खाजून खाजून थकवा आला असेल तर खाज खरुज ला असे घालवता येईल.! लसणाची एक पाकळी खूप कामी येईल.!

आरोग्य

मित्रांनो, आज आपण अशी गोष्ट पाहणार आहोत की, ज्यामुळे दिवसात एकदाच ते लावल्याने वर्षांनुवर्षें असलेली जुनी नायटा, गजकर्ण, खाज खरुज चुटकीसरशी गायब होईल. चर्मरोग /फंगल इन्फेक्शन वाढत जाते.तेव्हा त्याला कंट्रोल करणे अवघड जाते. वेळेच्या निघून जायच्या आधीच हा उपाय करून तुम्ही तो नियंत्रणात ठेवू शकता.

खूप सारे पैसे वेळ खर्च करून आपण औषध क्रीम्स आणतो आणि तेवढ्यापुरता इलाज होतो देखील, परंतु हा रोग पुन्हा पुन्हा होत राहतो. घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तू पासून बनवलेला हा रामबाण उपाय कमी खर्चिक असून अत्यन्त परिणामकारक आहे. काही दिवस याचा वापर करून तुम्ही हे फंगल इन्फेक्शन कायमचे घालवू शकता.

मित्रांनो, हा उपाय तर तुम्ही नक्की कराच परंतु, सगळे रोग होण्याचे मुख्य कारण आहे घाम. त्वचेचे योग्य ती काळजी न घेणे. तेव्हा सोबतच तुमच्या वैयक्तिक हायजीनची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. लसूण: अँटी बॅक्टेरियल anti-inflammatory गुणधर्म असलेला लसुण रोजच्या जेवणाची लज्जत वाढवतोच पण आपल्या आजच्या उपायांमध्ये लसूण हा महत्त्वाचा घटक आहे. कितीतरी रोगांना मुळापासून उखडून टाकतो हा लसूण..! तीन ते चार मध्यम आकाराच्या सोललेल्या लसूण पाकळ्या घ्या.

हे वाचा:   महिलांसाठी खुशखबर.! केस लांबसडक बनवायचे असतील तर हे नक्की वाचा.! उंची पेक्षाही दुप्पट होतील केस.!

गायीचे साजूक तूप: दररोजच्या जेवनातील एक चमचा गायीचे तूप तब्येतीसाठी तर उत्तम आहेच परंतु आयुर्वेदात गाईच्या तुपाला अत्यंत महत्त्व आहे. कांती चमकदार होते. सांधेदुखी गुडघेदुखी वर उत्तम वंगन आहे गायीचे शुद्ध तूप. तर आपल्या आजच्या उपायासाठी एक चमचा गायीचे साजूक तूप घ्यावे. लसूण पाकळ्याचे दोन तुकडे करून तीस मिनिटांसाठी गाईच्या तुपात भिजवावे.

आता ते तूप मंद आचेवर गरम करावे. ज्यामुळे लसणाचे सारे पोषक तत्त्व तुपाबरोबर मिक्स होतील. हे मिश्रण थोडेसे कोमट झाल्यावर खाण्याचा चुना अगदी चिमूटभर घ्या. शरीराच्या संबंधित भागावर जिथे खाज, डाग इत्यादी आहे तिथे तूप लसूण चे मिश्रण लावावे. हलक्या हातानी मसाज करावे. त्यांनतर चिमूटभर चुना त्यावर भूरभुरावा.

हे वाचा:   खोबरेल तेलात टाकून केसांना लावा, केस दुसऱ्या दिवशी एक इंचाने वाढेल.! घनदाट केसांसाठी करा हा उपाय.!

१-२ तास किंवा पूर्ण रात्र सुद्धा तुम्ही असच ठेवू शकता. नंतर गरम पाण्याने ती जागा स्वच्छ पुसून घ्या. त्याच दिवशी पासून फरक दिसण्यास सुरुवात होईल. नियमित हा उपाय केल्याने हळूहळू मुळापासून तुमची या प्रकारची चिवट समस्या दूर होईल. हा उपाय १००% खात्रीशीर आहे. टीप : चुना जास्त झाल्यास शरीराच्या त्या भागाची आग होईल. म्हणून चुन्याचे प्रमाण काळजीपूर्वक घ्यावे. खूप घाम येत असल्यास स्वच्छता राखा. तुमची काळजी घ्या.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.