हॉटेल मध्ये उगाचच पैसे वाया घालवू नका, परिवार सोबत घरीच बनवून खा असा पदार्थ, हॉटेल पेक्षा पण जबरदस्त.!

आरोग्य

दररोज सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या घरामध्ये सर्वांनाच नाष्टा लागतो आणि नाश्त्याच्या वेळी आपल्याला भूक लागली की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अन हेल्दी पदार्थ खात असतो त्यामुळे शरीराला बऱ्याच प्रमाणात अनेकदा हानी होते म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत घर बसल्या पौष्टिक पालक पासून नाश्ता बनवायचा प्रकार त्यासाठी आपल्याला कोणकोणते सामान लागणार आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊया आपल्याला हा पदार्थ कसा बनवायचा आहे त्याबद्दल…हा नाश्ता पालक पासून बनवला जाणार असल्यामुळे सर्वप्रथम आपल्याला पालक स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत त्यानंतर पालक मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पेस्ट तयार करताना थोडाफार पाण्याचा वापर तुम्ही करू शकता.जर जास्त पाण्याचा वापर केला तर त्यामधील चव कमी होईल.

एकदा का पालकची पेस्ट करून तयार झाली की त्यानंतर ती गाळनीच्या सहाय्याने पालकचा ज्यूस काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचा गव्हाचे पीठ व एक चमचा तांदळाचे पीठ टाकून हे मिश्रण मिक्स करायचे आहे. मिश्रण मिक्स करून झाल्यावर आपल्याला हे मिश्रण काही वेळ बाजूला काढून ठेवायचे आहे. आता आपण पालक रोल बनवणार आहोत त्यामुळे हे रोल आपल्याला आत मधल्या स्टफिंग साठी भाज्यांची गरज लागणार आहे.

चला तर मग जाणून घेऊया ही भाजी कशी बनवायची. सर्वप्रथम एका छोट्या पात्रामध्ये तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही टोप किंवा कढईमध्ये एक चमचा बटर टाकायचा आहे किंवा त्या ठिकाणी तुम्ही तुपाचा वापर करू शकता. हे तूप थोडेसे गरम झाल्यावर त्यामध्ये एक ते दोन चमचे जिरे टाकायचे आहे त्यानंतर यामध्ये एक बारीक कापून घेतलेली मिरची टाकून हे मिश्रण व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   आता यापुढे एसिडिटी कायमची आयुष्यातून निघून जाईल.! कोणतीच गोळी नाही ना औषध.! घरगुती जुगाड.!

जर तुम्हाला आवश्यकता भासत असेल तर तुम्ही कढीपत्त्याचा देखील वापर करू शकता. आता हे मिश्रण व्यवस्थित रित्या गरम करून किंवा फ्राय करून झाले असेल तर त्यानंतर यामध्ये बारीक कापून घेतलेला एक टोमॅटो बारीक कापून घेतलेले एक शिमला मिरची आणि एक बारीक कापून घेतलेला कांदा आणि एक वाटी उकळवून घेतलेले स्वीट कॉर्न टाकायचे आहेत. आता या सर्व गोष्टी एकत्रितपणे फ्राय करून घ्यायच्या आहेत.

या गोष्टी फ्राय करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की, पूर्णपणे या गोष्टी भाजून न घेता फक्त पन्नास ते साठ टक्के हे मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर थोड्या वेळासाठी आपल्याला हे मिश्रण थंड होऊ द्यायचे आहे. तोपर्यंत आपल्याला चीज चा एक तुकडा बाहेर कापून घ्यायचा आहे. मिश्रण थंड झाल्यावर एका दुसऱ्या पात्रामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे.

त्याबरोबरच आपण कापून घेतलेले चीज देखील टाकायचे आहे. या मिश्रणामध्ये आपल्याला कोणत्याही मसाल्यांचा वापर करायचा नाही आहे. जर तुम्हाला मसाला हवाच असेल तर मॅगी मॅजिक मसाला तुम्ही टाकू शकता. त्यानंतर एक वाटी सॉस चा वापर देखील तुम्हाला करायचा आहे आणि हिरव्या चटणीच्या सॉस देखील आपण वापर करू शकतो. आता हे मिश्रण एकत्रितपणे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आहे. आत मधील स्टफिंग तयार करून झाल्यावर आपल्याला बाहेर कव्हर करण्यासाठी पालकच्या ज्यूस पासून एक पोळी तयार करून घ्यायची आहे.

त्यासाठी आपल्याला ताटाच्या आकाराची असलेली चाळण / गाळण घेऊन त्यावर एक प्लास्टिक बांधून घ्यायचे आहे, जे आपण सँडविच किंवा इतर गोष्टी बंद ठेवण्यासाठी करतो. हे प्लास्टिक त्यावर लावून झाल्यावर मध्ये मध्ये आपल्याला पाच ते सहा होल करून घ्यायचे आहेत आणि आणि गॅस वर एका कढईमध्ये आपल्याला पाणी उकळण्यासाठी ठेवायचे आहे.एकदा का पाण्यामध्ये वाफ यायला सुरुवात झाली की त्यावर ही चाळण ठेवून आपण तयार करून घेतलेले मिश्रण टाकून त्याच्या बारीक अशा पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत.

हे वाचा:   मधुमेह असणाऱ्या लोकांनी भात खावा की नाही? जाणून घ्या मधुमेहा संदर्भातील खूपच महत्त्वाची माहिती.!

जसे आपण डोसे बनवतो त्याच प्रकारे आपल्याला या पालकच्या मिश्रणापासून पालकचे डोसे तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तयार करून घेतलेल्या बारीक पोळ्यावर आत तयार केलेले स्टफिंग टाकून आपल्याला एक रोल तयार करून घ्यायचा आहे. रोल तयार करून झाल्यावर आपल्याला एका तव्यावर एक चमचा घी किंवा बटर टाकून त्यावर हे रोल ठेवायचे आहेत आणि फ्राय करून घ्यायचे आहे.

एकदा फ्राय केल्यानंतर तुम्ही हा पिझ्झा रोल खाऊ शकता. हा रोल खाण्यासाठी भरपूर फायदेशीर आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीरासाठी गुणकारी देखील आहे आपण बाहेरच्या गोष्टी खात असतो त्यामुळे आपल्या शरीराला त्याची थोडा जास्त प्रमाणात हानी होऊ शकते पण हा घरगुती प्रकारे बनवलेला पिझ्झा रोड आपल्या शरीरासाठी भरपूर हेल्दी आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.