गॅसची शेगडी आता एकदम नवी करून टाका.! ही सोपी आणि अनोखी पद्धत वापरली तर दोन मिनिटात चमकू लागेल शेगडी.!

आरोग्य

आपल्या घरातील शेगडी वरच्या वर खराब होत असते कारण त्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे जेवण दररोज बनवत असतो आणि बनवलेले जेवण कधीकधी ओतू जाते किंवा त्यामधून धूर निघणारा पदार्थ,एक तेलकट वाफ वगैरे यामुळे आपली शेगडी खराब होते अश्यावेळी पाण्याचा वापर करतो त्यामुळे देखील आपले शेगडी खराब होते आणि ही शेगडी खराब झाल्यानंतर आपल्याला ही साफ कशी करायची हे माहीत नसते.

अनेकदा आपण फक्त शेगडी पुसून घेत असतो पण आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल की आपण शेगडी नीट धुवू देखील शकतो. शेगडी धुण्याचा देखील एक वेगळा प्रकार आहे तेच आज आपण जाणून येणार की शेगडी कशा प्रकारे साफ केली जाते. सर्वप्रथम आपल्याला शेगडी साफ करण्‍यापूर्वी घ्यायची काळजी म्हणजेच त्याचे बर्नर काढून घ्यायचे आहे. करण त्यामध्ये पाणी गेले पुढे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो.

बर्नर आपल्याला काढून घ्यायचा आहेत. आणि एका वाटीमध्ये एक कप कोमट पाणी घ्यायचे आहे आणि या पाण्यामध्ये एक चमचा डिटर्जंट म्हणजे कपडे धुण्याची पावडर आणि एक चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे तयार करून घेतलेले मिश्रण आपल्याला त्याच वर ज्या ज्या ठिकाणी काळे डाग असतील किंवा कोणत्याही प्रकारची साथर सासरा असेल तिथे हे मिश्रण आपल्याला टाकायचे आहे.

हे वाचा:   ताकदीचा खजाना आहे हे पदार्थ, मांसाहार पेक्षा दहापट ऊर्जा असते या पदार्थात, फक्त अशाप्रकारे सेवन करायला हवे.!

मिश्रण व्यवस्थित रित्या शेगडीवर टाकल्यानंतर आपल्याला अर्धा तास वाट पाहायची आहे म्हणजेच अर्धा तास ती शेगडी तशीच ठेवायची आहे जेणेकरून आपण त्यावर टाकलेले पाणी आणि त्यामध्ये वापरले गेलेले घटक हे शेगडीवर गेल्यानंतर त्या वरील काळे डाग जमा झालेला थर काढून टाकण्यास मदत करते म्हणून अर्धा तास आपल्याला शेगडी अशीच ठेवायचे आहे.

अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला परत एका वाटीमध्ये एक पेला कोमट पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे डिटर्जंट टाकायचे आहे. जर तुम्हाला इथे डिटर्जंटचा वापर करायचा नसेल आणि भांड्यांच्या साबणाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तो देखील करू शकता तुम्हाला हव्या त्या गोष्टीचा वापर तुम्ही करू शकता त्याच्या मदतीने आपल्याला का थाने हळूहळू शेगडी घासून घ्यायची आहे म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी डाग आलेले असेल त्या ठिकाणी आपल्याला घासून घ्यायचे आहे.

पण घासताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला अगदी जोर देऊन घासायचे नाही आहे कारण त्यामुळे शेगडीला स्क्रॅच येऊ शकतात म्हणजेच ओरखडे येऊ शकतात त्यामुळे हळुवारपणे घासून घ्यायचे आहे तर जसे तुम्ही घासायला सुरुवात कराल वर जमा झालेला तर आणि डाग आपोआप निघायला सुरुवात होते. आपल्याला जास्त मेहनत करायची गरज भासणार नाही. त्याला व्यवस्थितरीत्या शेगडी वरील काढून घासून घ्यायचे आहे आणि नंतर पाण्याने धुवायची आहे.

हे वाचा:   जांभूळ खाल्ल्यानंतर या तीन वस्तू तोंडाला सुद्धा लावू नका, येऊ शकते भयंकर अशा आजारांचे संकट.!

सोबतच शेगडी ची बटन देखील आपण काढून त्या खाली जमा झालेला थर देखील आपण घासून काढू शकतो. शेगडीची बटणे ही आपण काढू शकतो आणि नंतर लावू देखील शकतो. त्यामुळे साफ करायला आपल्याला फारशी मेहनत देखील लागणार नाही नाही आणि आपली शेगडी नवीन असल्यासारखे चमकायला लागेल. त्याच बरोबर शेगडी स्वच्छ धुऊन झाल्यानंतर आपल्याला शेगडी पुसून घ्यायची आहे कारण त्यावर दमटपणा राहिल्यास म्हणजेच जर पाण्याचे थेंब राहिले तर शेगडीला गंज येऊ शकते.

आपण अनेकदा पाहिले असेल की शेगडी ला गंज येते का कारण आपण शेगडीला घेतल्यानंतर शेगडीला पुसत नाही त्यामुळे सतत शेगडीला पुसत राहणे देखील गरजेचे आहे. म्हणून शेगडी धूवून झाल्यानंतर पुसुन घ्यायची आहे. एवढे करून झाल्यावर शेगडी पूर्वीसारखी स्वच्छ आणि चकचकित दिसायला लागेल. आणि अशाप्रकारे आपण घर बसल्या कोणत्याही महागड्या गोष्टीचा वापर न करता शेगडी साफ करू शकतो. त्यासाठी आपल्याला जास्त खर्च करण्याची देखील गरज पडणार नाही.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.