काहीतरी नवीन पदार्थ बनवा.! साहित्य फक्त एक कांदा आणि वाटीभर बेसन, असा बनवा हा पदार्थ खानारा खातच राहील.!

आरोग्य

आता पावसाचे दिवस येणार आहेत आणि पावसामध्ये भजी खायला कोणाला आवडत नाही. त्याच प्रमाणे आज आपण भजी बनवायचा एक वेगळा प्रकार जाणून घेणार आहोत. हे आपल्यापैकी अनेक जणांनी आजपर्यंत बघितला देखील नसेल. हा प्रकार बनविण्यासाठी रोजच्या वापरातील काही गोष्टी म्हणजेच रोज स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या गोष्टी लागणार आहेत.

चला तर मग जाणून घेऊया या प्रकारची भजी बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणते घरगुती सामग्री लागणार आहे आणि ही भाजी बनविण्याची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे. कांदा भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक ते दोन कांदे चिरून घ्यायचे आहेत. हे कांदे उभे चिरून कसे आहेत जसे आपण कांदाभजीसाठी करणार आहोत असे. त्यानंतर एका वेगळ्या वाटीमध्ये आपल्याला चार ते पाच चमचे बेसन पीठ घ्यायचे आहे.

त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला बेसन जास्त पातळ करायचे नाही. हे पीठ आपल्याला मिडीयम ठेवायचे आहे. एकदा बेसन मध्ये पाणी टाकून मिडीयम पेस्ट करून झाल्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे, आणि थोडे मीठ टाकून मिक्स करून घ्यायचे आहे बेसन मिक्स करून झाल्यानंतर थोड्यावेळासाठी ते बाजूला ठेवायचे आहे.

हे वाचा:   मरे'पर्यंत कंबरदुखी होणार नाही, गुडघेदुखी साठी याहून सोपा उपाय नाही, लाखो रुपये वाचवू शकतो हा उपाय.!

त्यानंतर कापून घेतलेल्या कांद्यामध्ये लाल मसाला, गरम मसाला, हळद, धना पावडर आणि कसुरी मेथी टाकून कांद्यामध्ये मिक्स करून कांदा बाजूला झाकून ठेवायचा आहे. आणि आता गॅसवर एक पात्र ठेवून म्हणजेच कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचे आहे. सर्वप्रथम या तेलामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा कस्तुरी मेथी टाकायची सोबतच एक बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे.

तो थोडा भाजून घ्यायचा आहे कांदा थोडा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एका टोमॅटोची बारीक करून घेतलेली पेस्ट टाकायचे आहे आणि थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवायचे आहे. कांद्यामध्ये टोमॅटो शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा आला लसून पेस्ट टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत थोडेसे लाल तिखट, तिखट चवीनुसार टाकू शकता.

त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आहे. गरम मसाला एक चमचा, हळद एक चमचा, हे टाकून झाल्यानंतर हे सर्व मिश्रण पहिले शिजू द्यायचे आहे. मिश्रण थोडेसे शिजल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे दही टाकायचे आहे आणि परत एकदा चार ते पाच मिनिटांसाठी मंद आचेवर हे शिजू द्यायचे आहे. चार ते पाच मिनिटांनंतर यामध्ये दीड पेला पाणी टाकून परत एकदा तीन ते चार मिनिटांसाठी शिजण्यासाठी ठेवायचे आहे.

हे वाचा:   हातापायाची घाण कितीही माती असली तरी झटकन निघून जाईल.! हात-पाय गोरेपान करण्यासाठी यासारखा सोपा उपाय नसेल.!

आता झोप पर्यंत हे मिश्रण शिजत आहे तोपर्यंत आपण भजी साठी तयार केलेले बेसन कांदा चिरून घेतलेल्या भांड्यामध्ये म्हणजेच कांद्यामध्ये टाकायचे आहे आणि व्यवस्थित रित्या कांदा आणि बेसन मिक्स करून घ्यायचे आहे. कांदा आणि बेसन व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याचे छोटे-छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता दुसरीकडे गॅसवर ठेवलेल्या मिश्रणाला उकळी आल्यानंतर कांद्याचे आणि बेसनाचे बनवून घेतलेले छोटे छोटे गोळे त्या मध्ये टाकायचे आहेत.

आता हे मिश्रण पाच मिनिटे शिजू द्यायचे आहे. हे मिश्रण शिजण्यासाठी आपल्याला त्यावर झाकण ठेवायचे आहे. पाच मिनिटानंतर शिजून झाल्यानंतर त्यावर गरम मसाला टाकायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील टाकायचे आहे. हे सर्व करून झाल्यावर आपली भजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता या भजीचे सेवन तुम्ही आनंदात करू शकता.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *