत, जे तुमची पचनसंस्था निरोगी बनवते. तसेच पचनाशी संबंधित अनेक आजार बरे करण्यास मदत करते.

हे वाचा:   अशा लोकांनी लसूण व पांढरा कांदा नक्की खा; यावेळी कांदा खाल्ल्याने मिळतील जबरदस्त फायदे.!

धन्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ए भरपूर प्रमाणात असते. हे केस मजबूत करण्यास आणि वाढण्यास मदत करते. धन्यामुळे र’क्ता’तील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. अशा या छोट्या धन्याच्या दाण्यांमध्ये विविध गुणधर्म आढळतात. त्यामुळे तुमच्या आहारात याचा समावेश नक्कीच करावा. आता आपण पाहूया धन्याचा उपाय कसा करावा. हा उपाय करण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जीरा लागणार आहे.

जीरा चा वापर पण स्वयंपाक घरात खूप मोठ्या प्रमाणात होतो. जीरा हे सर्वांना माहित असेलच प्रत्येक दुकानांमध्ये जिरे उपलब्ध असतात. जीराचा वापर आपल्या पोटासाठी खूप फायदेमंद असतो. पोटातील जेवण पचण्यासाठी पोटातली चरबी कमी करण्यासाठी याचा वापर खूप होतो. जिऱ्यामध्ये अँटी ऑक्सीडंटची मात्रा भरपूर असते.

तसंच यामध्ये फायबर, कॉपर, पॉटेशिअम, मँगनीज, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम यासारखी मिनरल्सही आढळतात. जी शरीरातील विभिन्न भागांसाठी खूपच फायदेशीर असतात. याशिवाय जिऱ्यामध्ये अनेक व्हिटॅमीन्स असतात. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारामध्ये जिरा चा वापर देखील केला पाहिजे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला बडीशेपचे, वेलची आणि पुदिना ह्यांची देखील गरज लागणार आहे.

बडीशेप ही प्रत्येक दुकानात उपलब्ध असते. बडीशेप ही आपल्या पचन क्रिया साठी खूप चांगले असते. तसेच बडीशेप चावून खाल्ल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. आयुर्वेदात वेलची ही उष्ण पदार्थ मानली जाते, जी शरीराला उबदारपणा देते. जर तुम्हाला सतत ॲसिडीटीचा त्रास होत असेल तर वेलची उपायकारक आहे. पुदिना हे पोट आणि इतर अपचनाच्या समस्यांपासून सुटका करुन घेण्यात मदत करु शकते.

हे वाचा:   ज्यांचे काही केले तरी गुडघेदुखी थांबेना अशा लोकांसाठी आहे गुड न्यूज.! या एका फुलाने गुडघेदुखीची सगळी चिंता मिटवली.!

अपचनाच्या दरम्यान, अन्न हे शरिरातील पचन क्षमतेच्या उर्वरित भागांवर जाण्यापूर्वी पोटात बराच काळ राहते आणि पुदिना या प्रक्रियेला गती देण्यास मदत करते. आता आपण पाहूया हा उपाय कसा करावा.एका मोठ्या पाण्याचा ग्लासामध्ये एक चमचा धने, अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा बडीशोप, दोन वेलची आणि चार ते पाच पाकळ्या पुदिना च्या घ्यायचा आहेत आणि या सर्व गोष्टी पाण्यामध्ये एकत्र करून घ्यायचे आहे.

पाण्यामध्ये एकत्र करून झाल्यावर हे मिश्रण पूर्ण रात्रभर तसेच ठेवून द्यायचे आहे. जेव्हा तुम्हाला हे पाणी प्यायचे असेल तेव्हा हे पाणी गाळून त्या पाण्याचे सेवन करायचे आहे. ह्या पाण्याचे तीन दिवस तुम्ही सेवन करा तुम्हाला फरक जाणून येईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *