अशक्तपणा, थकवा, शरीरामध्ये वारंवार वेदना जाणवणे, चालताना -, बसताना हाडांमधून आवाज येणे, कोणतेही काम न करता शरीर जर तुमचे थकत असेल तर अशावेळी दुर्लक्ष करता कामा नये. शरीराचे योग्य काळजी घेणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे परंतु आपल्यापैकी अनेक जण धावपळीचे जीवनात शरीराकडे फारसे लक्ष देत नाहीत.आपले शरीर हे छोट्यामोठ्या तक्रारी करू लागते.
या तक्रारी कडे आपण वेळीच लक्ष दिले तर भविष्यात होणाऱ्या अनेक गंभीर आजारांना आपण निमंत्रण देत असतो. आपल्या शरीरात निर्माण झालेल्या या सगळ्या समस्या अनेकदा शरीरामध्ये असलेली पोषक तत्वांची कमतरता, कॅल्शियमचा अभाव यामुळे आपल्या शरीरात अनेक समस्या उद्भवत असतात. आपल्या शरीरातील सगळ्या वेदना दूर करण्यासाठी आपण तिळाचा वापर करणार आहोत.
तीळ हे असे एकमेव पदार्थ आहे, ज्या पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. तीळ आपण सेवन केल्याने शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण वाढते. जर आपण एक चमचा दिवसभरातून सेवन केला तर आपल्याला शंभर मिलिग्रॅम कॅल्शिअम प्राप्त होते. आपल्यापैकी अनेक जण तिळाचे लाडू खा. हिवाळ्याच्या दिवसात तीळ गुळ आपण आवर्जून सेवन करत असतो परंतु हिवाळ्याच्या दिवसात शरीरामध्ये उष्णतेची गरज असते.
म्हणून आपण तिळगुळ तिळगुळाचे लाडू सेवन करत असतो परंतु हल्ली उन्हाळा चालू आहे. भरपूर प्रमाणामध्ये बाहेर उष्णता पसरलेली आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत चाललेले आहे, अशावेळी तिळाचे सेवन कसे करायचे? हा प्रश्न देखील आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण होतो, अशावेळी आपल्यापैकी अनेक जण तिळाला स्पर्श देखील करत नाही परंतु हा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये देखील निर्माण झाला असेल तर चिंता करू नका.
आम्ही तुमच्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात तीळ सेवन करण्याचे वेगवेगळे मार्ग देखील सांगणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसात तीळ सेवन जर आपल्याला करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला तीळ रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत आणि सकाळी उठल्यावर चाऊन खायचे आहेत, तीळ मध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असते. जर आपण तीळ पाण्यामध्ये भिजवून ठेवली तर त्यामध्ये असणारी उष्णता कमी होते आणि आपल्या शरीराला गारवा प्राप्त होतो.
परिणामी शरीरामध्ये कमी असलेले कॅल्शिअम देखील मिळते. जर तुम्हाला तीळ चावून खाण्याचा जर कंटाळा आला असेल तर अशावेळी तुम्ही मिक्सर मध्ये पावडर देखील बनवू शकता परंतु ही पावडर आपल्याला कच्च्या तिळाची बनवायची नाही. तीळ ही आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या साहाय्याने आपल्याला पावडर बनवायची आहे. ही पावडर तुम्ही दुधा सोबत देखील दिवसभरातून एकदा सेवन करू शकता.
दूध देखील आपल्या शरीरासाठी उत्तम रसायन मानले गेलेले आहे. दुधामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच अशा वेळी जर तुम्हाला थकवा, कॅल्शियमची कमतरता जाणवत असेल तर एक ग्लासभर दुधामध्ये एक चमचा मिरची पावडर मिक्स करून अवश्य सेवन करा. बाजारामध्ये तिळाचं तेल देखील उपलब्ध असते.
तिळाच्या तेलाचा मदतीने आपण हाता पायाची मालिश केली किंवा गुडघ्याची मालिश केली तर या तेलाच्या मदतीने तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होईल व त्याचबरोबर हाडांमधील संपलेले वंगण देखील पुन्हा निर्माण होऊ लागेल तसेच शरीरातील कॅल्शिअम देखील वाढेल म्हणून तिळाचा उपयोग आपल्या शरीरासाठी अवश्य करा.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.